
ChatGPT Data Leak: AI प्लॅटफॉर्मवर सायबर हल्ला! लाखो यूजर्सचे नाव आणि ईमेल अॅड्रेस लीक, कंपनीने दिली वार्निंग
याच महिन्यात एका अटॅकरने Mixpanel चे सिस्टम हॅक केले आणि त्यातील डेटा एक्सपोर्ट केला होता. कंपनीने सांगितलं आहे की, डेटा लीकमध्ये OpenAI च्या सिस्टमच्या आणि ChatGPT यूजर्सवर कोणताही परिणाम झाला नाही. मात्र कंपनीच्या API प्रोडक्ट्सचा वापर करणाऱ्या यूजर्सवर याचा परिणाम होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
OpenAI ने सांगितलं आहे की, या डेटा लीकमध्ये API अकाउंट्सचे प्रोफाईल – लेव्हल डिटेल्स लीक झाले आहे. या डिटेल्समध्ये अकाऊंटचे नाव, त्यासंबंधित ईमेल अॅड्रेस, शहर, राज्य आणि देश इत्यादीसंबंधित लोकेशन, ऑपरेटिंग सिस्टम आणि ब्राउजर इंफोर्मेशन, रेफरिंग वेबसाइट्स आणि ऑर्गेनाइजेशन आणि यूजर आईडी इत्यादींचा समावेश आहे. कंपनीने दावा केला आहे की, यूजर्ससंबंधित सेंसेटिव आणि ऑथेंटिकेशनसंबंधित कोणतीही माहिती लीक झाली नाही.
टेक कंपनी OpenAI ने सांगितलं आहे की, 25 नोव्हेंबर रोजी त्यांना या डेटा लीकसंबंधित माहिती मिळाली. त्यानंतर यासंबंधित कारवाई करत कंपनीने Mixpanel ला त्यांच्या प्रोडक्शन सिस्टममधून पूर्णपणे काढून टाकले. आता कंपनी त्यांच्या वेंडर इकोसिस्टमचे ऑडिट करत आहे. यासोबतच कंपनी त्यांच्या सर्व थर्ड-पार्टी पार्टनर्ससाठी सुरक्षा अधिक कडक करणार आहे , ज्यामुळे भविष्यात अशा घटना थांबवण्यासाठी मदत होणार आहे. यासोबतच, कंपनीने डेटा लीकमुळे प्रभावित झालेल्या सर्व कंपन्या, अॅडमिन आणि यूजर्सना याबद्दल माहिती देण्यास सुरुवात केली आहे.
Free Fire Max: गेममध्ये मिळणार हॉलिडे वाईब्स आणि सि फोम बंडल! क्लेम करण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स
OpenAI ने यूजर्ससाठी वॉर्निंग जारी केली आहे. यामध्ये सांगण्यात आलं आहे की, लीक झालेल्या डेटाचा वापर फिशिंग आणि दुसऱ्या सायबर अटॅकमध्ये केला जाऊ शकतो. त्यामुळे कंपनीने सर्व यूजर्सना OpenAI च्या नावाने पाठवल्या जाणाऱ्या ईमेल्सबाबत सावध राहण्यास सांगितलं आहे. एखाद्या ईमेलमध्ये यूजरच्या वैयक्तिक माहितीची मागणी केली जात असेल तर यूजर्सनी सावध राहण्याचे आवाहन कंपनीने केले आहे. OpenAI ने म्हटले आहे की ते कधीही त्यांच्या यूजर्सना पासवर्ड, एपीआय की आणि पडताळणी कोड विचारत नाही.
Ans: ChatGPT हा OpenAI ने विकसित केलेला एक शक्तिशाली AI चॅटबॉट आहे.
Ans: हा AI मोठ्या प्रमाणावर डेटा आणि भाषा मॉडेलचा वापर करून वापरकर्त्याच्या प्रश्नांचा अर्थ समजतो आणि त्यावर आधारित उत्तरे तयार करतो.
Ans: होय, ChatGPT ची एक मोफत आवृत्ती उपलब्ध आहे. मात्र काही प्रीमियम फीचर्स फक्त सब्सक्रिप्शनमध्ये मिळतात.