Betting App Case: गूगल-मेटावर ED ची नजर, बेटिंग अॅपला प्रोत्साहन दिल्याचा केला आरोप! चौकशीसाठी हजर राहण्याचे दिले आदेश
भारतीय अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने आज शनिवारी जगभरातील मोठ्या टेक कंपन्या गूगल आणि मेटाला नोटीस बजावली आहे. बेटिंग अॅपला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करत ईडीने या दोन्ही मोठ्या टेक कंपन्यांना नोटीस बजावली आहे. याशिवाय ईडीने दोन्ही कंपन्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे देखील आदेश दिले आहेत. २१ जुलै रोजी या दोन्ही कंपन्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ईडी ऑनलाइन बेटिंग अॅप्सच्या एका मोठ्या नेटवर्कची बारकाईने चौकशी करत आहे. यापैकी अनेक अॅप्स प्रत्यक्षात बेकायदेशीर बेटिंगला प्रोत्साहन देत आहेत. याच अॅप्सना प्रोत्साहन दिल्याचा आरोप गुगल आणि मेटावर करण्यात आला आहे. आता या दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींना तपास यंत्रणेसमोर हजर राहून प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत आणि त्यांची बाजू मांडावी लागणार आहे. ऑनलाइन बेटिंग प्रकरणात मोठ्या प्रमाणात चौकशी सुरू आहे. यामध्ये जलद कारवाई देखील केली जात आहे. खरं तर दोन्ही मोठ्या कंपन्यांना नोटीस बजावल्यामुळे आता सर्वांनाच धक्का बसला आहे. बेटिंग प्रकरणात आता या दोन्ही कंपन्यांवर कारवाई केली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
भारतीय तपास यंत्रणा ईडीने दोन्ही मोठ्या टेक कंपन्या गूगल आणि मेटावर गंभीर आरोप केले आहेत. ED ने गूगल आणि मेटावर बेटिंग अॅपला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे. आता या दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींना २१ जुलै रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहेत. यावेळी दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींना त्यांची बाजू मांडावी लागणार आहे.
बेटींग अॅप प्रकरणात ईडीने केलेली ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या कारवाईमुळे आता संपूर्ण प्रकरणाला नवीन वळण येण्याची शक्यता आहे. यापूर्वी बेटिंग अॅपप्रकरणी अनेक मोठ्या कलाकारांना नोटीस बजावण्यात आली आहे. ईडीने आरोप केला आहे की गुगल आणि मेटाने बेटिंग अॅप्सना प्रोत्साहन देण्यात सक्रिय भूमिका बजावली आणि या अॅप्सची जाहिरात केली, जेणेकरून हे बेकायदेशीर प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचू शकतील. या अॅप्सवर मनी लाँड्रिंग आणि हवालाद्वारे कोट्यवधी रुपये कमावल्याचा आरोप आहे.
ई़डी ऑनलाइन बेटिंग अॅपच्या एक मोठ्या प्रकरणाची चौकशी करत आहे. काही अॅप्स स्वत:ला ‘स्किल बेस्ड गेम्स’ सांगून बेकायदेशीरपणे ऑनलाइन बेटिंगला प्रोत्साहन देत आहे. या अॅप्सद्वारे बेकायदेशीरपणे करोडो रुपयांची कमाई केली जात आहे. ईडीने आरोप केला आहे की या अॅप्सच्या जाहिराती गुगल आणि मेटाच्या प्लॅटफॉर्मवर ठळकपणे प्रदर्शित केल्या गेल्या होत्या, ज्यामुळे त्यांचे वापरकर्ते यूजर्स होते. याच प्रकरणी आता या दोन्ही कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात ईडीने तेलुगू राज्यांतील २९ सेलिब्रिटींवर कारवाई केली. यामध्ये अभिनेता विजय देवरकोंडा, राणा दग्गुबती, प्रकाश राज, निधी अग्रवाल, प्रणिता सुभाष, मंचू लक्ष्मी आणि अनन्या नागेला यांचा समावेश आहे. याशिवाय, श्रीमुखी, श्यामला, वर्षानी सौंदर्यराजन, वासंती कृष्णन, शोभा शेट्टी, अमृता चौधरी, नयनी पवानी, नेहा पठाण, पांडू, पद्मावती, हर्षा साई आणि बय्या सनी यादव या टीव्ही कलाकार, होस्ट आणि सोशल मीडिया प्रभावकांचीही चौकशी सुरू आहे. त्यांच्यावर जंगली रम्मी, ए२३, जीटविन, पॅरिमॅच आणि लोटस३६५ सारख्या प्लॅटफॉर्मचा प्रचार केल्याचा आरोप आहे.