
Google I/O 2026: अवघे काही तास शिल्लक! AI पासून अँड्रॉईड 17 पर्यंत... सुंदर पिचाई आज करू शकतात या घोषणा
आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये कंपनी अँड्रॉईड 17 साठी काही नवीन अपडेट्सची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन अपडेट्समुळे स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि गाड्यांमध्ये जेमिनी एआय इंटीग्रेशन पूर्वीपेक्षा अधिक जबरदस्त बनू शकते. (फोटो सौजन्य – Google )
याशिवाय, ईव्हेंटमध्ये कंपनी त्यांच्या नवीन अँड्रॉईड एक्सआर प्लॅटफॉर्म आणि AI बेस्ड स्मार्ट ग्लासेसबाबत देखील काही मोठ्या घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी कंपनीने अनेक फॅशन आणि टेक ब्रँड्ससोबत पार्टनरशिप केलं असल्याचं सांगितलं जात आहे.
रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जात आहे की, गुगल त्यांचे जेमिनी एआय मोठ्या अपग्रेडसह रोलआऊट करू शकते. नवीन जेमिनी टेक्स्ट, फोटो, व्हिडीओ, ऑडियो आणि कोड एकत्र समजू शकेल आणि प्रोसेस करण्यासाठी सक्षम असणार आहे. यासोबतच याचा इंटरफेस देखील पूर्णपणे नवीन लुकमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आयोजित करण्यात आलेल्या गुगल ईव्हेंटदरम्यान आज कंपनी त्यांचे नवीन डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टम ॲल्युमिनियम ओएस देखील सादर करणार असल्याची शक्यता आहे. हे ओएस अँड्रॉइड आणि क्रोमओएस यांचे कॉम्बिनेशन असल्याचे मानले जात आहे, ज्यामध्ये सुधारित अँड्रॉईड अॅप्स आणि मल्टी-विंडो सपोर्ट असल्याचे सांगितलं जात आहे.
काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, कंपनी ईव्हेंटमध्ये गुगल रेमी नावाचे एक नवीन एआय एजेंट देखील सादर करू शकते. हे एआय एजेंट्स यूजर्सच्या वतीने ईमेलला रिप्लाय करणं, मीटिंग शेड्यूल करणं आणि इतर ऑटोमॅटिक काम करू शकणार आहे.