Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Elon Musk पुन्हा करणार मोठा धमाका! लहान मुलांसाठी घेऊन येणार AI मित्र ‘Baby Grok’, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

Baby Grok: जगात आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) वेगाने बदलत आहे आणि आता ते मुलांसाठीही सुरक्षित करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलोन मस्क यांनी अलीकडेच एक मोठी घोषणा केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 21, 2025 | 11:23 AM
Elon Musk पुन्हा करणार मोठा धमाका! लहान मुलांसाठी घेऊन येणार AI मित्र 'Baby Grok', सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

Elon Musk पुन्हा करणार मोठा धमाका! लहान मुलांसाठी घेऊन येणार AI मित्र 'Baby Grok', सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही काळापासून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तिंपैकी एक असलेला आणि सोशल मीडिया एक्सचा मालक एलन मस्क चर्चेत आहे. या चर्चेचं कारण आहे AI चॅटबॉट Grok. मस्क AI चॅटबॉट Grok मध्ये वारंवार नवीन फीचर घेऊन येत आहे. युजर्स अनुभव अधिक चांगला व्हावा, या उद्देशाने सतत नवीन फीचर रोलाआऊट केले जात आहेत. लोक X वर ट्विट करत आहेत आणि त्याला निर्भयपणे प्रश्न विचारत आहेत आणि तो त्वरित उत्तर देखील देत आहे. त्यामुळे AI चॅटबॉट Grok च्या युजर्स संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हीच प्रगती सुरु असताना आता एलन मस्कने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि सोशल मीडियावर पोस्ट करत एक घोषणा केली आहे.

Redmi 15C: ग्लोबल मार्केट्समध्ये लवकरच लाँच होणार हा बजेट Smartphone, लाँचपूर्वी समोर आले Amazing फीचर्स

लाँच करणार किड्स फ्रेंडली अ‍ॅप

खरं तर, मस्कने 20 जुलै रोजी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये एक घोषणा केली आहे. मस्कने म्हटलं आहे की, आता त्यांची कंपनी xAI एक डेडिकेटेड किड्स फ्रेंडली बेबी ग्रोक अ‍ॅप लाँच करण्याची तयारी करत आहे. हे अ‍ॅप खास लहान मुलांसाठी लाँच केलं जाणार आहे. त्यामुळे AI चॅटबोट Grok पेक्षा हे नवीन बेबी ग्रोक वेगळं असणार आहे. यामध्ये फीचर्स देखील बदलले जाऊ शकतात, ज्यामुळे ते युजर्सना वापरण्यात सोपं होईल. असं सांगितलं जात आहे की लहान मुलांना बेबी ग्रोकचा फायदा होऊ शकतो.  (फोटो सौजन्य – Pinterest)

We’re going to make Baby Grok @xAI, an app dedicated to kid-friendly content — Elon Musk (@elonmusk) July 20, 2025

काय आहे Baby Grok?

‘Baby Grok’ हे सध्या उपलब्ध असणाऱ्या AI चॅटबॉट Grok चे एक किड-फ्रेंडली वर्जन असणार आहे. हे अ‍ॅप मुलांना सुरक्षित, शैक्षणिक आणि मनोरंजक AI अनुभव देऊ शकते. इतकेच नाही तर हे अ‍ॅप मुलांच्या भाषा, समज आणि आवडीनुसार कंटेट देखील सादर करू शकते. ज्यामुळे लहान मुलं सुरक्षितपणे AI चा वापर करू शकतात.

Baby Grok अ‍ॅप लहान मुलांना कसा होणार फायदा?

Baby Grok लहान मुलांसाठी एक सुरक्षित आणि मजेदार असं AI चॅटबॉट बनू शकतं, जे कोणत्याही चुकीच्या कंटेंटशिवाय मुलांसाठी फक्त सर्वोत्तम माहिती प्रदान करेल. यासोबतच, मुलांना खेळताना या अ‍ॅपद्वारे खूप काही शिकता येईल. त्यामुळे खेळासोबतच अभ्यास देखील होणार आहे. शैक्षणिक खेळ, क्विझ आणि कथा सांगणे यासारख्या फीचर्सचाही यात समावेश आहे, ज्यामुळे मुलांची शिकण्याची क्षमता वाढेल. याशिवाय खेळ आणि विविध अ‍ॅक्टिव्हिटीमुळे मुलांना शिकण्यात आवड निर्माण होते.

Betting App Case: गूगल-मेटावर ED ची नजर, बेटिंग अ‍ॅपला प्रोत्साहन दिल्याचा केला आरोप! चौकशीसाठी हजर राहण्याचे दिले आदेश

याशिवाय, AI सोबत बोलल्याने मुलांची भाषा, तर्क आणि प्रश्न विचारण्याची सवय विकसित होईल जी त्यांच्या सर्जनशील विचारसरणीसाठी फायदेशीर आहे. त्याच वेळी, अ‍ॅपमध्ये काही पालक नियंत्रण वैशिष्ट्ये देखील पाहिली जाऊ शकतात, ज्यामुळे पालक अ‍ॅपचे निरीक्षण करू शकतात आणि कंटेंट कस्टमाइझ करू शकतात. यामुळे मुलांपर्यंत कोणतीही चुकीची माहिती जाणार आहे.

Web Title: Elon musk is planning launch baby grok for children shared post on social media tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2025 | 11:21 AM

Topics:  

  • AI technology
  • elon musk
  • Tech News

संबंधित बातम्या

ओप्पोचा खास दिवाळी धमाका! Oppo Reno 14 5G Diwali Edition लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
1

ओप्पोचा खास दिवाळी धमाका! Oppo Reno 14 5G Diwali Edition लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Flipkart Big Billion Days: ज्याची भिती होती, शेवटी तेच झालं! युजर्सचं स्वप्न भंगलं, Flipkart वर कॅन्सल झाल्या iPhone वाल्या ऑर्डर
2

Flipkart Big Billion Days: ज्याची भिती होती, शेवटी तेच झालं! युजर्सचं स्वप्न भंगलं, Flipkart वर कॅन्सल झाल्या iPhone वाल्या ऑर्डर

Flipkart – Amazon Sale 2025: हिवाळा आला रे! थंडीवर मात करण्यासाठी खरेदी करा टॉप 5 बजेट गीझर्स, सेलमध्ये जबरदस्त ऑफर्स उपलब्ध
3

Flipkart – Amazon Sale 2025: हिवाळा आला रे! थंडीवर मात करण्यासाठी खरेदी करा टॉप 5 बजेट गीझर्स, सेलमध्ये जबरदस्त ऑफर्स उपलब्ध

YouTube वर आले जबरदस्त AI फीचर; आता लहान मुलांना चुकूनही पाहता येणार नाही Adult Content
4

YouTube वर आले जबरदस्त AI फीचर; आता लहान मुलांना चुकूनही पाहता येणार नाही Adult Content

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.