BSNL घेऊन आलाय धमाकेदार फॅमिली प्लॅन; एकाच बिलमध्ये मिळणार 4 कनेक्शन, 75GB डेटा आणि बरंच काही
गेल्या काही दिवसांपासून भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL सतत नवीन प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स लाँच करत आहे. हेच महत्त्वाचं कारण आहे ज्यामुळे दर महिन्याला हजारो स्मार्टफोन युजर्स BSNL मध्ये स्विच करत आहेत. याशिवाय दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे BSNL च्या रिचार्ज प्लॅनची किंमत. कंपनी लाँच करत असलेल्या रिचार्ज प्लॅनची किंमत कमी असते पण यामध्ये भरपूर फायदे ऑफर केले जातात. आता देखील कंपनीने त्यांच्या पोस्टपेड यूजरसाठी नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन अगदी विशेष आहे कारण या रिचार्ज प्लॅनमधे युजर्सना एकाच बिलवर चार कनेक्शनचा वापर करता येणार आहे.
अखेर भारतात सुरू झालं ऑफिशियल Google Store, ऑफर्स आणि डिस्काउंटसह आता खरेदी करा Pixel डिव्हाईस
कंपनीने लाँच केलेल्या या नवीन रिचार्ज प्लॅनमुळे युजर्सना वेगवेगळ्या नंबरवर रिचार्ज करावा लागणार नाही. तुम्ही जर प्रत्येक व्यक्तीच्या रिचार्ज किमतीचा विचार केला तर हा खर्च फार कमी असणार आहे. या रिचार्जमध्ये मिळणाऱ्या चारही कनेक्शनमध्ये 75 GB हाय स्पीड डेटा ऑफर केला जाणार आहे. या सोबतच युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएसची सुविधा देखील मिळणार आहे. या प्लॅनची किंमत काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
अलीकडेच सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेयर केली होती. या पोस्टमध्ये या पोस्टपेड प्लॅनबद्दल माहिती देण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये युजर्स एक बिलवर चार नंबर वापरू शकतात. म्हणजेच एका बिलवर वेगवेगळ्या नंबरचा वापर केला जाऊ शकतो. या बिलमध्ये जोडल्या जाणाऱ्या प्रत्येक नंबरवर अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटाची सुविधा मिळणार आहे. यासोबतच 100 एसएमएसची सुविधा देखील दिली जाणार आहे. कंपनीच असं म्हणणं आहे की, या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज नाही तर एकूण 75 जीबी डेटा ऑफर केला जातो. याचा वापर संपूर्ण रिचार्ज व्हॉलिडिटी दरम्यान केला जाऊ शकतो.
Get more for your family with BSNL’s ₹999 Postpaid Plan!
Enjoy 4 connections with 75 GB data each, unlimited calls, and 100 SMS/day.
Smart savings, powerful features all in one family plan.#BSNL #BSNLPostpaid #FamilyMobilePlan #BSNLOffer #UnlimitedCalls #BigDataPlan… pic.twitter.com/WsCq72XuVV— BSNL India (@BSNLCorporate) May 27, 2025
कंपनीने लाँच केलेल्या या नवीन रिचार्ज प्लॅनची मासिक किंमत 999 रुपये आहे. कंपनी या योजनेसोबत डेटा रोलओव्हर सुविधा देखील देत आहे. डेटा रोलओव्हर म्हणजे जर तुम्ही एका महिन्यात सर्व डेटा वापरला नाही आणि जर हा डेटा शिल्लक राहिला तर तुम्ही तो पुढील महिन्यात देखील वापरू शकता.
उदाहरणार्थ, जर तुम्ही 75 जीबी डेटा पैकी 65 जीबी डेटा वापरला तर तुमचा उर्वरित डेटा पुढील महिन्याच्या डेटा कोट्यात जोडला जाईल, म्हणजेच तुम्हाला तुमचा उर्वरित डेटा पुढील महिन्यात वापरता येणार आहे. रोलओव्हर डेटासह, तुम्ही 225 जीबी पर्यंत डेटा वाचवू शकता जे या योजनेला आणखी खास बनवते.