Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतापूर्वी या देशात सुरु होणार Elon Musk ची स्टारलिंक सेवा, आता सिमशिवाय वापरता येणार इंटरनेट

Elon Musk Starlink: गेल्या अनेक महिन्यांपासून अशी चर्चा सुरु आहे की, एलन मस्कची स्टारलिंक सेवा भारतात सुरु होणार आहे. पण आता भारतात मान्यता मिळण्यापूर्वी बांगलादेशात स्टारलिंकचा मार्ग मोकळ झाला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 08, 2025 | 07:45 PM
भारतापूर्वी या देशात सुरु होणार Elon Musk ची स्टारलिंक सेवा, आता सिमशिवाय वापरता येणार इंटरनेट

भारतापूर्वी या देशात सुरु होणार Elon Musk ची स्टारलिंक सेवा, आता सिमशिवाय वापरता येणार इंटरनेट

Follow Us
Close
Follow Us:

भारतात एलन मस्कची स्टारलिंक सेवा कधी सुरु होणार, याबाबत प्रचंड चर्चा सुरु आहे. स्टारलिंकच्या सेवेसाठी भारतीय प्रचंड उत्सुक आहेत. कारण भारतातील ज्या भागात इंटरनेटचा अभाव अशा लोकांना स्टारलिंकमुळे इंटरनेटचा वापर करता येणार आहे. मात्र भारतात स्टारलिंकचा मार्ग अद्याप स्पष्ट नाही. कारण सरकारने अद्याप स्टारलिंकसाठी मान्यता दिलेली नाही. भारतातील स्टारलिंकच्या सेवेबाबत चर्चा सुरु असतानाच आता एक असा देश आहे ज्याने स्टारलिंकच्या सेवेला मान्यता दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

WhatsApp घेऊन येतोय नवीन फीचर्स, आता युजर्सची सिक्योरिटी होणार अधिक पावरफुल! जाणून घ्या सविस्तर

स्टारलिंक सेवा बांगलादेशात सुरु होणार

भारतापूर्वी आता एलन मस्कची स्टारलिंक सेवा बांगलादेशात सुरु होण्याची शक्यता आहे. असं सांगितलं जात आहे की, स्टारलिंकला बांगलादेशात कामकाज सुरू करण्याचा परवाना देण्यात आला आहे. याबाबत सोमवारी घोषणा करण्यात आली आहे. वृत्तानुसार, बांगलादेश गुंतवणूक विकास प्राधिकरणाचे चौधरी आशिक महमूद यांनी रविवारी ही माहिती दिली. त्यामुळे आता भारतापूर्वी बांगलादेशातील लोकांनी एलन मस्कची स्टारलिंक सेवा वापरता येणार आहे. ही सेवा बांगलादेशात कधी सुरु केली जाणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही.  (फोटो सौजन्य – Pinterest)

स्टारलिंकचे महत्त्वाचे अपडेट

बांगलादेश गुंतवणूक विकास प्राधिकरणाचे चौधरी आशिक महमूद यांनी सांगितलं होतं की, ‘स्टारलिंकला देशात काम करण्यास मान्यता देण्यात आली आहे. कंपनी आता येथे आपली सेवा सुरू करू शकते.’ त्यामुळे भारतीयांप्रमाणेच बांगलादेशातील लोकं सुद्धा स्टारलिंक इंटरनेट सुरु होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतात स्टारलिंकच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा होत असतानाच बांगलादेशात मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून स्टारलिंक भारतातही सेवा सुरू करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. जिओ आणि एअरटेल दोघांनीही स्टारलिंकशी हातमिळवणी केली होती. दोन्ही कंपन्या एकत्रितपणे ही सेवा सुरू करणार आहेत. त्यामुळे आता बांगलादेशानंतर भारतात देखील स्टारलिंकची सेवा सुरु होईल, अशी अपेक्षा आहे.

तज्ज्ञांनी काय सांगितलं

ढाका अंतरिम प्राधिकरणाकडून राजनैतिक मदत घेतली जात आहे. बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, हे बांगलादेशचे एक राजनैतिक पाऊल देखील असू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे. कारण स्टारलिंकचे मालक एलन मस्क यांना व्हाईट हाऊसमध्ये मोठा पाठिंबा आहे. मस्क अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत अनेक प्लॅटफॉर्म शेअर करतात. अलिकडेच अमेरिकेने बांगलादेशी वस्तूंवर 37% पर्यंत कर लादला आहे. तर यापूर्वी कापसावर फक्त 16% दर आकारला जात होता. त्यामुळे एलन मस्कची स्टारलिंक सेवा सुरु केल्यामुळे बांगलादेशातील सरकारला एक प्रकारे फायदा होऊ शकतो, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

1674 चा तो ‘सुवर्णक्षण’, छत्रपती शिवयारांचा राज्याभिषेक सोहळा! सोशल मीडियावर व्हायरल होतोय AI Video, पाहून अंगावर शहारे येतील

आयात शुल्क कमी करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल

डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांसाठी शुल्क वाढवले ​​आहे. यामध्ये भारताचे नावही समाविष्ट आहे. स्टारलिंक लवकरच उपखंडात प्रवेश करणार आहे. आयात शुल्क कमी करण्यासाठी वेगवेगळे देश रणनीती आखत आहेत. बांगलादेशचे हे पाऊल याचाच एक भाग मानले जात होते. या प्रकरणात, बांगलादेश सरकार मस्ककडे मदत मागू शकते. आग्नेय आशियामध्ये स्टारलिंककडून व्यवसायाचा विस्तार केला जात आहे. तो भारत आणि बांगलादेशच्या बाजारपेठेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे.

Web Title: Elon musk satellite internet service will start in bangladesh before india tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • elon musk
  • Starlink Internet Service
  • Tech News

संबंधित बातम्या

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज
1

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या
2

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…
3

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…

करोडपती होण्याची सुवर्णसंधी! iPhone हॅक करा आणि मिळणार करोडो रुपये! Apple घेऊन आलाय आतापर्यंतचं सर्वात मोठं बक्षीस
4

करोडपती होण्याची सुवर्णसंधी! iPhone हॅक करा आणि मिळणार करोडो रुपये! Apple घेऊन आलाय आतापर्यंतचं सर्वात मोठं बक्षीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.