Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावधान! या धोकादायक ॲप्स डाउनलोड करताच तुमचे बँक अकाउंट होईल रिकामे, FBI ने जारी केला अलर्ट

Fraud Alert: अमेरिकेची सुरक्षा एजन्सी एफबीआयने सायबर धोक्याबाबत एक अलर्ट जारी केला होता. या धोकादायक ॲप्सच्या माध्यमातून अनेक बँक खात्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे एजन्सीने म्हटले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 27, 2025 | 08:32 AM
सावधान! या धोकादायक ॲप्स डाउनलोड करताच तुमचे बँक अकाउंट होईल रिकामे, FBI ने जारी केला अलर्ट

सावधान! या धोकादायक ॲप्स डाउनलोड करताच तुमचे बँक अकाउंट होईल रिकामे, FBI ने जारी केला अलर्ट

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोनच्या वापरामुळे आपले जीवन सोपे झाले आहे. आजकाल प्रत्येक कामासाठी आपल्याला आपल्या स्मार्टफोनची गरज भासते. पर्सनल कामांपासून ते प्रोफेशनल कामांपर्यंत आपल्याला आपल्या स्मार्टफोनची फार मदत होत असते. परंतु त्यासोबतच सध्या सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. स्मार्टफोन युजर्सना काही धोकादायक ॲप्सपासून दूर राहण्याचा सल्ला देत अलीकडेच एक गंभीर इशारा जारी करण्यात आला आहे. हे ॲप्स खरे दिसतात, परंतु ते डाउनलोड केल्यावर ते तुमचा पर्सनल डेटा हॅकर्सच्या समोर आणू शकतात.

FBI ने जारी केला अलर्ट

अमेरिकेची सुरक्षा एजन्सी एफबीआयने (FBI) 18 जानेवारी रोजी या धोक्याबाबत अलर्ट जारी केला होता. या धोकादायक ॲप्सच्या माध्यमातून अनेक बँक अकाउंट्सना लक्ष्य करण्यात आल्याचे एजन्सीने म्हटले आहे. या ॲप्सद्वारे, हॅकर्स डिव्हाइसमध्ये प्रवेश करतात आणि नंतर बँक कर्मचारी असल्याचे दाखवून युजर्सची फसवणूक करतात. हॅकर्स युजर्सना त्यांच्या बँक अकाउंटवर हल्ला झाल्याचे सांगण्यासाठी ‘फँटम हॅकर’ तंत्राचा वापर करतात. घाबरून, लोक त्यांचे पैसे “सुरक्षित” अकाउंटमध्ये ट्रान्स्फर करतात, जे प्रत्यक्षात स्कॅमर्ससाठी एक सापळा आहे.

Gmail Tips: हॅकर्स पण वाचू नाही शकणार तुमचा सिक्रेट ई-मेल, Mail करण्यापूर्वी ही सेटिंग करा

या ॲप्सना चुकूनही डाउनलोड करू नका

व्हॉट्सॲप किंवा एसएमएसद्वारे मिळालेल्या लिंकवरून ॲप्स डाउनलोड करू नका
ईमेलद्वारे पाठवलेल्या लिंक किंवा APK फाइल्सवर विश्वास ठेवू नका
थर्ड पार्टी ॲप स्टोअरमधून ॲप्स डाउनलोड करणे टाळा
सोशल मीडियावर आढळलेल्या रीडायरेक्ट लिंकवर क्लिक करू नका

सुरक्षित राहण्याचे उपाय

ॲपची सत्यता तपासा
कोणतेही ॲप डाउनलोड करण्यापूर्वी, त्याचे रेटिंग, रिव्ह्यू आणि डेव्हलपरविषयीची माहिती तपासा

बँकिंग ॲप्स काळजीपूर्वक डाउनलोड करा
बँकिंग किंवा वित्तीय ॲप्स फक्त बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करा

बनावट ॲप्सपासून सावध राहा
गुगल आणि ॲपल स्टोअरवर उपलब्ध असलेले बनावट ॲप्स टाळण्यासाठी सावधगिरी बाळगा

अनावश्यक परवानग्या देऊ नका
घाईघाईत अनेकदा आपण ॲप्सच्या सर्व पेरमिशन्स एक्सेप्ट करतो मात्र असे करणे धोक्याचे ठरू शकते. कोणत्याही ॲपला अनावश्यक पेरमिशन्स देणे टाळा

सर्वात जास्त युज होत आहेत हे 20 पासवर्ड, सायबर गुन्हेगारांना खुले आमंत्रण; तुम्हीही ही चूक तर करत नाही?

या गोष्टी ध्यानात असूद्यात

हॅकर्स सतत नवनवीन मार्गाने लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात. स्मार्टफोन युजर्सने सावध असले पाहिजे आणि कोणत्याही अज्ञात लिंक्स किंवा ॲप्सवर क्लिक करण्यापूर्वी त्यांची सत्यता सुनिश्चित केली पाहिजे. तुमचा थोडासा निष्काळजीपणा तुमच्या बँक अकाउंटला रिकामे करू शकते. त्यामुळे, सतर्क रहा आणि तुमच्या डिजिटल सुरक्षिततेला प्राधान्य द्या.

Web Title: Fbi issues warning over fraud apks and phishing over e mails and message know in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2025 | 08:32 AM

Topics:  

  • Cyber Fraud

संबंधित बातम्या

Cyber Fraud News: परिवहन विभागाचे ई-चलन लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन; फक्त अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करा
1

Cyber Fraud News: परिवहन विभागाचे ई-चलन लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन; फक्त अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करा

Mumbai Cyber Fraud: आता चोरांनी थेट हद्दच केली पार! सरन्यायाधीशांच्याच नावाचा केला वापर; महिलेची ३ कोटी ७५ लाखांची ऑनलाइन लूट
2

Mumbai Cyber Fraud: आता चोरांनी थेट हद्दच केली पार! सरन्यायाधीशांच्याच नावाचा केला वापर; महिलेची ३ कोटी ७५ लाखांची ऑनलाइन लूट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.