Tech Tips: आयफोनच्या स्टोरेज समस्याने तुम्ही वैतागला आहात का? आत्ताच डिलीट करा हे प्री इंस्टॉल ॲप्स
सध्याच्या काळात आयफोन म्हणजे लोकांसाठी एक लक्झरी डिवाइस बनला आहे. लोन काढून किंवा ईएमआय करून अनेक लोकं आयफोन खरेदी करतात. लोकांमध्ये आयफोनची क्रेझ काही कमी होत नाही. कंपनी दरवर्षी त्यांचे नवीन डिवाइस लाँच करत असते. आयफोनची सिक्युरिटी देखील मजबूत आहे, त्यामुळे लोकं या डिव्हाईसला अधिक प्राधान्य देतात.
त्यामुळे असे अनेक लोकं आहेत जे इतर अँड्रॉइड डिव्हाइसपेक्षा आयफोनला अधिक प्राधान्य देतात. आयफोनचे युजर्स देखील प्रचंड आहेत. मात्र यातील 70 ते 80 टक्के युजर्सची एकच समस्या आहे ती म्हणजे आय फोनमधील स्टोरेज. आयफोन घेतल्यानंतर काही महिन्यातच युजरना स्टोरेजच्या समस्येचा सामना करावा लागतो. अशावेळी काय करावे हे देखील त्यांना समजत नाही. त्यामुळे अनेक असे युजर्स असतात जे त्यांचे फोटोज किंवा त्यांनी इन्स्टॉल केलेले ॲप्स डिलीट करतात. मात्र आम्ही तुम्हाला काही अशा टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला स्टोरेजच्या समस्याला सामना करावा लागणार नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
आयफोनमध्ये अनेक ॲप्स प्री–इन्स्टॉल असतात आणि हे ॲप्स युजर्स डिलीट देखील करू शकतात. त्यामुळे बरेच स्टोरेज रिकामी होते. डिलिट केलेले ॲप्स गरज पडल्यास पुन्हा एप्पल स्टोअरमधून इंस्टॉल केले जाऊ शकतात. यामुळे युजर्सची स्टोरेज समस्या अगदी सहज सोडवली जाऊ शकते. आता आम्ही तुम्हाला अशा प्री इन्स्टॉल ॲप बद्दल सांगणार आहोत जे तुम्ही आयफोनमधून डिलीट करू शकता. हे ॲप्स इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही तुमची स्टोरेज समस्या अगदी सहज सोडवू शकता. यातील काही ॲप्स असे असतात ज्यांचा वापर देखील करत नाहीत. डिलीट केल्यानंतर तुम्हाला ॲप्सची पुन्हा गरज पडली तर तुम्ही ते एप्पल ॲप स्टोअरमधून इन्स्टॉल करू शकता. चला तर मग या ॲप्स बाबत जाणून घेऊया.
Books: जर तुम्ही डिजिटल पुस्तक वाचत नसाल तर तुम्ही तुमच्या आयफोनमधून हे ॲप लगेचच डिलीट करू शकता.
Compass: आयफोनमध्ये कंपास देखील प्री इन्स्टॉल असतो. जर तुम्हाला या ॲपची गरज नसेल तर हा ॲप देखील तुम्ही तुमच्या आयफोनमधून डिलीट करू शकता.
Freeform: हे आजचे वर्चुअल ब्रेनस्टोर्मिंग ॲप आहे. जे कंपनीने 2022 मध्ये रिलीज केले होते. हे ॲप डिलीट करून तुम्ही बरेच स्टोरेज वाचवू शकता.
Home: आयफोनमध्ये 2016 पासून होम नावाचे ॲप देखील दिले जात आहे. या ॲपचा देखील वापर करत नसल्यास तुम्ही ते फोनमधून डिलीट करू शकता.
Journal: एप्पलने जर्नल ॲप 2023 मध्ये रिलीज केले होते. हे ॲप डिलीट करून तुम्ही स्टोरेज वाचवू शकता.
Magnifier: तुम्ही तुमच्या आयफोनचे स्टोरेज रिकामी करण्यासाठी फोनमधील मॅग्निफायर देखील डिलीट करू शकता.
Measure: हे ॲप iOS 12 पासून आयफोनमध्ये दिले जात आहे याची गरज नसल्यास तुम्ही हे देखील डिलीट करू शकता.
News: आयफोनमध्ये दिले जाणारे न्यूज ॲप डिलीट करून तुम्ही बरेच स्टोरेज वाचवू शकता. हे ॲप 2015 पासून आयओएसमध्ये दिले जात आहे.
TV: Apple चे चित्रपट आणि वेब सिरीज एप्पल टीव्ही ॲपद्वारे एक्सेस केले जाऊ शकतात. हे ॲप 2016 मध्ये लाँच करण्यात आले आहे. तुम्हाला जर या ॲपची गरज नसल्यास तुम्ही ते डिलीट करू शकता.
Reminders: एप्पलने आयफोनमध्ये 2011 पासून रिमाइंडर ॲप देण्यास सुरुवात केली आहे. हे ॲप डिलीट करून देखील तुम्ही आयफोनचे स्टोरेज वाढवू शकता.