सरकारचा सर्वात मोठा Digital Strike! 1.77 कोटी सिम कार्ड ब्लॉक, जाणून घ्या का घेतला हा निर्णय
दूरसंचार विभाग आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) या दोघांनीही बनावट कॉल्सविरोधात अॅक्शन घेण्यास सुरुवात केली आहे. हा सरकारचा सर्वात मोठा डिजीटल स्ट्राईक आहे. सरकारने 1.77 कोटी सिम कार्ड ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्केटिंग आणि बनावट कॉल्स थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मार्केटिंग आणि बनावट कॉल्समुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे. ग्राहकांचा त्रास कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
हेदेखील वाचा- OnePlus च्या या स्मार्टफोनला मिळालं OxygenOS अपडेट, युजर्सचा एक्सपीरियंस होणार अधिक मजेदार
ट्रायने गेल्या महिन्यात एक नवीन धोरण तयार केले आहे, ज्याद्वारे ऑपरेटर आता मार्केटिंग आणि बनावट कॉल्स स्वतःच थांबवू शकतात. यासह, व्हाइटलिस्टिंगची आवश्यकता राहणार नाही. फेक कॉल्स बंद करण्यासाठी दूरसंचार विभागाने पुन्हा कठोर पावले उचलली आहेत. अलीकडेच, दुरसंचार विभाग आणि सरकारने 1.77 कोटी मोबाईल नंबर ब्लॉक केले जे बनावट कॉल करण्यासाठी वापरले जात होते. देशातील 122 कोटींहून अधिक टेलिकॉम वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी, दूरसंचार विभाग आणि ट्राय या दोघांनीही बनावट कॉल्सविरोधातील लढा तीव्र केला आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
ट्रायने गेल्या महिन्यात एक नवीन धोरण तयार केले आहे, ज्याद्वारे ऑपरेटर आता मार्केटिंग आणि बनावट कॉल्स स्वतःच थांबवू शकतात. त्यामुळे आता मोबाईल युजर्सची मार्केटिंग आणि बनावट कॉल्सपासून सुटका होणार आहे. सरकारने आणि ट्रायने घेतलेला हा निर्णय मोबाईल युजर्ससाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
हेदेखील वाचा- Nubia चा Focus Pro 5G स्मार्टफोन लाँच, क्लासी डिझाईन आणि पावरफुल कॅमेऱ्यासह केली एंट्री
कम्युनिकेशन विभागाच्या म्हणण्यानुसार, दररोज सुमारे 1.35 कोटी बनावट कॉल्स थांबवले जात आहेत. याशिवाय त्यांनी बनावट कॉल करणारे 1.77 कोटी मोबाईल नंबर ब्लॉक केले आहेत. एकूणच, त्यांनी हे बनावट कॉल करणारे सुमारे 14 ते 15 लाख मोबाईल शोधले आहेत. लोकांच्या तक्रारींवर विभागाने तात्काळ कारवाई करत गेल्या पाच दिवसांत सुमारे 7 कोटी कॉल्स बंद केले आहेत.
दूरसंचार विभागाने 1.77 कोटी मोबाईल क्रमांक ब्लॉक केले आहेत, जे पैशांशी संबंधित फसवणुकीसाठी वापरले जात होते. यासोबतच 14 ते 15 लाखांचे चोरीचे मोबाईल क्रमांकही बंद करण्यात आले आहेत. ही त्यांच्या मोहिमेची सुरुवात असल्याचे विभागाने म्हटले आहे. तंत्रज्ञानाचा आपल्या जीवनात खूप फायदा झाला असला तरी काही लोकांनी त्याचा गैरवापरही केला आहे. त्यामुळे सामान्य लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
दूरसंचार विभागाने बनावट कॉल करणाऱ्यांना रोखण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी लाखो सिमकार्ड बंद केले आहेत. आता यूजर्सचे फेक कॉल्स थांबवण्यासाठी नवीन नियम करण्यात आले आहेत. आतापासून, कॉलर फक्त व्हाइटलिस्टेड टेलीमार्केटिंग कॉल प्राप्त करतील.