
OpenAI च्या मिशन स्टेटमेंटमधून ‘सुरक्षित’ शब्द गायब! सिक्योरिटी वगळून नफ्याकडे वळली कंपनी? टेक वर्ल्डमध्ये रंगली चर्चा
महागाईचा डिजिटल फटका! सेमिकंडक्टरचा तुटवडा; संगणकाचे स्पेअरपार्ट 400 टक्क्यांनी महागले
एआय कंपनीवर खटल्या दाखल करणाऱ्या अनेक वादींनी कंपनीवर मानसिक हानी, चुकीचा मृत्यू आणि आत्महत्येस मदत केल्याचा आरोप केला आहे. तर अनेकांनी निष्काळजीपणाच्या आरोपाखली कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. ओपनएआयच्या मिशन स्टेटमेंटमधून “सुरक्षित” शब्द काढून टाकणे हे एक महत्त्वपूर्ण बदल असल्याचे मानला जात आहे. असं सांगितलं जात आहे की, ओपनएआयच्या धोरणातील बदल म्हणजे कंपनी नव्या उपक्रमाची चाचणी करत असल्याचे मानले जात आहे. हा उपक्रम म्हणजे समाज अशा संस्थांच्या कामाचे कसे निरीक्षण करतो ज्यांच्याकडे प्रचंड फायदे देण्याची आणि विनाशकारी हानी पोहोचवण्याची क्षमता आहे, असा असू शकतो.
ओपनएआय कंपनीची स्थापना 2015 मध्ये एक ना-नफा वैज्ञानिक संशोधन प्रयोगशाळा म्हणून स्थापित करण्यात आली. या कंपनीचा मुख्य उद्देश कधीही पैसे कमावण्याचा नव्हता. त्याऐवजी, त्याचे निष्कर्ष सार्वजनिक आणि रॉयल्टीमुक्त करून समाजाच्या फायद्यासाठी होते. कंपनीने एआय मॉडेल विकसित करण्यासाठी आणि आवश्यक निधी उभारण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सॅम ऑल्टमन यांच्या नेतृत्वाखाली 2019 मध्ये एक नफा मिळवणारी उपकंपनी उभारली. माइक्रोसॉफ्टने सरुवातीला या उपक्रमात एक अरब अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक केली होती. 2024 पर्यंत ही रक्कम 13 अरब अमेरिकी डॉलर्सपेक्षा अधिक वाढली होती. या बदल्यात, कंपनीने मायक्रोसॉफ्टला भविष्यातील नफ्यातील वाटा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी काही आश्चर्यकारक आकडेवारी शेअर केली. सॅम ऑल्टमन यांनी सांगितले की, दर आठवड्याला 10 करोडहून अधिक भारतीय आता चॅटजीपीटीचा वापर करत आहेत. भारत आता या बाबतीत फक्त अमेरिकेपेक्षा मागे आहे. जर संपूर्ण जगाबद्दल बोलायचं झालं तर, चॅटजीपीटीच्या साप्ताहिक यूजर्सची संख्या 90 करोडपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर आहे, ज्यामध्ये एकट्या भारताचा वाटा हा एक महत्त्वाचा भाग आहे.