Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Air Purifier Placement: कोपऱ्यात ठेवताय का Air Purifier? चूक पडू शकते महागात, कुठे ठेवावा Easy Tips

Air Purifier Placement: एअर प्युरीफायर खरेदी केल्यानंतर किचनच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवणं योग्य नाही. चुकीच्या ठिकाणी ठेवल्याने तो लवकर खराब होतो. नक्की कोणत्या ठिकाणी ठेवावा सोप्या टिप्स

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 11, 2026 | 10:46 AM
tech news: Air Purifier ठेवण्याची योग्य जागा (फोटो सौजन्य - iStock)

tech news: Air Purifier ठेवण्याची योग्य जागा (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • एअर प्युरीफायर खरेदी केल्यानंतर कुठे ठेवावा
  • किचनमध्ये नक्की योग्य ठिकाण कोणते
  • एअर प्युरीफायरची जागा योग्य का असावी?
Air Purifier Placement: घरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी हिवाळ्यात एअर प्युरिफायरचा वापर वाढतो. पण, केवळ एक महागडा किंवा सुसज्ज एअर प्युरिफायर खरेदी करणे पुरेसे नाही. त्याच्या जागेचाही त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. जागा वाचवण्यासाठी लोक अनेकदा ते कोपऱ्यात, सोफ्याच्या मागे किंवा पडद्यांजवळ ठेवतात, परंतु यामुळे स्वच्छ हवा आत घेण्याची आणि बाहेर सोडण्याची मशीनची क्षमता कमी होऊ शकते. 

एअर प्युरिफायर खोलीतील प्रदूषित हवा आत घेतो, फिल्टरद्वारे धूळ, ॲलर्जीकारक घटक आणि इतर प्रदूषक काढून टाकतो आणि नंतर स्वच्छ हवा पुन्हा खोलीत सोडतो. त्यामुळे, जर त्याच्या सभोवताली योग्य जागा उपलब्ध नसेल, तर हवेच्या योग्य अभिसरणात अडथळा येईल. म्हणूनच, एअर प्युरिफायरसाठी योग्य जागा निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला तर मग, घरात ते कुठे ठेवणे सर्वोत्तम ठरेल हे जाणून घेऊया 

वाढत्या प्रदूषण आणि धुक्यापासून एअर प्युरिफायर करेल तुमचं संरक्षण, खरेदी करण्यापूर्वी महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

एअर प्युरीफायरची जागा 

एअर प्युरीफायर अशा ठिकाणी ठेवावा जिथे हवा खेळती असेल आणि चारही बाजूने हवा लागेल. जागेचा मधला भाग हा एअर प्युरीफायरसाठी योग्य ठरू शकतो. यामुळे मशीनला वेगवेगळ्या बाजूने हवा खेचणं सोयीस्कर ठरतं. जर मध्यभागी ठेवणं शक्य नसेल तर एखादी मोकळी जागा तुम्ही यासाठी निवडावी 

कुठे ठेऊ नये 

एअर प्युरीफायर हा भिंत, सोफा अथवा जड फर्निचरच्या मध्ये अजिबात ठेऊ नका. या गोष्टींच्या आणि एअर प्युरीफायरच्या मध्ये किमान २ फुटाचं अंतर असू द्यावं. यामुळे एअर इनटेक आणि आऊटलेट ब्लॉक होणार नाहीत आणि मशीन उत्तमरित्या हवा फिल्टर करू शकेल. त्यामुळे तुम्ही ही काळजी घेणं आवश्यक आहे. 

तुम्ही रात्री एअर प्युरीफायर चालू करणार असाल तर आपल्या बेडपासून काही अंतरावर हा ठेवा. स्वच्छ आणि खेळती हवा तुमच्यापर्यंत पोहचेल हाच तुमचा प्रयत्न असू द्या. तसंच मशीनचा एअरफ्लो सरळ चेहऱ्यावर येणार नाही याचीही काळजी घ्या 

कागदावर हवा नको 

तुम्ही एखाद्या ठिकाणी घरात बसून काम करणार असाल आणि एअर प्युरीफायरचा वापर करणार असाल तर तुमच्या डेस्कजवळ हे ठेऊ शकता मात्र, कागदांना हवा लागणार नाही याची काळजी तुम्ही अशावेळी घ्यायला हवी. याशिवाय आजूबाजूला असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर याची हवा जाणार नाही याबाबतही तुम्ही दक्षता घ्या 

