Nubia चा Focus Pro 5G स्मार्टफोन लाँच, क्लासी डिझाईन आणि पावरफुल कॅमेऱ्यासह केली एंट्री
चायनीज स्मार्टफोन ब्रँड Nubia ने आपला नवीनतम स्मार्टफोन Focus Pro 5G इंडोनेशियामध्ये लाँच केला आहे. हा स्मार्टफोन एका क्लासी डिझाईन आणि पावरफुल कॅमेऱ्यासह लाँच करण्यात आला आहे. हे कॅमेरा सेंट्रिक डिवाइस आहे, जे इंडोनेशियन ग्राहकांसाठी पहिल्यांदा MWC 2024 मध्ये लाँच करण्यात आले. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस गोलाकार कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. Nubia Focus Pro 5G स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल जाणून घेऊया.
हेदेखील वाचा- Jio Recharge Plans: जिओचे दोन जबरदस्त रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार बरंच काही
Nubia Focus Pro 5G स्मार्टफोनमध्ये एक अनोखं डिझाईन देण्यात आलं आहे, जे चार कस्टमाइजेबल फंक्शनला फास्ट एक्सेस करण्यासाठी एक स्लाइडिंग शॉर्टकट बटन आहे. यात कॅमेरा, साउंड मोड, व्हॉईस रेकॉर्डर आणि फ्लॅशलाइट आहे. Nubia Focus Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.72 इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120 Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. (फोटो सौजन्य – Nubia)
Nubia Focus Pro 5G स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेले क्लासिक कॅमेरा मॉड्यूल त्याचे फोटोग्राफी फोकस हायलाइट करते. फोनच्या मागील पॅनलवर एक गोलाकार कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. मध्यभागी एक मुख्य कॅमेरा आहे, जो 108 मेगापिक्सेल आहे. याशिवाय कॅमेराच्या वर एलईडी फ्लॅश दिसतो. निओचे बॅजिंग डाव्या बाजूला लाल रंगात दिसत आहे. कंपनीने याला सुपर एआय कॅमेरा असे नाव दिले आहे.
फोकस प्रो 5G मध्ये 108MP AI मुख्य कॅमेरा आहे, जो कमी प्रकाशातही स्टेबल शॉट्स कॅप्चर करू शकतो. कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन (EIS) ने सुसज्ज आहे. वापरकर्ते लँडस्केपपासून क्लोज-अपपर्यंत विविध प्रकारचे फोटो सहज क्लिक करू शकतात.
डिव्हाइस व्हिडिओसाठी 4K रेकॉर्डिंगला सपोर्ट करते. या RAW सुपर नाईट मोड कमी प्रकाशात उत्तम फोटोग्राफी करण्यासाठी मदत करतो. सेल्फीसाठी फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा आहे. फोटोग्राफी प्रेमींसाठी कंपनीने मजबूत कॅमेरा फीचर्स असलेला हा फोन लाँच केला आहे.
स्मार्टफोनमध्ये इमर्सिव्ह अनुभवासाठी 92% स्क्रीन-टू-बॉडी रेशो आहे. यातील इंटरॅक्टिव लाइव आइलँड फीचर नोटिफिकेशन आणि रियल-टाइम अपडेट देते. Nubia Focus Pro 5G स्मार्टफोन काळ्या आणि सोनेरी रंगात लाँच करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा- Netflix वर तुमच्या आवडत्या सीनचा स्क्रीनशॉट घेणं झालं सोपं! चुटकीसरशी होईल काम, फॉलो करा या स्टेप्स
Nubia Focus Pro 5G स्मार्टफोन 2.2GHz 5G प्रोसेसरसह येतो. यामध्ये 20GB रॅम (व्हर्च्युअलसह) आणि 256GB अंतर्गत स्टोरेज उपलब्ध आहे. यात 33W चार्जिंगला सपोर्ट करणारी 5000 mAh बॅटरी आहे.
इंडोनेशियामध्ये Nubia Focus Pro 5G ची अधिकृत किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. पण येत्या काही दिवसांत त्याची किंमत आणि इतर मार्केटमध्ये लाँच करण्याबाबत अपडेट मिळू शकतात.