ChatGPT चा वापर न करताही तयार करू शकता Ghibli-Style ईमेज, Grok AI सह हे टूल्स करणार तुमची मदत
सर्वत्र Ghibli-Style ईमेजने धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर सर्वजण Ghibli-Style ईमेज तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. OpenAI चा चॅटबोट चॅटीजीपीने त्यांच्या युजर्सना Ghibli-Style ईमेज तयार करता यावेत, यासाठी एक टूल सुरु केलं होतं. अनेकांना हे टूल प्रचंड आवडलं आणि अगदी काही क्षणातच लोकांमध्ये Ghibli-Style ईमेजची क्रेझ निर्माण झाली. पण सध्या चॅटजीपीटीचं हे टूल पेड युजर्ससाठी उपलब्ध आहे. शिवाय फ्रीमध्ये ईमज क्रिएट केल्यामुळे चॅटजीपीटीवर कॉपीराईटचा आरोप देखील करण्यात आला आहे.
सध्या चॅटजीपीटीमधून Ghibli-Style ईमेज क्रिएट करण्यात अनेकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे लोकं दुसऱ्या वेबसाईटवरून कशा प्रकारे Ghibli-Style ईमेज तयार करू शकतो, याचा शोध घेत आहेत. आता आम्ही तुम्हाला असे काही टूल्स सांगणार आहोत, ज्याच्य मदतीने तुम्ही अगदी काही क्षणात Ghibli-Style ईमेज तयार करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
तुम्ही Ghibli-Style ईमेज तयार करण्यासाठी एलन मस्कच्या ग्रोक AI चा वापर करू शकता. इथे तुम्ही फ्रीमध्ये तुमच्या आवडत्या फोटोंची Ghibli-Style ईमेज तयार करू शकता. यासाठी तुम्हाला चॅटमध्ये फोटो अपलोड करून Create Ghibli Photo असा प्रॉम्प्ट द्यावा लागणार आहे. यानंतर अगदी काही क्षणातच तुमच्या समोर आवडत्या फोटोंची Ghibli-Style ईमेज तयार झालेली असेल.
एलन मस्कने देखील ग्रोक AI चा वापर करून Ghibli-Style ईमेज तयार केली आहे, त्यांनी ही ईमेज त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर देखील पोस्ट केली आहे. सध्या तरी हे टूल गूगल जेमिनीवर उपलब्ध नाही. तथापि, या फोटोंचा आऊटपुट चॅटजीपीटीच्या GPT-4o निर्मितींपेक्षा वेगळे असू शकते, कारण प्रत्येक मॉडेल प्रशिक्षण डेटा आणि अल्गोरिदममधील फरकांमुळे वेगळे आऊटपुट देतो. चॅटजीपीटीमध्ये तयार केल्या जाणाऱ्या प्रतिमा सूक्ष्म गोष्टींकडे लक्ष देतात.
तुम्ही ChatGPT सबस्क्रिप्शनशिवायही तुमचे फोटो किंवा Ghibli-Style ईमेजमध्ये रूपांतरित करू शकता. Craiyon, DeepAI, आणि Playground AI सारखे मोफत प्लॅटफॉर्म विविध कस्टमायझेशनसह AI इमेज जनरेशन देतात. फक्त एक फोटो अपलोड करा किंवा “स्टुडिओ घिब्ली शैलीतील पोर्ट्रेट, हिरवीगार जंगलाची पार्श्वभूमी” सारखे प्रॉम्प्ट टाइप करा आणि एआयला त्याची जादू करू द्या. हे टूल GPT-4o च्या फोटोरिअलिस्टिक अचूकतेशी जुळत नसतील, परंतु ते Ghibli-Style च्या सौंदर्याची नक्कल करू शकतात. चांगल्या नियंत्रणासाठी, आर्टब्रीडर वापरून पहा, जे तुम्हाला प्रतिमांचे मिश्रण करण्यास आणि शैलींमध्ये बदल करण्यास अनुमती देते.
तुम्हाला चांगल्या क्वालिटीमधील ईमेज तयार करायच्या असतील तर तर Runway ML, Leonardo AI किंवा Mage.space सारखे प्लॅटफॉर्म ChatGPT च्या क्षमतांना टक्कर देणारे आहेत. इथे तुम्हाला काही ठरावीक दिवसांसाठी मोफत ट्रायल देखील मिळते. साइन अप करा, तुमची प्रतिमा अपलोड करा आणि Ghibli च्या सिग्नेचर लूकचे अनुकरण करण्यासाठी प्रॉम्प्ट वापरा.