Upcoming Smartphones: Moto पासून Tecno पर्यंत... जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार या जबरदस्त स्मार्टफोनची विक्री
तुमचा स्मार्टफोन जुना झाला आहे आणि तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा असेल तर जून महिना बेस्ट आहे. कारण या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात टेक कंपन्याच्या नवीन प्रीमियम स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तीन नवीन स्मार्टफोनची विक्री होणार आहे. Motorola, , Alcatel आणि Tecno सारखे काही प्रमुख ब्रांड्स त्यांच्या लेटेस्ट स्मार्टफोन्सच्या विक्रीची तयारी करत आहेत. कोणत्या स्मार्टफोनची विक्री कोणत्या दिवशी सुरू होणार आहे, याबाबत जाणून घेऊया.
अखेर भारतात सुरू झालं ऑफिशियल Google Store, ऑफर्स आणि डिस्काउंटसह आता खरेदी करा Pixel डिव्हाईस
Motorola त्यांच्या लोकप्रिय फोल्डेबल सीरीज फोनचे नवीन वर्जन Razr 60 मार्केटमध्ये आणण्याची तयारी करत आहे. या स्मार्टफोनची विक्री 4 जून 2025 पासून मोटोरोलाच्या ऑफिशियल वेबसाईट व्यतिरिक फ्लिपकार्टवरून देखील सुरू होणार आहे. या स्मार्टफोनची एंट्री केवळ आकर्षक डिझाइनसह नाही तर पावरफुल प्रोसेसर, अधिक चांगला कॅमेरा आणि अॅडवांस डिस्प्ले टेक्नोलॉजीसह होणार आहे. हा स्मार्टफोन प्रीमियम सेगमेंटमध्ये Samsung Z Flip ला टक्कर देणार आहे. (फोटो सौजन्य – X)
They gave you upgrades. We’re giving you an uprising.
The Alcatel V3 Series 5G brings what others left out —
NXTPAPER Key. 4-in-1 display. Built-in eSIM.Starting at just ₹11,999 — no add-ons, no nonsense.
This isn’t just another launch. It’s a takeover.Available on… pic.twitter.com/J7Dqznnlp7
— Alcatel India Official (@IndiaAlcatel) June 2, 2025
Alcatel ने अलीकडेच भारतीय बाजारात पुन्हा एंट्री केली आहे. कंपनीने नुकतीच त्यांची नवीन V3 Series 5G लाँच केली आहे. या सीरिजमध्ये तीन मॉडेल लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये Alcatel V3 Classic 5G, V3 Pro आणि V3 Ultra यांचा सामावेश आहे. या स्मार्टफोनची विक्री आज 2 जूनपासून दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. स्मार्टफोनच्या किमतीबद्दल बोलायचं झालं तर ही सीरीज बजेटपासून मिड-रेंज यूजर्ससाठी डिझाईन करण्यात आली आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 12,999 रुपयांपासून 21,999 रुपयांपर्यंत आहे. हा स्मार्टफोन अशा लोकांसाठी आहे ज्यांना कमी किंमतीत चांगल्या 5G स्मार्टफोनचा अनुभव घ्यायचा आहे.
Tecno POVA Curve 5G launched in 🇮🇳
» 6.78″ FHD+ 3D Curved OLED
» 144Hz RR, 1300nits Peak 🔆
» Dimensity 7300 Ultimate
» LPDDR5X | UFS 2.2 💾
» A 15 | HiOS🌀
📸 64MP IMX682
🤳 13MP
» 5500mAh🔋| 45W⚡🌈
⚫Geek Black
⚪Magic Silver
🟢Neon Cyan#Tecno #TECNOPOVACurve5G
🧵1/2 pic.twitter.com/fRbGcmpzfG— Tech_Voyager⚓ (@rajAnoop_) May 29, 2025
Tecno चा लेटेस्ट स्मार्टफोन Pova Curve 5G देखील या आठवड्यात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनची विक्री 5 जून 2025 दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. ग्राहक या स्मार्टफोनची खरेदी Tecno ची अधिकृत वेबसाइट आणि Flipkart वरून करू शकता. ज्या युजर्सना चांगला परफॉर्मन्स, दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आणि कर्व्ड डिस्प्लेची गरज आहे, अशा यूजरसाठी हा स्मार्टफोन डिझाईन करण्यात आला आहे. Tecno Pova Curve 5G ची किंमत 15,999 रुपयांपासून 16,999 रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे.