Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ChatGPT New Feature: आता फोटोसोबत GIF सुद्धा तयार करा; जाणून घ्या कसं काम करतं नवं फीचर!

ChatGPT New Feature: ChatGPT वापरकर्त्यांसाठी आता GIF तयार करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. OpenAI च्या Images 2.6 अपडेटमुळे युजर्सना केवळ टेक्स्ट प्रॉम्प्ट देऊन किंवा स्वतःचा फोटो अपलोड करून अ‍ॅनिमेटेड GIF तयार करता येणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 05, 2026 | 04:25 PM
ChatGPT New Feature: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

ChatGPT New Feature: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ChatGPT वर आता स्वतःचे GIF तयार करता येणार.
  • फोटोला हसवणे, डोळे मिचकावणे यांसारखे अ‍ॅनिमेशन शक्य.
  • GIF चा स्पीड, फ्रेम्स आणि एडिटिंगचा पर्याय उपलब्ध.

 

ChatGPT वापरणाऱ्यांसाठी एक भारी बातमी आली आहे. आता तुम्हाला GIF बनवायला दुसरं कोणतं अ‍ॅप लागणार नाही. फक्त एक ओळ लिहा किंवा तुमचा फोटो टाका, आणि ChatGPT तुमच्यासाठी मजेशीर अ‍ॅनिमेटेड GIF बनवून देईल.

तुमचा साधा, स्थिर फोटो आता हसणार, रागावणार, आश्चर्यचकित होणार. फोटोला जिवंत करणं आता एकदम सोपं झालं आहे. आणि तो GIF तुम्ही थेट व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्रामवर शेअर पण करू शकणार. ChatGPT New Feature:

नेमकं काय करता येणार?

आता पर्यंत GIF पाहिजे असेल तर आपण गुगलवर जाऊन शोधायचो. जुने, सगळ्यांनी वापरलेले GIF वापरायचो. पण आता तसं नाही. तुम्हाला जसं हवं तसं GIF तुम्ही स्वतः बनवू शकता.

उदाहरण द्यायचं तर, तुम्ही ChatGPT ला लिहिलं, “नाचणाऱ्या मांजराचा GIF बनव”, तर काही सेकंदात तुमच्यासमोर नाचणारी मांजर तयार. तुम्हाला हवं ते प्राणी, हवी ती स्टाईल, सगळं तुम्ही सांगू शकता.

JioHome Diwali Offer: एका मिस्ड कॉलवर 5 महिने फ्री इंटरनेट? JioHome च्या दिवाळी ऑफरची संपूर्ण माहिती एका क्लिकवर

सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे स्वतःचा फोटो वापरून GIF बनवता येणार. तुमचा फोटो अपलोड करा आणि सांगा, “याला हसव”, “याला डोळे मिचकवायला लाव”. ChatGPT तो फोटो हलवून दाखवेल. मित्रांना वाढदिवसाला शुभेच्छा द्यायच्या असतील किंवा कोणी रागावलं असेल तर त्याला मनवायचं असेल, तर असले पर्सनल GIF खूप कामाला येतील.

एडिट पण करता येणार

फक्त GIF बनवून ChatGPT थांबणार नाही, तर तुम्हाला तो एडिट पण करता येणार आहे.तुम्हाला GIF चा स्पीड कमी-जास्त करायचा असेल तर ते पण करता येईल. 0.5x पासून ते 2x पर्यंत स्पीड तुम्ही ठरवू शकता. हळू चालणारा GIF पाहिजे असेल तर हळू, आणि फास्ट पाहिजे असेल तर फास्ट.

इतकंच नाही, तर GIF ची प्रत्येक फ्रेम तुम्ही वेगळी बघू शकता. एखादी फ्रेम आवडली नाही तर ती बदलू शकता. तुम्हाला वाटलं की हा GIF मनासारखा झाला नाही, तर पुन्हा प्रॉम्प्टमध्ये थोडा बदल करा, ChatGPT नवीन GIF बनवून देईल.आणि एकदा GIF तयार झाला की एका क्लिकवर तो शेअर करता येणार आहे. कुठेही सेव्ह करायची, परत अपलोड करायची कटकट नाही.

हे फीचर आलं कुठून?

हे नवीन फीचर OpenAI च्या नवीन ‘Images 2.6’ अपडेट सोबत आलं आहे. या अपडेटमुळे फक्त GIF च नाही तर फोटो बनवण्याचा स्पीड पण खूप वाढला आहे. आधी फोटो बनवायला वेळ लागायचा, आता ते काम खूप फास्ट होणार आहे.OpenAI ने सांगितलं आहे की सध्या दर आठवड्याला ChatGPT वरून 4 अब्जांपेक्षा जास्त फोटो बनवले जात आहेत. म्हणजे विचार करा, लोकांना हे किती आवडतंय. आता GIF आल्यावर तर हा आकडा आणखी वाढणार.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करायचा? एडिटिंग करताना लक्षात ठेवा ‘या’ टिप्स, मिळतील चांगले व्ह्यूज

याचा फायदा कोणाला होणार?

साध्या माणसांपासून ते कंटेंट बनवणाऱ्यांपर्यंत सगळ्यांना याचा फायदा होणार आहे. तुम्ही रील्स बनवत असाल, मीम्स बनवत असाल किंवा फक्त मित्रांसोबत मजा करत असाल, तर तुम्हाला आता वेगळं एडिटिंग शिकायची गरज नाही. फक्त लिहा आणि GIF तयार.

आता बघायचं आहे की हे फीचर सगळ्यांना कधी मिळतं. पण एक नक्की, GIF ची दुनिया आता पूर्णपणे बदलणार आहे. जुने, बोरिंग GIF जाऊन आता तुमच्या कल्पनेतले GIF येणार आहेत.तुम्ही असा GIF बनवलात तर पहिल्यांदा कोणाचा बनवाल?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ChatGPT वर GIF तयार करता येणार का?

    Ans: होय, टेक्स्ट प्रॉम्प्ट किंवा फोटो वापरून GIF तयार करता येईल.

  • Que: GIF चा स्पीड बदलता येतो का?

    Ans: होय, 0.5x ते 2x पर्यंत स्पीड बदलता येतो.

  • Que: तयार GIF एडिट करता येईल का?

    Ans: होय, GIF च्या फ्रेम्स वेगवेगळ्या पाहून त्यात बदल करता येतात.

Web Title: Chatgpt new feature create animated gif using photos and text prompts rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • AI technology
  • chatgpt
  • openai
  • Photo

संबंधित बातम्या

Sharvari Wagh: आईच्या जुन्या पटोला साडीला अभिनेत्री शर्वरी वाघने दिला मॉडर्न टच; मराठी पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष!
1

Sharvari Wagh: आईच्या जुन्या पटोला साडीला अभिनेत्री शर्वरी वाघने दिला मॉडर्न टच; मराठी पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.