Father’s Day 2025: फक्त स्मार्टवॉच नाही, यंदा फादर्स डे वडीलांना गिफ्ट करा त्यांचा हेल्थ पार्टनर! किंमत 2500 हजारांहून कमी
Father’s Day 2025 Marathi News: 15 जून रोजी म्हणजेच उद्या फादर्स डे साजरा केला जाणार आहे. यंदा फादर्स डे ला आपल्या वडीलांना काय गिफ्ट द्यावं, यासाठी तुम्ही देखील गोंधळले आहात का? यंदाच्या फादर्स डे ला तुम्ही तुमच्या वडीलांना काहीतरी नवीन आणि त्यांना फायदेशीर ठरेल, अंस गिफ्ट देऊ शकता. या फादर्स डे ला तुम्ही तुमच्या वडीलांना त्यांचा हेल्थ पार्टनर म्हणजेच स्मार्टवॉच गिफ्ट करू शकता. आता आम्ही तुम्हाला काही बेस्ट स्मार्टवॉचबद्दल सांगणार आहोत. या स्मार्टवॉचची किंमत 2500 रुपयांहून कमी आहे.
Father’s Day 2025: आपल्या बाबांना गिफ्ट करा हे जबरदस्त कॅमेरा स्मार्टफोन्स, किंमत 25,000 हून कमी
सध्या बाजारात असे अनेक स्मार्टवॉच उपलब्ध आहेत, ज्यामध्ये हेल्थ अपडेट्स आणि वेगवेगळे फीचर्स देण्यात आलेले आहेत. ब्लड प्रेशरपासून हार्ट रेट ट्रॅकिंगपर्यंत अनेक फीचर्स या स्मार्टवॉचमध्ये दिलेले आहेत. त्यामुळे असे स्मार्टवॉच तुमच्या वडीलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मदत करणार आहेत. चला तर मग अशा काही स्मार्टवॉचबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
ई-कॉमर्स शॉपिंग साईट अॅमेझॉनवरून तुम्ही Boult चे Trail Pro स्मार्टवॉच केवळ 1699 रुपयांत खरेदी करू शकता. Boult च्या या स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला 2 इंचाचा 3D Curved AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हे स्मार्टवॉच IP68 रेटिंगसह लाँच करण्यात आले आहे. यामध्ये धूळ आणि पाण्याची देखील चिंता नाही. याशिवाय यामध्ये 250+ वॉचफेस सपोर्ट आणि 123+ स्पोर्ट्स मोड देखील आहे. यासोबतच ब्लूटूथ कॉलिंगसह या स्मार्टवॉचमध्ये ब्लड प्रेशर पासून हार्ट रेट ट्रॅकिंग सारख्या फीचर्सचा सपोर्ट देण्यात आला आहे.
ई-कॉमर्स शॉपिंग साईट अॅमेझॉनवरून तुम्ही boAt Ultima Prime स्मार्टवॉच 1,899 रुपयांत खरेदी करू शकता. boAt च्या या स्मार्टवॉचमध्ये 1.43 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टवॉचमध्ये अनेक फीचर्स दिले आहेत. जसं की या स्मार्टवॉचच्या मदतीने म्यूझिक आणि कॅमेरा कंट्रोल केला जाऊ शकतो. याशिवाय या वॉचमध्ये 100+ स्पोर्ट्स मोड्ससह अनेक हेल्थ ट्रॅकिंग फीचर्स देखील आहेत. जसं की, हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर, ऑक्सीजन लेव्हल ट्रॅक केलं जाऊ शकतं.
ई-कॉमर्स शॉपिंग साईट अॅमेझॉनवरून तुम्ही Redmi Watch 5 Active स्मार्टवॉच 2,249 रुपयांत खरेदी करू शकता. यामध्ये 2 इंचाचा HD डिस्प्ले देण्यात आला आहे. IPX8 रेटिंगसह या वॉचमध्ये जिंक अलॉय बॉडी दिली आहे. यामध्ये 200 हून अधिक वॉचफेस सपोर्ट आहे. स्पेशल फीचर्सबद्दल बोलायंच झालं तर हे वॉच तुम्हाला वेदर अपडेट देखील देणार आहे. यामध्ये 18 दिवस चालणारी बॅटरी देण्यात आली आहे.
Father’s Day 2025: यंदाच्या फादर्स डे ला आपल्या वडीलांना करा खुश, गिफ्ट करा हे Useful Gadgets
ई-कॉमर्स शॉपिंग साईट अॅमेझॉनवरून तुम्ही Fastrack Limitless FR1 Pro स्मार्टवॉच 2,399 रुपयांत खरेदी करू शकता. यामध्ये 1.39 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय यामध्ये Split स्क्रीन फीचर देखील आहे. IP68 रेटिंगवाल्या या स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला 5 दिवस चालणारी बॅटरी देखील आहे. यामध्ये 200 हून अधिक वॉचफेस सपोर्ट देण्यात आला आहे.