टेलिग्राम सीईओ Pavel Durov ची अटक योग्य की अयोग्य? काय म्हणाला Elon Musk, वाचा सविस्तर (फोटो सौजन्य- pinterest)
टेलिग्राम सीईओ Pavel Durov याला शनिवार 24 ऑगस्ट रोजी फ्रान्समध्ये अटक करण्यात आली. टेलिग्रामवरील वाढत्या गुन्हेगारीचे कारण देत पोलिसांनी Pavel Durov याला ताब्यात घेतलं. Pavel Durov सध्या फ्रान्स अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. Pavel Durov याच्या अटकेनंतर आता टेलिग्रामबाबत अनेक तर्क वितर्क सुरु झाले आहेत. Pavel Durov च्या अटकेनंतर टेक अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली आहे. Pavel Durov ची अटक योग्य की अयोग्य, यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
हेदेखील वाचा- टेलिग्राम सीईओ Pavel Durov च्या अटकेनंतर टेक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली चिंता
अनेक टेक अधिकारी आणि उद्योजकांनी या अटकेवर टीका करत हे मानवाधिकारांचे उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. फ्रेंच पोलिसांनी Pavel Durov वर अनेक गंभीर आरोप लावले आहेत, ज्यामध्ये त्याला 20 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. Pavel Durov च्या अटकेवर आता X चा मालक Elon Musk, एडवर्ड स्नोडेन यांच्यासह जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांचे मालक आणि सीईओ यांनी आपलं मत मांडलं आहे. तसेच त्यांनी Pavel Durov च्या अटकेला विरोध केला आहे. टेस्ला सीईओ Elon Musk याने Pavel Durov च्या अटकेवर प्रतिक्रिया देत एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. त्याने पोस्टच्या शीर्षस्थानी #FreePavel चा वापर केला आणि नंतर Pavel Durov दर्शविणारा 1 मिनिटापेक्षा जास्त लांब व्हिडिओ पोस्ट केला आहे.
तर माजी NSA व्हिसलब्लोअर एडवर्ड स्नोडेन यांनी Pavel Durov च्या अटकेचा निषेध केला आहे. एडवर्ड स्नोडेन यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले आहे आणि अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, Pavel Durov ची अटक हा मानवी हक्कांवर हल्ला आहे. खाजगी संप्रेषणांमध्ये प्रवेश केल्याबद्दल मॅक्रॉनला अटक केली जात आहे, याचे मला आश्चर्य आणि दु:ख झाले आहे. हे केवळ फ्रान्सच नाही तर जगाला लाजवेल.
हेदेखील वाचा- टेलिग्राम ॲपचे सीईओ Pavel Durov यांना फ्रान्समध्ये अटक; राजकीय दबाव की आणखी काही? काय आहे कारण
अमेरिकन उद्योजक बालाजी श्रीनिवासन यांनीही फ्रान्स सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. तो म्हणाला की, फ्रान्स सरकारला गुन्हेगारीपेक्षा इतर गोष्टींवर नियंत्रण ठेवायचे आहे. संगणक शास्त्रज्ञ आणि लेखक पॉल ग्रॅहम यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले आणि या अटकेवर त्यांचे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, ज्या देशात स्टार्टअप हब बनवले जात आहे, त्याच देशात टेलिग्रामच्या सीईओला अटक झाली आहे, यावर विश्वास ठेवणे फार कठीण आहे.
दरम्यान, फ्रेंच पोलिसांनी Pavel Durov वर गंभीर आरोप केले आहेत, जे खरे सिद्ध झाल्यास जास्तीत जास्त 20 वर्षांची शिक्षा होऊ शकते. पोलीस तपासाचा एक भाग म्हणून त्याची अटक करण्यात आली असून, त्यात हे ॲप नियंत्रक म्हणून आपली भूमिका पार पाडण्यात अपयशी ठरले आहे आणि त्यावर अनेक गुन्हेगारी कारवाया झाल्याचे आढळून आले आहे. Pavel Durov च्या अटकेची बातमी जगभर वणव्यासारखी पसरली. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तो 120 व्या क्रमांकावर आहे. 2014 मध्ये त्यांनी रशिया सोडला. आता तो दुबईत राहतो आणि त्याच्याकडे फ्रान्स आणि यूएई या दोन देशांचे नागरिकत्व आहे.