डिजीटल इंडिया 4 स्तंभांवर आधारित, आयएमसीमध्ये 6G च्या भविष्यावर पंतप्रधानांचं मोठं विधान
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज इंडिया मोबाईल काँग्रस 2024 ईव्हेंटचे उद्घाटन करण्यात आले. या ईव्हेंटमध्ये अनेक नेते आणि उद्योगपतींनी सहभाग घेतला आहे. 18 ऑक्टोबर 2024 पर्यंत हा ईव्हेंट सुरु राहणार आहे. या ईव्हेंटला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या जगात भारताने मोठी कामगिरी केली आहे. 2014 पर्यंत भारतात फक्त 2 मोबाईल उत्पादन कारखाने होते, परंतु आता 200 पेक्षा जास्त आहेत, ज्यामुळे मोबाईल फोनची किंमत कमी झाली आहे.
हेदेखील वाचा- आठ वर्षांत पूर्ण केला 2G ते 5G चा प्रवास, मोदी है तो मुमकीन है! आयएमसीमध्ये आकाश अंबानींकडून मोदींचं कौतुक
पंतप्रधाान मोदी पुढे म्हणाले, आज भारत दर्जेदार सेवेवर खूप लक्ष केंद्रित करत आहे. WTSA संपूर्ण जगाला शक्तिशाली बनविण्याबद्दल भाष करतो. IMC संपूर्ण जगाला जोडण्याचे काम करते. भारत जगाला संघर्षातून बाहेर काढून जगाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा स्थानिक आणि जागतिक एकत्र येतो, त्याचा संपूर्ण जगावर प्रभाव पडतो.(फोटो सौजन्य – X)
पंतप्रधाान म्हणाले, मला आठवतंय, 10 वर्षांपूर्वी मी जेव्हा भारताचं व्हिजन देशासमोर मांडत होतो, तेव्हा मी म्हटलं होतं की, आम्हाला तुकड्या-तुकड्यांमध्ये फिरावं लागणार नाही. त्यानंतर आम्ही डिजिटल इंडियाचे चार स्तंभ तयार केले. यामध्ये उपकरणाची किंमत कमी असावी, डिजिटल कनेक्टिव्हिटी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली पाहिजे, डेटा प्रत्येकासाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे आणि डिजिटल प्रथम आमचे ध्येय असले पाहिजे यांचा समावेश आहे. या चार खांबांवर आम्ही काम सुरू केले आणि त्याचे परिणामही आम्हाला मिळाले.
हेदेखील वाचा- पंतप्रधान मोदींच्या हस्ते इंडिया मोबाइल काँग्रेस 2024 चे उद्घाटन, ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, स्मार्टफोन भारतात तयार केल्याशिवाय ते स्वस्त होऊ शकत नाहीत. 2014 मध्ये फक्त दोन मोबाइल उत्पादन युनिट्स होती, आज 200 पेक्षा जास्त आहेत. यापूर्वी, आम्ही बनवलेले बहुतेक फोन बाहेरचे होते. भारतात पूर्वीपेक्षा सहापट अधिक मोबाइल फोन बनवण्याचे आमचे उदिष्ट आहे.
पंतप्रधान पुढे म्हणाले, आम्ही भारतातील सेमीकंडक्टर इकोसिस्टममध्येही मोठी गुंतवणूक करत आहोत. कनेक्टिव्हिटीच्या स्तंभावर काम करत. आम्ही प्रत्येक कोपऱ्यात मोबाइल टॉवरचे मजबूत नेटवर्क तयार केले आहे. देशामध्ये आदिवासी भाग, डोंगराळ भागांचा समावेश आहे आणि थोड्याच दिवसांत आम्ही अंदमार आणि निकोबार बेटांना वाय-फाय सुविधा देणार आहोत.
ऑप्टिकल फायबरच्या जागतिक विक्रमाबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, भारतात केवळ 10 वर्षात बसवलेल्या ऑप्टिकल फायबरची लांबी पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतराच्या 8 पट आहे. दोन वर्षांपूर्वी आम्ही मोबाईल काँग्रेसचे आयोजन केले होते. 5G आज भारतात सेवा सुरू करण्यात आली आहे. 2 वर्षांपूर्वी आम्ही मोबाईल काँग्रेसमध्येच 5G लाँच केले होते, आज भारतातील जवळपास प्रत्येक जिल्हा 5G सेवेशी जोडला गेला आहे. आज भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची 5G बाजारपेठ बनला आहे आणि आता आम्ही 6G तंत्रज्ञानावरही वेगाने काम करत आहोत.
21व्या शतकातील भारताचा मोबाईल आणि टेलिकॉम प्रवास हा संपूर्ण जगासाठी अभ्यासाचा विषय असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. ते म्हणाले की, भारतात, आम्ही दूरसंचार हे केवळ कनेक्टिव्हिटीचे माध्यम बनवले नाही तर इक्विटी आणि संधीचे माध्यम बनवले. आज हे माध्यम गाव आणि शहर, श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी करण्यात मदत करत आहे. हा कार्यक्रम भारताचा डिजिटल विकास आणि दूरसंचार प्रगती जगासमोर मांडण्याची संधी आहे. IMC 2024 मध्ये भारताच्या 6G व्हिजनवरही विशेष लक्ष केंद्रित केले जाईल.