पंतप्रधान मोदींच्या हस्ते इंडिया मोबाइल काँग्रेस 2024 चे उद्घाटन, ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित
भारताची राजधानी नवी दिल्ली येथील प्रगती मैदान येथील इंडिया पॅव्हेलियन येथे इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 ईव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. या ईव्हेंटला आजपासून सुरुवात झाली असून पुढील 3 दिवस म्हणजेच 18 ऑक्टोबरपर्यंत हा ईव्हेंट सुरु राहणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ईव्हेंटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भारताचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, रिलायंस जियो इन्फोकॉम लिमिटेडचे चेअरपरसन आकाश अंबानी देखील उपस्थित होते. इंडिया मोबाइल काँग्रेसची ही आठवी आवृत्ती आहे, ज्यामध्ये भारतासह जगभरातील अनेक टेक स्टार्ट-अप कंपन्या त्यांचे अनोखे आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान प्रदर्शित करणार आहेत. भारताच्या या टेक इव्हेंटमध्ये जगभरातील 190 हून अधिक देशांनी सहभाग घेतला आहे.
हेदेखील वाचा- AI वर आधारित इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 ईव्हेंटला आजपासून सुरुवात, 900 स्टार्टअप्स होणार सहभागी
यंदा आयोजित करण्यात आलेला इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 हा AI वर आधारित आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि जनरेटिव्ह AI चे महत्त्व या ईव्हेंटच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणार आहे. या ईव्हेंटमध्ये भारतात विकिसत होत असलेल्या 6G वर देखील भाष्य केले जाऊ शकते. कार्यक्रमाची थीम ‘द फ्यूचर इज नाऊ’ आहे. या ईव्हेंटमध्ये क्लाउड आणि एज कंप्युटिंग, IoT, सेमीकंडक्टर्स, सायबर सुरक्षा, ग्रीन टेक, सॅटकॉम आणि इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगशी संबंधित माहिती दिली जाणार आहे. (फोटो सौजन्य – X)
इंडिया मोबाइल काँग्रेसच्या वेबसाईटवर असे म्हटले आहे की सॅटेलाइट कम्युनिकेशन, 5G आणि 6G, डीप टेक, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगबद्दल अपडेट्स दिले जातील. येथे तुम्हाला क्लीन टेक आणि डेटा सिक्युरिटी सारख्या विषयांवर देखील माहिती मिळेल.IMC 2024 दरम्यान, कंपन्या 6G विकासाबद्दल माहिती शेअर करू शकतात. या ईव्हेंटचे अपडेट्स इंडिया मोबाइल काँग्रेसच्या एक्स अकाऊंटवर शेअर केले जात आहेत.
हेदेखील वाचा- आता गुगल मॅप सांगाणार कोणता फ्लायओव्हर घ्यायचा! या 8 शहरांसाठी आलं फीचर
या कार्यक्रमात बडे नेते आणि अनेक बडे उद्योजक सहभागी झाले होते. दूरसंचार विभागाने शेअर केलेल्या उद्घाटनाच्या व्हिडिओमध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, रिलायन्स जिओचे चेअरपर्सन आकाश अंबानी यांच्यासह अनेक उद्योगपती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे दिसत होते. IMC 2024 च्या वेबसाइटवर सूचीबद्ध केलेल्या तपशीलांनुसार, या कार्यक्रमात मोठे नेते आणि अनेक मोठे उद्योगपती सहभागी होणार आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, रिलायन्स जिओचे चेअरपर्सन आकाश अंबानी, भारती एंटरप्रायझेसचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील मित्तल आणि आदित्य बिर्ला समूहाचे कुमार एम बिर्ला यांच्या नावांचा समावेश आहे.
यावेळी भारताचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितलं की, भारताचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना म्हणाले, “गेल्या वर्षी भारताने G20 शिखर परिषदेचे आयोजन केले होते. त्याचप्रमाणे, WTSA असेंब्लीचे आयोजन करण्याचा मान आम्हाला मिळाला आहे, जी भारतात प्रथमच होत आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पुढे सांगितलं की, आमच्याकडे 160 हून अधिक देशांतील 3,200 प्रतिनिधी आहेत, जे कोणत्याही WTSA असेंब्लीच्या इतिहासातील सर्वात जास्त आहे. टेलिकॉमच्या सामर्थ्याचे सर्वात उज्वल उदाहरण म्हणजे DBT म्हणजे Direct Benefit Transfer योजना, जी दररोज 10 दशलक्षाहून अधिक लोकांच्या बँक खात्यांमध्ये थेट रोख हस्तांतरण करते. दूरसंचार क्षेत्रात, ज्यांच्याकडे संसाधने आहेत आणि ज्यांच्याकडे नाहीत त्यांच्यातील दरी आम्ही वेगाने कमी करत आहोत.