तुमच्या फोनमध्ये Spyware चा धोका असण्याची शक्यता (फोटो सौजन्य- istock)
देशातील स्मार्टफोन्स युजर्सच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांकडेच स्मार्टफोन पाहायला मिळतात. मागील एका दशकात देशातील एकूण मोबाइल युजर्सची संख्या 25.15 कोटींवरून 95.44 कोटी झाली आहे. यावरून आपल्या लक्षात येईल की, देशात स्मार्टफोन युजर्सचं प्रमाण सर्वाधिक वाढलं आहे. स्मार्टफोन्स युजर्सच्या वाढत्या संख्येसोबतच ऑनलाईन फ्रॉड आणि सायबर फ्रॉडची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे लोकांना स्मार्टफोन्स वापरताना मोठ्या प्रमाणात काळजी घ्यावी लागत आहे, आपली एक चूक देखील आपल्याला प्रचंड महागात पडू शकते आणि आपण सायबर स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकू शकतो.
हेदेखील वाचा- Instagram युजर्ससाठी लाँच झालं नवीन अपडेट! आता एकाच वेळी 20 फोटो-व्हिडिओ शेअर करू शकणार
आपण आपल्या प्रत्येक कामासाठी स्मार्टफोनचा वापर करतो. ऑनलाईन पेमेंट, ऑनलाईन शॉपिंग, सारख्या सर्वच गोष्टी हल्ली डिजीटली केल्या जातात. यामुळे युजर्सचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टींची बचत होते, हे जरी खरं असलं तरी अशा ठिकाणी सायबर फ्रॉडचा धोका देखील असतो. देशात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. लोकं ऑनलाइन पेमेंट किंवा शॉपिंगची पध्दत वापरताना प्रचंड बेफिकर असतात, अशाच गोष्टिंचा सायबर फ्रॉडर्स फायदा घेतात.
आजच्या डिजिटल जगात लोक आपली कामे डिजिटल पद्धतीने करू लागले आहेत. या डिजीटल जगात मालवेअरचा धोका देखील निर्माण होत आहे. सायबर फ्रॉडर्स तुमच्या फोनमध्ये कधीही मालवेअर अटॅक करू शकतात. या ऑनलाइन जगात मालवेअर कोणाच्याही फोनमध्ये सहज बसवता येतो. यामुळे हॅकर्स लोकांना सहजपणे त्यांच्या जाळ्यात अडकवतात आणि त्यांच्या फोनमध्ये Spyware ठेवतात. अनेक वेळा लोकांना कळतही नाही आणि त्यांच्या स्मार्टफोनवर सायबर हल्ला होतो. यामुळे तुमचा डेटा आणि इतर नुकसान देखील होते. जर तुमच्या सायबर अटॅक झाला असेल किंवा तुमच्या फोनमध्ये कोणता Spyware असेल तर तुम्हाला एक सिग्नल दिला जातो. अनेक युजर्स या सिग्नलकडे दुर्लक्ष करतात आणि हॅकर्सच्या जाळ्यात अडकतात. यामुळे डेटा आणि इतर नुकसान देखील होते.
हेदेखील वाचा- Netflix प्रमाणे, Disney+ Hotstar देखील घालणार पासवर्ड शेअरिंगवर बंदी, ‘या’ महिन्यापासून नवे नियम होणार लागू