
जगभरातील नेटकरी हैराण
चॅटजीपीटी, ट्विटरसह अनेक यंत्रणा ठप्प
Cloudflare मधील बिघाडामुळे इंटरनेट सर्व्हिस बंद
जगभरातील इंटरनेट सर्व्हिसेस ठप्प झाल्या आहेत. ट्विटर (आताचे एक्स), चॅटजीपीटी, OpenAI, कॅन्व्हा अशा यंत्रणा ठप्प झाल्या आहेत. यामुळे नेटकरी संतापले आहेत. युजर्स हैराण झाले आहेत. यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ उडाली आहे. इंटरनेट सर्व्हिसेसमध्ये बिघाड झाल्याने चॅटजीपीटी, ओपनआय, ट्विटर डाउन झाले आहे.
जे प्लॅटफॉर्म क्लाऊडफ्लेअर नेटवर्कवर आधारित आहे, असे प्लॅटफॉर्म डाउन झाले आहेत. गेल्या महिन्यात AWS चा मेगाआउटेज झाला होता. त्यानंतरचा हा सर्वात मोठा आउटेज आहे. क्लाउडफ्लेअर ही जगभरातील अनेक वेबसाईटला CDN आणि DDoS सुरक्षा प्रदान करते. या प्रणालीत बिघाड झाला की यावर आधारित सर्व प्लॅटफॉर्म ठप्प होतात.
एलन मस्कने लाँच केलं नवं मेसेजिंग प्लॅटॉफॉर्म
एलन मस्कच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ने प्रायव्हसी सेंट्रिक मेसेजिंग सर्विस XChat लाँच केले आहे. मस्कने या नव्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मबाबत आधीच अपडेट शेअर करण्यास सुरुवात केली होती. आता अखेर हे प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आले आहे. मस्कने घोषणा केली आहे की, हे नवीन प्लॅटफॉर्म सध्या iOS आणि वेब प्लॅटफॉर्मसाठी लाईव्ह करण्यात आले आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, लवकरच ही सर्विस अँड्रॉईड यूजर्ससाठी देखील उपलब्ध केली जाणार आहे. हे मेसेजिंग प्लॅटफॉर्म थेट मेटाच्या मालकीच्या व्हॉट्सअॅपला टक्कर देणार आहे. असं सांगितलं जात आहे की, हे प्लॅटफॉर्म युजर्सची प्रायव्हसी लक्षात ठेऊन डिझाईन करण्यात आलं आहे.
या अॅपबाबत X ने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, XChat आता iOS आणि वेबसाठी रोलआऊट करण्यात आलं आहे. अॅडव्हांस फीचर्स केवळ प्रिमियम यूजर्ससाठी उपलब्ध आहेत. लवकरच अँड्रॉईड युजर्ससाठी हे प्लॅटफॉर्म लाँच केलं जाणार आहे, याची तयारी देखील सुरु झाली आहे. यूजर्सना एक्समध्ये Chat आणि DM एकाच इनबॉक्समध्ये दिसणार आहे. जर तुम्हाला हे अपडेट दिसत नसेल तर एक्स अॅप अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. XChat आता सर्व X यूजर्ससाठी उपलब्ध आहे. एलन मस्कने जून महिन्यात या मेसेजिंग प्लॅटफॉर्मबाबत माहिती दिली होती. मस्कने सांगितलं होतं की, XChat यूजर्सची सिक्योरिटी आणि प्रायव्हसी लक्षात ठेऊन डिझाईन करण्यात आलं आहे. मस्कचं म्हणणं आहे की, लेटेस्ट नवीन XChat एंड-टू-एंड एन्क्रिप्शन, वॅनिशिंग मेसेजेज आणि कोणत्याही प्रकारची फाईल शेअर करण्याच्या कॅपिसिटीसह रिलीज करण्यात आलं आहे.