फोटो सौजन्य -iStock
AI चा वाढता ट्रेंड पाहता अनेक कंपन्यांनी त्यांचे AI असिसस्टंट लाँच केले आहेत. Apple, Microsoft, Samsung आणि Google या कंपन्यानी त्यांचे AI असिसस्टंट लाँच केले आहेत. Meta ने लाँच केलेलं AI चॅटबोट ChatGPT आणि Gemini ला टक्कर देत आहे. AI च्या मदतीनं आपली अनेक कामं सहज शक्य होतात. 2022 मध्ये AI चॅटबोट ChatGPT लाँच करण्यात आला. त्यानंतर जगभरात AI ची क्रेझ वाढू लागली. कोणत्या प्रश्नाचं उत्तर शोधणं असो किंवा कोणत्या विषयावर माहिती शोधणं, आपण आपल्या अनेक कामांसाठी AI चा वापर करतो.
आतापर्यंत फक्त चित्रपटांमध्ये दिसणारे AI असिसस्टंट आपल्या जीवनाचा एक भाग बनले आहेत. आता या AI असिसस्टंटमध्ये आणखी एका नव्या AI ची भर पडणार आहे. पण हा जगातील पहिला AI व्हॉईस असिस्टंट आहे. फ्रेंच कंपनी Kyutai ने जगातील पहिला AI व्हॉईस असिस्टंट लाँच केला आहे. Moshi असं या AI व्हॉईस असिस्टंटचं नाव आहे. Moshi मराठीसह अनेक भाषांमध्ये बोलू शकतो. तो बोलताना तुमच्या आवाजातील सूर समजून घेतो आणि त्यानुसार तुम्हाला उत्तर देतो. AI व्हॉईस असिस्टंट Moshi ChatGPT ला टक्कर देणार असल्याचं बोललं जात आहे. कारण ChatGPT मध्ये व्हॉईस मोड फीचर अद्याप अपडेट करण्यात आलेलं नाही. त्यामुळे AI व्हॉईस असिस्टंट असणाऱ्या Moshi ला लोकांची अधिक पसंती मिळण्याची शक्यता आहे.
फ्रेंच AI कंपनी Kyutai ने Moshi लाँच केला आहे. Moshi हा AI व्हॉईस असिस्टंट आहे. Moshi लोकांशी रिअल टाइममध्ये बोलू शकतो. Moshi ची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की जेव्हा जेव्हा तो माणसांशी बोलत असेल तेव्हा समोरच्या व्यक्तीला असा अनुभव येईल की तो कोणत्याही AI शी बोलत नसून स्वतःसारख्या दुसऱ्या माणसाशी बोलत आहे. यामुळे, सध्या Moshi सर्व AI चॅटबॉट्समध्ये उत्तम मानला जात आहे. Moshi AI व्हॉईस असिस्टंट एकाच वेळी दोन ऑडिओ स्ट्रीम हाताळू शकतो, ज्यामुळे ते एकाच वेळी ऐकू आणि प्रतिसाद देऊ शकतात. लाइव्ह स्ट्रीमद्वारे नुकतेच Moshi लाँच करण्यात आलं आहे. युजर्स सध्या हा नवीन AI व्हॉईस असिस्टंट मोफत वापरू शकतात.
Moshi सोबत मोशीशी बोलण्यासाठी युजर्सना us.moshi.chat वर जावे लागेल. वेबसाइट उघडल्यानंतर, युजर्सना एक काळी स्क्रीन दिसेल ज्यावर एक मॅसेज दिसेल. मॅसेज वाचल्यानंतर, खाली एक बॉक्स असेल ज्यामध्ये तुम्ही तुमचा ईमेल प्रविष्ट करा आणि त्यानंतर खाली दिलेल्या पर्यायावर क्लिक करा.यानंतर तुमच्या समोर दुसरी स्क्रीन उघडेल. डाव्या बाजूला एक स्पीकर असेल ज्यामध्ये तुमचा आवाज रेकॉर्ड होईल आणि उजव्या बाजूला एक बॉक्स असेल जो मोशी जे काही बोलत आहे ते दर्शवेल. युजर्स 5 मिनिटांपर्यंत मोशीशी बोलू शकतात.