Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिजि यात्राचा नवा विक्रम! तब्बल 19 दशलक्षांवर पोहोचली यूजर्सची संख्या, आता 6 प्रादेशिक भाषांमध्ये मिळणार सेवा

ट्रॅव्‍हल आयडेण्टिटी व्‍यवस्‍थापनाव्‍यतिरिक्‍त डिजि यात्रा प्रवाशांसाठी सोयीसुविधा वाढविण्यावर भर देत आहे. डिजि यात्रा प्रायव्‍हसी-बाय-डिझाइन डिजिटल ओळख प्‍लॅटफॉर्मला विमानतळांपलीकडे विस्‍तारण्‍याचा विचार करत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 12, 2025 | 01:02 PM
डिजि यात्राचा नवा विक्रम! तब्बल 19 दशलक्षांवर पोहोचली यूजर्सची संख्या, आता 6 प्रादेशिक भाषांमध्ये मिळणार सेवा

डिजि यात्राचा नवा विक्रम! तब्बल 19 दशलक्षांवर पोहोचली यूजर्सची संख्या, आता 6 प्रादेशिक भाषांमध्ये मिळणार सेवा

Follow Us
Close
Follow Us:
  • तब्बल 19 दशलक्ष यूजर्सचा आकडा पार
  • सहा प्रादेशिक भाषांमध्‍ये सेवा सुरु
  • आंतरराष्‍ट्रीय प्रवासासाठी इलेक्‍ट्रॉनिक पासपोर्ट-आधारित नोंदणी सुरू
डिजि यात्राने एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, डिजी यात्राने तब्बल 19 दशलक्ष यूजर्सचा आकडा पार केला आहे. याशिवाय नवीन घोषणा देखील करण्यात आली आहे. आता डिजीयात्रा ६ प्रादेशिक भाषांमध्‍ये उपलब्ध असणार आहे. भारतातील सेल्‍फ सॉव्‍हरेन आयडेण्टिटी (एसएसआय)-आधारित डिजि यात्रा यूजर्ससाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. डिजि यात्रा हे भारतातील सेल्‍फ सॉव्‍हरेन आयडेण्टिटी (एसएसआय)-आधारित आणी प्रायव्‍हसी-बाय-डिझाइन प्लॅटफॉर्म आहे. डिजि यात्राने जलद, कॉन्‍टॅक्‍टलेस आणि अधिक सर्वसमावेशक प्रवासी अनुभवाच्‍या माध्‍यमातून विमान प्रवासाला अधिक उत्‍साहपूर्ण बनवले आहे.

Google Gemini AI: पुन्हा सुरु झाला जेमिनीचा नवा ट्रेंड, यूजर्स झाले वेडे! एका क्लिकवर जाणून घ्या सर्व प्रॉम्प्ट

१९ दशलक्ष डाऊनलोड्स, २४ विमानतळांवर ३० टक्‍के अवलंबन आणि ७७ दशलक्षहून अधिक विनासायास प्रवासासह प्‍लॅटफॉर्म आता व्‍याप्‍ती, उपलब्‍धता व जागतिक एकीकरणामध्‍ये प्रबळ गतीसह २०२६ मध्‍ये प्रवेश करत आहे. २०२८ पर्यंत ८० टक्‍के अवलंन संपादित करण्‍याचे लक्ष्य प्लॅटफॉर्मने डोळ्यासमोर ठेवले आहे. डिजी यात्रेचा हा पाया अधिक मजबूत करण्यासाठी सहा प्रादेशिक भाषांमध्‍ये सेवा सुरु करण्यात आली आहे. ज्यामुळे भारतातील प्रत्येक प्रवाशासाठी विमान प्रवासाचा अनुभव अधिक सोपा झाला आहे. भाषिनीसोबत सहयोगाच्‍या माध्‍यमातून हे बहुभाषिक विस्‍तारीकरण लवकरच सर्व २२ भारतीय भाषांमध्‍ये उपलब्‍ध असेल, जे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्‍या भाषेसंदर्भातील अडथळ्यांना दूर करण्‍याच्‍या आणि मेट्रो केंद्रांपलीकडे डिजिटल प्रवास अवलंबनाला गती देण्‍याच्‍या दृष्टिकोनाला पाठिंबा देते. (फोटो सौजन्य – Pinterest)

