Telegram'ला न्यायालयाची फटकार! Phonepay'च्या तक्रारीचा परिणाम, हे चॅनल्स बंद करण्याचे आदेश
जगातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्समधील टेलिग्राम हे एक आहे. आतापर्यंत टेलिग्रामवर जगभरातील करोडो युजर्स जोडले गेले आहेत. त्यातच आता हा बहुचर्चित प्लॅटफॉर्म कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. फोनपे या ऑनलाइन पेमेंट ॲपद्वारे टेलिग्रामवर अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत, परंतु गेल्या काही महिन्यांत हे प्रकरण इतके वाढले आहे की हा मुद्दा थेट कोर्टात पोहोचला आहे.
कोर्टाच्या सुनावणीदरम्यान टेलिग्रामला न्यायालयाकडून जोरदार फटकारण्यात आले आहे. वास्तविक, फोनपेचे म्हणणे आहे की, टेलिग्राममुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, ज्यामुळे लोकांचा ऑनलाइन पेमेंटवरील विश्वास उडू शकतो. हे प्रकरण नक्की काय आहे आणि याचा युजर्सवर काय परिणाम होईल याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – BSNL युजर्सची मजा! मिळणार फास्ट इंटरनेट, फोनमध्ये 4G सिम कसे ऍक्टिव्ह करावे जाणून घ्या
फसवणुक केल्याचा आरोप
या प्रकरणात, मद्रास उच्च न्यायालयाने टेलिग्रामला फोनपेचे (Phonepay) नाव आणि लोगो वापरून फसव्या चॅनेल ब्लॉक आणि हटवण्याचे आदेश दिले आहेत. हे चॅनल लोकांची फसवणूक करून पैसे उकळत होते. फोनपेने कोर्टात तक्रार केली होती की, या चॅनेल्समुळे कंपनी आणि त्यांच्या यूजर्सचे आर्थिक नुकसान होत आहे.
अशा चॅनल्सना ब्लॉक करण्याचा आदेश
टेलिग्रामने न्यायालयाला सांगितले की, ते स्वतःहून असे चॅनेल ओळखू शकत नाहीत आणि त्यांना ब्लॉकही करू शकत नाहीत. परंतु कंपनीने कोर्टाला आश्वासन दिले की, फोनपे किंवा कोणत्याही यूज़र्सने तक्रार केल्यास ते संबंधित चॅनेल त्वरित ब्लॉक करेल. PhonePe ला असे कोणतेही चॅनल आढळल्यास त्यांनी ताबडतोब टेलिग्रामला कळवावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यानंतर टेलिग्रामला ते चॅनल ब्लॉक करावे लागेल.
हेदेखील वाचा – BSNL च्या 3G सिममध्येही चालेल सुपरफास्ट 4G इंटरनेट, फोनमध्ये लगेच करा या सेटिंग्ज
काय हे पूर्ण प्रकरण?
फोनपेने न्यायालयात तक्रार दाखल केली आहे की काही लोक टेलीग्रामवर बनावट चॅनेल तयार करत आहेत. अशा परिस्थितीत लोकांना खऱ्या आणि बनावट फोनपे ॲपमध्ये फरक करता येत नाही. हे चॅनल फोनपेचे नाव आणि लोगो वापरत आहे. या माध्यमातून लोकांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे हडप केले जात आहेत.
फोनपेने हे चॅनल्स बंद करण्याची मागणी न्यायालयाकडे केली. कोर्टाने टेलिग्रामला हे चॅनेल ब्लॉक करण्याचे आदेश दिले. युजर्सच्या तक्रारींवर ते कारवाई करणार असल्याचे टेलिग्रामने म्हटले आहे. तसेच फोनपेवरून तक्रार आल्यास अशा चॅनलला ब्लॉक केले जाईल. कोर्टाने फोनपेला टेलिग्रामला अशा चॅनेलबद्दल माहिती देण्यास सांगितले.