आईची जुनी पटोला साडी अन् शर्वरीचा मॉडर्न अंदाज (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
बॉलिवूड अभिनेत्री शर्वरीने तिच्या आईची जुनी गुलाबी-जांभळ्या रंगाच्या पारंपरिक पटोला साडी मॉडर्न टच देत हटके स्टाई मध्ये नेसलेली दिसत आहे. शर्वरीने केलाला लूक अत्यंत आकर्षक आणि पारंपारिक- आधुनिक असा एक विशेष लूक परिधान केला आहे.
या फोटोंमध्ये तिने गडद जांभळ्या रंगाचा, सोनेरी नक्षीकामाने सजलेला स्ट्रॅपलेस कॉर्सेट टॉप परिधान केला आहे. साडीवरील पारंपरिक नक्षीकाम आणि झळाळणारे सोनेरी डिटेलिंग तिच्या लूकला अधिक उठाव देत आहे.
या फोटोंसोबत शर्वरीने मराठीत एक खास पोस्टही लिहिली आहे, “जेव्हा माझ्या आईने पहिल्यांदा #JhumkaPatola पाहिले, तेव्हा तिच्या डोळ्यांतील प्रेम आणि अभिमान मी कधीच विसरू शकत नाही. माझ्या आईने आशीर्वाद म्हणून तिची ही सुंदर गुलाबी पटोला साडी मला दिली, जी तिने अनेक वर्षे जपली होती आणि ज्यात तिच्या अनेक आठवणी आहेत.”
तिने पुढे लिहिले, “तिच्यासाठी इतकी मौल्यवान असलेली गोष्ट नव्याने परिधान करणे हा एक खास अनुभव होता, तिच्या साडीत मला तिचे प्रेम आणि आशीर्वाद वेढलेले असल्याचा भास होतो- आईच्या पदरातून माझ्या प्रवासाला आशीर्वाद!”
या लूकसोबत तिने गळ्यात आकर्षक हिरव्या आणि सोनेरी खड्यांचा नेकलेस, कानात उठावदार झुमके आणि हातात बांगड्या घातल्या आहेत. मोकळे, सरळ सोडलेले केस आणि हलका मेकअप यामुळे तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे