Elon Musk हिंदी जाणकारांना देत आहे नोकऱ्या, ऑफिसलाही जावं लागणार नाही, xAI'मध्ये रिक्त जागा
नुकतीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. माहितीनुसार, एक्सचे मालक इलॉन मस्क हिंदी भाषिकांना नोकऱ्या ऑफर करत आहेत. होय, कंपनी चांगल्या पगाराच्या लोकांना शोधत आहे ज्यांचे हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे. मस्कच्या AI कंपनी xAI मध्ये AI ट्यूटर नियुक्त केले जात आहेत. कंपनी इंग्रजी तसेच हिंदी, चीनी, रशियन आणि स्पॅनिश बोलणाऱ्या आणि समजणाऱ्यांना नोकरीच्या संधी देत आहे.
कंपनीचा उद्देश
असे करण्यामागील मस्कच्या कंपनीचा उद्देश त्यांच्या एआय मॉडेलला अधिक चांगल्या पद्धतीने प्रशिक्षित करणे हा आहे. वेगवेगळ्या भाषांचे ट्यूटर नियुक्त करण्यामागील कंपनीचे म्हणणे आहे की, यामुळे त्याच्या AI मॉडेलला लोकांच्या शंका चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल. हे ट्यूटर डेटाला लेबल करतील आणि AI चे कार्यप्रदर्शन सुधारतील. सोप्या भाषेत, हे ट्युटर्स AI’ला शिकवतील.
हेदेखील वाचा – नवा लोगो BSNL’चे नशीब बदलवणार! 24 वर्षांनी झाला बदल, 7 नवीन सर्व्हिस लाँच
AI Tutors’ची भूमिका
हे AI ट्यूटर इंग्रजी आणि हिंदीसह अनेक भाषांमध्ये xAI साठी हाय कॉलीटीचा डेटा तयार करतील. हिंदी भाषिक ट्युयर्सचा अर्थ असा आहे की इंग्रजी आणि हिंदी दोन्हीमध्ये लेबलिंग अचूकपणे केले जाऊ शकते जेणेकरून AI किमान दोन भाषांमधील भाषिक फरक समजू शकेल.
AI’ची भाषिक समज सुधारेल
xAI ला एक AI मॉडेल तयार करायचे आहे जे जगभरातील लोकांच्या प्रश्नांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत समजू शकेल आणि त्यांना उत्तर देऊ शकेल. त्यामुळे ज्यांचे हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे त्यांना कंपनी त्यात सहभागी होण्याची संधी देत आहे.
हेदेखील वाचा – JioCinema लवकरच बंद होणार? मुकेश अंबानींनी घेतला मोठा निर्णय
उत्तम वेतन मिळेल
या कामासाठी कंपनी AI ट्युटर्सना प्रति तास $35 ते $65 (रु. 2,900 ते 5,500) देण्यास तयार आहे. हे रिमोट काम आहे त्यामुळे तुम्हाला कंपनीच्या ऑफिसमध्ये जाण्याचीही गरज नाही. ही तात्पुरती नोकरी आहे, परंतु कंपनी नोकरीसोबत अनेक फायदे ऑफर करत आहे.
xAI काय आहे?
xAI हा इलॉन मस्कचा AI चॅटबॉट आहे, जो चॅट GPT आणि Google Gemini प्रमाणे काम करतो. याच्या मदतीने कोणत्याही गोष्टीचे उत्तर क्षणार्धात मिळू शकते. कंपनीने 2023 मध्ये चॅटबॉट लाँच केले. गुगल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या बड्या टेक कंपन्यांचे लोक यात काम करत आहेत. चॅटजीपीटीवर टीका केल्यानंतर मस्कने हे व्यासपीठ सुरू केले.