डिजि यात्रा पहिल्‍या जागतिक वापरकर्त्‍याची नोंद केल्‍यानंतर आंतरराष्‍ट्रीय प्रवासासाठी इलेक्‍ट्रॉनिक पासपोर्ट-आधारित नोंदणी देखील सुरू करत आहे, ज्‍यासह एक्‍सपॅट्स, एनआरआय आणि परदेशी प्रवाशांना विनासायास प्रवास अनुभव मिळेल, जे लवकरच डिजिटल आयडेण्टिटी पडताळणी सेवा वापरू शकतील, ज्‍यासाठी मॅन्‍युअल तपासणीची गरज भासणार नाही. ही नवीन सेवा सुरू करण्‍यासाठी डिजि यात्रा वनआयडी उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत परराष्‍ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय, ब्‍युरो ऑफ इमिग्रेशन, आयसीएओ आणि आयएटीएसोबत सहयोगाने काम करत आहे. हे सहयोग पासपोर्ट व व्हिसा-आधारित क्रेडेन्शियल शेअरिंग, ऑटोमेटेड बोर्डर कंट्रोल आणि पुढील आर्थिक वर्षासाठी नियोजित आंतरराष्‍ट्रीय पायलट ट्रायल्‍ससाठी आराखडा तयार करत आहेत.

ट्रॅव्‍हल आयडेण्टिटी व्‍यवस्‍थापनाव्‍यतिरिक्‍त डिजि यात्रा दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीसुविधा वाढविण्यावर भर देत आहे. यासाठी कंपनी आपली सेवा परिसंस्‍था विस्‍तारित करत आहे. प्‍लॅटफॉर्म आता प्रमुख एअरलाइन आणि इंडिगो, एअर इंडिया व मेकमायट्रिप अशा टॅव्‍हल टॅप्‍समधून प्रत्‍यक्ष बोर्डिंग पास शेअर करण्‍यास साह्य करतो, जेणेकरून विमानतळावर प्रवासादरम्‍यान बोर्डिंगसंदर्भात त्रास कमी होईल.

डिजि यात्रा फाऊंडेशनचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी सुरेश खडकभावी म्‍हणाले, ”आज आम्‍हाला पाहायला मिळालेली गती भारतातील डिजिटल प्रवासामधील नवीन चॅप्‍टर आहे. आमची विविध भाषांमध्‍ये सादर करण्‍यात येणारी सेवा आणि आंतरराष्‍ट्रीय पायलट उपक्रमामधून प्रवासाला सोपे, अधिक सर्वसमावेशक आणि जागतिक स्‍तरावर इंटरऑपरेबल करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. आम्‍हाला विविध देशांमधून व जागतिक विमान वाहतूक कंपन्‍यांकडून मिळत असलेल्‍या प्रतिसादामधून प्रेरणा मिळत आहे, जे सुलभ प्रवासासाठी मॉडेल म्‍हणून डिजि यात्राला प्राधान्‍य देतात. मंत्रालय आणि सहयोगी एजन्‍सीजकडून दृढ पाठिंब्‍यासह आम्‍हाला आत्‍मविश्वास आहे की आगामी वर्षे अपेक्षेपेक्षा प्रगतीला गती देतील, भारताला जागतिक स्‍तरावर घेऊन जातील, जेथे ओळखीबाबत पडताळणी त्‍वरित, सुरक्षित आणि पूर्णत: प्रवासी-केंद्रित असेल.”