आर्द्रतेमुळे हैराण आहात का? मग ‘या’ स्मार्ट गॅजेट्सचा वापर करा

दरवाजे-खिडक्यांपासून लांब ठेवा 

याशिवाय तुम्ही एअर प्युरीफायर दरवाजे आणि खिडक्यांजवळ अजिबात ठेऊ नका. बाहेरून येणाऱ्या प्रदूषणामुळे मशीन सतत तुम्हाला स्वच्छ करावे लागू शकते. प्रदूषण वाढत असेल तर खिडकी – दरवाजेही बंद ठेवा. पण तुमचा एअर प्युरीफायर लवकर खराब होऊ नये वाटत असेल तर ही काळजी नक्की घ्या 

तुमचा एअर प्युरीफायर लहान आकाराचा असेल तर तुम्ही डेस्क, टेबल वा स्टूलवर नक्कीच ठेऊ शकता. यामुळे योग्य पद्धतीने हवा सर्क्युलेट करण्यास मदत मिळते. एअरवेंट उघडे राहतील अशाच ठिकाणी हे मशीन ठेवा. याशिवाय फिल्टरची नियमित स्वच्छता ठेवायला विसरू नका. 

💡

Frequently Asked Questions

  • Que: एअर प्युरीफायरची साधारण किंमत कितीपासून सुरू होते

    Ans: भारतात एअर प्युरिफायरची किंमत ब्रँड, वैशिष्ट्ये आणि खोलीच्या आकारानुसार अंदाजे ₹3,999 ते ₹5,000 पासून सुरू होते आणि ₹35,000 किंवा त्याहून अधिक पर्यंत जाते

  • Que: कोणत्या कंपनीचा एअर प्युरीफायर चांगला मानला जातो?

    Ans: भारतात सर्वोत्तम एअर प्युरिफायर निवडताना, फिलिप्स, कोवे, हनीवेल आणि क्यूबो यांचे मॉडेल्स सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी मानले जातात

  • Que: Air Purifier कशा पद्धतीने काम करतो?

    Ans: एअर प्युरिफायर खोलीतील हवा आत घेतो, त्यातील धूळ, घाण आणि सूक्ष्म कण काढून टाकण्यासाठी ती गाळतो आणि नंतर शुद्ध केलेली हवा पुन्हा खोलीत सोडतो

Web Title: Air purifier placement easy tips to know right place for better air quality dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 10:46 AM

Topics:  

  • Air Purifier
  • Tech News
  • technology news

संबंधित बातम्या

New Caller ID Rule: Truecaller ला टक्कर! आता फोनवरच दिसणार अनोळखी कॉल करणाऱ्याचं नाव
1

New Caller ID Rule: Truecaller ला टक्कर! आता फोनवरच दिसणार अनोळखी कॉल करणाऱ्याचं नाव

Smartphone Buying Guide: दिवाळीत नवा फोन घेण्याचा प्लॅन? दुकानातून बाहेर पडण्याआधी ‘या’ 10 गोष्टी तपासा
2

Smartphone Buying Guide: दिवाळीत नवा फोन घेण्याचा प्लॅन? दुकानातून बाहेर पडण्याआधी ‘या’ 10 गोष्टी तपासा

Refrigerator Not Cooling? फ्रिज बिघडलाय की फक्त सेटिंग चुकलीय? मेकॅनिकला बोलावण्याआधी करा हे 5 चेक
3

Refrigerator Not Cooling? फ्रिज बिघडलाय की फक्त सेटिंग चुकलीय? मेकॅनिकला बोलावण्याआधी करा हे 5 चेक

Oppo Reno 17 स्मार्टफोनचा लूक आला समोर; कॅमेरा मॉड्यूलसह दिसणार ‘ग्लोइंग कॅट’ डिझाईन, चाहते थक्क
4

Oppo Reno 17 स्मार्टफोनचा लूक आला समोर; कॅमेरा मॉड्यूलसह दिसणार ‘ग्लोइंग कॅट’ डिझाईन, चाहते थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.