ChatGPT Down: ChatGPT ची सर्विस झाली ठप्प, नेटकरी अवस्थ! सोशल मिडीयावर मिम्सचा पाऊस
OpenAI चा चॅटबोट चॅटजीपीटीची सर्विस अचानक ठप्प झाली आहे. युजर्सना ChatGPT चा वापर करण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज सकाळपासून युजर्स ChatGPT चा वापर करू शकत नाहीत. याबाबत अनेतकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबतचे काही मिम्स देखील सोशल मिडीयावर व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. चॅटबॉट चॅटजीपीटी वापरताना युजर्सना अनेक समस्यांचा सामना करावा लागला.
हेदेखील वाचा- OpenAI ने रोलआऊट केलं नवं फीचर, आता ChatGPT मध्ये मिळणार हिस्ट्रीमधून सर्च करण्याचं ऑप्शन
तांत्रिक अडचणींमुळे ते युजर्सना चॅटजीपीटी ओपन करण्यातही अडचणींचा सामना करावा लागला. मायक्रोसॉफ्टच्या ओपनएआयने सांगितलं की चॅटबॉटला एका समस्येचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे लोकप्रिय चॅटबॉट चॅटजीपीटी सध्या अनुपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
कंपनीने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ते या समस्येची चौकशी करत आहे आणि ते लवकरात लवकर चॅटजीपीटीची सेवा पूर्वरत करण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत 19,403 हून अधिक चॅटजीपीटी युजर्सवर डाऊनचा परिणाम झाला आहे. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी त्यांच्या कंपनीचा प्रीमियर एआय चॅटबॉट, चॅटजीपीटी आज डाऊन झाल्यानंतर X वर पोस्ट करत सर्व युजर्सची माफी मागितली.
chatgpt went down for 30 mins today 🙁 we are much, much better at reliability than we used to be, but clearly more work in front of us.
(it is now the 8th biggest website in the world according to similarweb–we have had a lot of work to do these past two years!)
— Sam Altman (@sama) November 9, 2024
एक्स वरील पोस्टमध्ये आउटेज कबूल करताना, ऑल्टमन म्हणाले की कंपनी पूर्वीपेक्षा विश्वासार्हतेमध्ये खूप चांगली आहे परंतु अजून बरेच काम करायचे आहे. त्यांनी लिहिले, चॅटजीपीटीची सेवा आज काही काळासाठी ठप्प झाली. युजर्सना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. चॅटजीपीटीची सेवा पूर्वरत करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या दोन वर्षांत आम्हाला खूप काम करावे लागले आहे. असंच काम पुढे देखील सुरु राहिल, ज्यामुळे युजर्सना चॅटजीपीटीचा वापर करताना चांगला अनुभव येईल.
Me checking X to see if ChatGPT is down for everyone pic.twitter.com/GGtJOxD5PM
— Inspired Take (@InspiredTake) November 9, 2024
हेदेखील वाचा-OpenAI ने ChatGPT मध्ये आणलं Canvas इंटरफेस, आता सोपं होणार ‘हे’ काम
everyone running to twitter to check if chatgpt is down for anyone else #chatgpt #chatgptdown #ai pic.twitter.com/tlPxGR1d3P
— ۟ (@chuubeenlying) November 9, 2024
नोव्हेंबर 2022 मध्ये OpenAI च्या टेक्स्ट-जनरेटिंग आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) ChatGPT हे चॅटबोट लाँच केलं. लाँच झाल्यानंतर काही काळातच युजर्समध्ये ChatGPT ची क्रेझ प्रचंड वाढली. युजर्स त्यांच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ChatGPT च्या मदतीने अगदी सहज शोधू शकतात. ChatGPT तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मदत करते. ChatGPT चॅटबॉटने जगाला वेड लावले आहे, असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही.
University students because ChatGPT is down pic.twitter.com/xxQKLM1ypM
— Afc Max (@afcmax22) November 9, 2024
ChatGPT हे सर्वात पहिलं AI चॅटबोट आहे. कॉलेज आणि शाळेचे विद्यार्थी असाईंनमेंट पूर्ण करण्यासाठी आणि ऑफीसची अनेक कामं करण्यासाठी ChatGPT चा वापर केला जातो. इतकचं काय तर हल्ली इंटरव्युमध्ये देखील ChatGPT च्या मदतीने उत्तरं दिली जातात. ChatGPT मुळे आपल्याला अचूक आणि फायदेशीर मजकूर मिळतो. ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि मोठ्या प्रमाणात मदत होते. आपली अनेक कामं ChatGPT च्या मदतीने अगदी सहज शक्य होतात. ChatGPT च्या लाँचिंगनंतर Apple, Microsoft, Samsung आणि Google या कंपन्यानी त्यांचे AI असिसस्टंट लाँच केले आहेत.