Instagram Update: पुन्हा एकदा आलं भन्नाट फीचर! आवडत्या सेलिब्रिटीची स्टोरी रिशेअर करणं झालं आणखी सोपं, आता मिळणार ‘हा’ पर्याय

डिजि यात्रा आपल्‍या प्रायव्‍हसी-बाय-डिझाइन डिजिटल ओळख प्‍लॅटफॉर्मला विमानतळांपलीकडे विस्‍तारित करण्‍याचा देखील विचार करत आहे (व्‍यवस्‍थापनानंतर व नियामक मंजूरी), ज्‍यासह सुरक्षित हॉटेल चेक-इन आणि एन्क्रिप्‍टेड क्रेडेन्शियल्‍स व बायोमेट्रिक पडताळणीच्‍या माध्‍यमातून स्‍वयंचलित उपलब्‍धता शक्‍य होईल. प्रवासी उत्‍साहवर्धक अनुभवासाठी फेशियल-ऑथेन्टिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करत मॅन्‍युअल आयडी तपासण्‍या बायपास करू शकतात. प्‍लॅटफॉर्म म्‍युझियम्‍स, स्‍मारक आणि पर्यटन स्‍थळांमध्‍ये देखील या सेवेचा अवलंबन करण्‍याला चालना देत आहे, ज्‍यासह मर्यादित कनेक्‍टीव्‍हीटी किंवा लांब रांगा असलेल्‍या क्षेत्रांमध्‍ये सहजपणे तिकिटे मिळतील आणि अभ्‍यागतांचा अनुभव अधिक उत्‍साहित होईल. काळासह, आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर या मॉडेलचा विस्‍तार केल्‍यास परदेशातील भारतीयांसाठी प्रवास करणे सोपे होईल, तसेच भारताची पर्यटन उपस्थिती प्रबळ होईल, डिजि यात्रा गोपनीयता-संदर्भात प्रवास आणि नाविन्‍यपूर्ण आदरातिथ्‍याचे प्रमुख स्रोत बनेल. या सुधारणा डिजि यात्राच्‍या प्रबळ प्रायव्‍हसी-बाय-डिझाइन फ्रेमवर्कनुसार करण्‍यात येत आहेत, ज्‍याला विकेंद्रिकृत परिसंस्‍थेचे पाठबळ आहे, जी वापरकर्त्‍यांच्‍या डेटाचे संरक्षण आणि जागतिक डिजिटल ओळख नियमांचे अनुपालन होण्‍याची खात्री देते.

Web Title: Digi yatra reached 19 million users now users will get service in 6 regional languages tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 01:02 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

Google Gemini AI: पुन्हा सुरु झाला जेमिनीचा नवा ट्रेंड, यूजर्स झाले वेडे! एका क्लिकवर जाणून घ्या सर्व प्रॉम्प्ट
1

Google Gemini AI: पुन्हा सुरु झाला जेमिनीचा नवा ट्रेंड, यूजर्स झाले वेडे! एका क्लिकवर जाणून घ्या सर्व प्रॉम्प्ट

LG ची कमाल! AI DD 2.0 तंत्रज्ञानाची नवी वॉशिंग मशीन रेंज लाँच, जाणून घ्या खास फीचर्स आणि किंमत
2

LG ची कमाल! AI DD 2.0 तंत्रज्ञानाची नवी वॉशिंग मशीन रेंज लाँच, जाणून घ्या खास फीचर्स आणि किंमत

Free Fire Max: डेली स्पेशल सेक्शन म्हणजे नेमकं काय? प्लेयर्सना असे मिळतात जबरदस्त फायदे
3

Free Fire Max: डेली स्पेशल सेक्शन म्हणजे नेमकं काय? प्लेयर्सना असे मिळतात जबरदस्त फायदे

WhatsApp वापरताना ‘ही’ एक चूक ठरेल घोडचूक! थेट कारागृहात होईल रवानगी
4

WhatsApp वापरताना ‘ही’ एक चूक ठरेल घोडचूक! थेट कारागृहात होईल रवानगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.