Ghibli Photo Trend: Elon Musk ने वाढवलं Sam Altman चं टेंशन, ChatGPT च्या पेड वर्जनमधील सुविधा फ्रीमध्ये ऑफर करतोय Grok
लोकप्रिय चॅटबोट ChatGPT ने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन ट्रेंड सुरु केला आहे. या ट्रेंडमध्ये युजर्स त्यांचे फोटो अॅनिमेसारखे क्रिएट करू शकतात. या ट्रेंडला Ghibli असं नाव देण्यात आलं आहे. तुम्हाला केवळ तुमचा फोटो चॅटजीपीटीमध्ये अपलोड करायचा आहे आणि Create Ghibli Photo असा प्रॉम्प्ट तुम्हाला द्यावा लागणार आहे. यानंतर अगदी काही क्षणातच तुम्ही अपलोड केलेल्या फोटोचे अॅनिमे वर्जन तुमच्यासमोर येणार आहे. पण ChatGPT च्या या सर्विसचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत. कारण Ghibli फोटो तयार करण्यासाठी तुम्हाला ChatGPT चे पेड वर्जन खरेदी करावं लागणार आहे.
ChatGPT च्या या ट्रेंडनंतर आता एलन मस्कच्या Grok ने देखील Ghibli फोटोची सर्विस सुरु केली आहे. इथे देखील तुम्हाला Ghibli फोटो तयार करण्यासाठी तुमचा फोटो अपलोड करून Create Ghibli Photo असा प्रॉम्प्ट तुम्हाला द्यावा लागणार आहे. यानंतर अगदी काही क्षणातच तुम्ही अपलोड केलेल्या फोटोचे अॅनिमे वर्जन तुमच्यासमोर येतील. पण Grok मधील खास गोष्ट म्हणजे Grok तुम्हाला ही सर्विस फ्रीमध्ये वापरण्याची सुविधा देते. म्हणजेच ChatGPT जे फोटो तयार करण्यासाठी तुमच्याकडून पैसे घेते, तेच फोटो तुम्ही Grok मध्ये फ्रीमध्ये तयार करू शकता. यामुळेच आता ChatGPT च्या Sam Altman चं टेंशन वाढलं आहे. कारण जी सुविधा फ्रीमध्ये ऑफर केली जात आहे, त्यासाठी लोकं पैसे का देतील, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. (फोटो सौजन्य – X)
रिपोर्ट्सनुसार, आजकाल अॅनिमे खूप लोकप्रिय होत आहे. त्यात अनेक प्रकारच्या कथा दाखवल्या आहेत. हे हाताने किंवा संगणक वापरून बनवले जातात. Ghibli हा देखील एक प्रकारचा अॅनिमे आहे. आपले देखील असेच फोटो असावेत असं अनेकांना वाटत असत त्यासाठीच Ghibli ट्रेंड सुरु करण्यात आला आहे. आपण अॅनिमे कॅरेक्टर असतो, तर कसे दिसले असतो याचाच अनुभव घेण्यासाठी हा ट्रेंड सुरु करण्यात आला आहे. जेव्हापासून लोकांना Ghibli ट्रेंडबद्दल माहिती मिळाली, तेव्हापासून ते त्यांचे कुटुंब, मित्र आणि व्हायरल प्रतिमा Ghibli पोर्ट्रेटमध्ये रूपांतरित करत आहेत.
ChatGPT अधिक फोटोरिअलिस्टिक प्रतिमा निर्माण करते, तर Grok हे Ghibli ईमेज तयार करताना काहीसे बदल करतो. अचूक निकाल मिळविण्यासाठी, वापरकर्त्यांना Grok ला अधिक तपशीलवार सूचना द्याव्या लागतील. तर एकदा प्रॉम्प्ट दिल्यावर ChatGPT अचूक ईमेज अपलोड करते.
सध्या, हे वैशिष्ट्य फक्त ChatGPT Plus, Pro, Team आणि काही इतर सशुल्क सदस्यता युजर्ससाठी उपलब्ध आहे. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्या मते, जास्त मागणीमुळे मोफत युजर्ससाठी हे वैशिष्ट्य रोलआउट करण्यास विलंब झाला आहे. याचा अर्थ असा नाही की मोफत युजर्स स्टुडिओ Ghibli प्रतिमा तयार करू शकत नाहीत. पण अधिक अचूक निकालासाठी तुम्हाला ChatGPT Plus, Pro, Team चा वापर करावा लागतो.
एलन मस्कने X वर स्टुडिओ Ghibli -प्रेरित प्रतिमा देखील शेअर केली, ज्यामध्ये क्रिप्टोकरन्सीशी त्यांचे संबंध देखील दिसून आले. या अॅनिमेशनमध्ये मस्कला एका माकडाच्या रूपात दाखवले आहे जो DOGE शुभंकर हवेत उचलतो. मस्कने पोस्टला कॅप्शन दिले: ‘Theme of the day.’ तथापि, मस्क आणि ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्यातील सुरू असलेल्या वादामुळे, मस्कने चॅटजीपीटी वापरून ही प्रतिमा तयार केली असण्याची शक्यता कमी आहे. शिवाय Grok वापरून देखील अशा प्रतिमा तयार केल्या जात आहेत. त्यामुळे अनेक युजर्सचा असा विश्वास आहे की मस्कने Ghibli तयार करण्यासाठी एआय कंपनी ग्रोक वापरली असावी.
Theme of the day pic.twitter.com/2ioG0StAxL
— Elon Musk (@elonmusk) March 26, 2025