बीएसएनएल हळूहळू हरवलेले वैभव परत मिळवत आहे. प्रसिद्ध टेक कंपन्यांच्या रिचार्ज वाढीनंतर लाखो नवीन ग्राहक बीएसएनएलमध्ये कंपनीत सामील झाले आहेत. बीएसएनएल वेळोवेळी आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत आहे आणि त्यातच आता सरकारी मालकीच्या टेलिकॉम कंपनीने आपला नवीन लोगो सादर केला आहे. कंपनीने नवीन लोगोसह अनेक नवीन सर्व्हिस देखील सादर केल्या आहेत. हे अशा वेळी घडले आहे जेव्हा कंपनी आपली 5G सेवा सुरू करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
सध्या, BSNL ची 4G सर्व्हिस देशातील काही निवडक सर्कल्समध्ये उपलब्ध आहेत. बीएसएनएलची ही 4G सेवा हळूहळू देशभरात आणली जात आहे. टेलिकॉम कंपनी यूजर्सचा अनुभव सुधारण्याच्या उद्देशाने अनेक नवीन फीचर्स सादर करत आहे. यापैकी एक स्पॅम-मुक्त नेटवर्क आहे जे नको असलेले मेसेज किंवा स्कॅम्स स्वयंचलितपणे फिल्टर करण्यासाठी डिझाइन तयार करण्यात आले आहे.
हेदेखील वाचा – JioCinema लवकरच बंद होणार? मुकेश अंबानींनी घेतला मोठा निर्णय
नवीन लोगो बदलणार नशीब?
BSNL चा नवीन लोगो हा आत्मविश्वास, ताकद आणि संपूर्ण भारतातील पोहोच याचे प्रतीक आहे. नवीन लोगो लाँच करण्यासोबतच कंपनीने सात नवीन सर्व्हिस देखील सुरू केल्या आहेत. ज्याच्या मदतीने देशातील शहरी आणि ग्रामीण भागात कोणत्याही अडचणीशिवाय नेटवर्क कनेक्टिव्हिटी दिली जाईल.
हाय स्पीड डेटाची मजा लुटता येणार
कंपनीने आपल्या इंटरनेट ग्राहकांसाठी नॅशनल वाय-फाय रोमिंग सेवा आणली आहे. या सेवेद्वारे युजर्स हाय-स्पीड डेटाचा आनंद घेऊ शकतात. हे बीएसएनएल हॉटस्पॉटद्वारे होईल. चांगली गोष्ट म्हणजे यासाठी युजर्सना कोणतेही एक्सट्रा चार्ज देण्याची गरज नाही.
हेदेखील वाचा – सावधान! गुगल तुमच्यावर लक्ष ठेवून आहे, ताबडतोब फोनमध्ये ही सेटिंग करा, पर्सनल माहिती राहील सेफ
फायबर बेस्ड टीव्ही सर्व्हिस झाली लाँच
याशिवाय कंपनीने नवीन फायबर बेस्ड टीव्ही सर्व्हिसही सुरू केली आहे. यात 500 लाईव्ह टीव्ही चॅनेल आणि पे टीव्ही पर्याय आहेत. हे सर्व इंटरनेट सब्स्क्रायबर्ससाठी कोणत्याही शुल्काशिवाय उपलब्ध आहे. चांगली बातमी अशी आहे की टीव्ही स्ट्रीमिंगसाठी वापरलेला डेटा त्यांच्या मंथली इंटरनेट भत्त्यामध्ये मोजला जाणार नाही.
नवीन सिम खरेदी करणे झाले सोपे
कंपनीने किओस्क सर्व्हिस देखील आणली आहे, ज्याच्या मदतीने ग्राहकांना नवीन सिम खरेदी, अपग्रेड आणि स्विचिंगमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. यामध्ये केवायसी प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल. शेवटी, कंपनीने देशातील पहिले डायरेक्ट टू डिव्हाईस (D2D) कनेक्टिव्हिटी सोल्यूशन सादर केले आहे, जे सॅटलाइट आणि मोबाइल नेटवर्कचे एक मिश्रण असेल. कंपनीची ही सर्व्हिस एमरजंसी आणि दुर्गम भागात नियमित नेटवर्क कनेक्टिव्हिटीशिवाय डिजिटल पेमेंट करण्यास परमिशन देईल.