चीनने विकसित केलं अनोखं तंत्रज्ञान, हायपरसोनिक क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी होणार मदत! जाणून घ्या सविस्तर
हायपरसोनिक क्षेपणास्त्र हे आधुनिक युद्धातील सर्वात जटिल आव्हानांपैकी एक आहे. या क्षेपणास्रांना रोखण्यासाठी आता चीन अत्यंत घातक आणि नवीन पिढीच्या शस्त्र प्रणालीवर काम करत आहे. या संपूर्ण प्रकल्पाला ‘मेटल स्टॉर्म वेपन प्रोजेक्ट’ असं नाव देण्यात आलं आहे. चीन आता या प्रोजेक्टअंतर्गत चीन मल्टी-बॅरल मशीन गन विकसित करण्याच्या प्रयत्नात आहे. असा दावा केला जात आहे की, ही गन अमेरिकन नौदलाच्या फॅलेन्क्स क्लोज-इन वेपन सिस्टमपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. चीनचं हे नवीन तंत्रज्ञान कसं असणार आहे त्याचे वैशिष्ट्य काय आहेत, याबाबत अनेकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
जर चीनने यशस्वीरित्या ही सिस्टम तैनात केली तर जगभरातील शॉर्ट-रेंज एयर डिफेंसचा चेहरा बदलणार आहे. अमेरिका, रशिया आणि नाटो देश हायपरसोनिक शस्त्रे विकसित करत आहेत. मात्र या शस्त्रांना कशा प्रकारे पराभूत केलं जाऊ शकतं, याचा विचार चीनने केला आहे. या शस्त्रांना तोंड देण्यासाठी चीन शक्तिशाली तंत्रज्ञान विकसित करत आहे. हायपरसोनिक शस्त्रे अशी असतात जी ध्वनीच्या पाचपट किंवा त्याहून अधिक वेगाने प्रवास करतात. (फोटो सौजन्य – linkedin)
मेटल स्टॉर्म वेपन सिस्टम नॉर्थ चायना युनिव्हर्सिटीच्या संरक्षण शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे. या तंत्रज्ञानाची विशेष गोष्ट म्हणजे त्याचा वापर जमीन आणि समुद्र दोन्ही ठिकाणी केला जाऊ शकते. शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या मेटल स्टॉर्म वेपन सिस्टमचा उद्देश हायपरसोनिक क्षेपणास्त्रांसारख्या हाय-स्पीड धोक्यांना थांबवणे हा आहे. ही सिस्टम पारंपारिक गनसारखी यांत्रिक नाही तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉइल इग्निशन तंत्रज्ञानाचा वापर करते.
यामध्ये गोळ्या एकावर एक अशा लोड केल्या जातात आणि प्रत्येक गोळी फक्त 17.5 मायक्रोसेकंदात सोडली जाते. याचा अर्थ कोणताही यांत्रिक विलंब होत नाही, या तंत्रज्ञानामध्ये केवळ वेग आणि विनाश लपलेला आहे. या सिस्टममध्ये सिस्टम स्मार्ट एम्युनिशन देण्यात आली आहे, ज्यामध्ये सेन्सर्स आणि डेटा चिप्स आहेत जे रिअल टाइममध्ये प्रत्येक शॉटचा मार्ग, वेग आणि अचूकता ट्रॅक करतात.
BSNL घेऊन आलाय धमाकेदार फॅमिली प्लॅन; एकाच बिलमध्ये मिळणार 4 कनेक्शन, 75GB डेटा आणि बरंच काही
खरं तर हे तंत्रज्ञान 1990 दशकातील ऑस्ट्रेलियन मेटल स्टॉर्म प्रकल्पापासून प्रेरित आहे. मात्र आता हे तंत्रज्ञान नव्याने विकसित करताना चीनने यामध्ये अनेक बदल केले आहेत आणि त्यामधील त्रुटी सुधारल्या आहेत. चीनमध्ये विकसित करण्यात आलेल्या मेटल स्टॉर्म वेपन सिस्टममध्ये डिस्पोजेबल बॅरल्स आणि मॉड्यूलर रीलोडिंग सिस्टम आहे. ही सिस्टम मोबाइल वेहिकल्स, एयर डिफेंस यूनिट्स आणि अगदी नौदलाच्या जहाजांवर देखील तैनात केली जाऊ शकते. या सिस्टमचा वापर चीनच्या सुरक्षा दल आणि नौदलासाठी गेम-चेंजर ठरू शकतो.