Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट दिवाळी सेल! प्रत्येक खरेदीवर मिळणार भरगोस डिस्काऊंट

सर्वत्र दिवाळीची तयारी सुरु आहे. दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी सर्वत्र गर्दी होत आहे. गर्दीच्या ठिकाणी शॉपिंग करायला अनेकांना कंटाळा येतो. आता तुमच्या या समस्येवरचा उपाय आला आहे. हा उपाय म्हणजे फ्लिपकार्ट दिवाळी सेल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 19, 2024 | 06:00 PM
'या' दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट दिवाळी सेल! प्रत्येक खरेदीवर मिळणार भरगोस डिस्काऊंट

'या' दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट दिवाळी सेल! प्रत्येक खरेदीवर मिळणार भरगोस डिस्काऊंट

Follow Us
Close
Follow Us:

ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टने आपल्या युजर्ससाठी दिवाळी सेलची घोषणा केली आहे. फ्लिपकार्ट, भारतातील सर्वात लोकप्रिय शॉपिंग वेबसाइट आहे. फ्लिपकार्टने दिवाळी सेलची घोषणा केली आहे. Flipkart Big Diwali Sale 2024 21 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. Flipkart Plus सदस्यांसाठी हा सेल 24 तास आधी म्हणजेच आज मध्यरात्री 12 पासून सुरू होणार आहे.

हेदेखील वाचा- केवळ 2499 रुपयांच्या किंमतीत लाँच झाला itel चा फ्लिप कीपॅड फीचर फोन, फीचर्स वाचून व्हाल हैराण

कंपनीने या सेलमध्ये अनेक डील ऑफर केल्या आहेत, ज्यामध्ये तुम्हाला आयफोन 15 सह अनेक स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, जर तुमच्याकडे SBI बँक कार्ड असेल तर तुम्हाला अतिरिक्त फायदे देखील दिले जातील जे सेल ऑफरपेक्षा वेगळे असतील. या सेलसाठी फ्लिपकार्टने SBI सोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे, SBI कार्डने पैसे देऊन खरेदी केल्यावर, ग्राहकांना 10% पर्यंत झटपट डिस्काऊंट मिळणार आहे. सेलमध्ये 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत एक उत्तम 5G स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी युजर्सना मिळणार आहे. (फोटो सौजन्य -Flipkart)

Samsung Galaxy A14 5G

Samsung Galaxy A14 5G हा फोन काही महिन्यांपूर्वी लाँच केला होता. या फोनची एमआरपी 14,999 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या सेलमध्ये यावर 5,000 रुपयांचे डिस्काऊंट दिले जात आहे. त्यानंतर या फोनची किंमत 9,999 रुपये म्हणजेच 10,000 रुपयांपेक्षा कमी झाली आहे. या फोनची खास गोष्ट म्हणजे हा फोन लाँच झाल्यापासून लोकांना खूप आवडला आहे. 2023 च्या काउंटर रिपोर्टनुसार, हा फोन 2 कोटी लोकांनी खरेदी केला होता. हा बजेट श्रेणीतील एक उत्तम स्मार्टफोन आहे.

हेदेखील वाचा- फ्लिपकार्ट बिग शॉपिंग उत्सव सेल झाला सुरू, सॅमसंग-गुगलसह या स्मार्टफोन्सवर धमाकेदार ऑफर्स

9,999 रुपयांच्या किंमतीत, युजर्सना केवळ 5G कनेक्टिव्हिटी मिळणार नाही, तर सॅमसंगचे प्रीमियम बॅक डिझाइन देखील मिळेल. याशिवाय फोनच्या मागील बाजूला 50MP कॅमेरा सेटअप, 5000mAh बॅटरीसह अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत. फोनमध्ये 6.6 इंच फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले आहे. फोनच्या मागील बाजूस, 50MP मुख्य कॅमेरासह 2-2 मेगापिक्सेलचा मॅक्रो आणि डेप्थ सेन्सर कॅमेरा प्रदान केला आहे. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 13MP फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी देखील आहे.

iPhone 15 आणि Apple Airpods वर डिस्काऊंट

फ्लिपकार्ट दिवाळी सेलमध्ये iPhone 15 वर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट मिळणार आहे. बिग बिलियन डेज सेलमध्ये देखील युजर्सना iPhone 15 भरगोस डिस्काऊंट दिलं जात होतं. Flipkart च्या दिवाळी सेलमध्ये, युजर्स पुन्हा एकदा फक्त 49,999 रुपयांमध्ये iPhone 15 खरेदी करू शकतील. युजर्स या सेलमध्ये महागडे Apple Airpods केवळ 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकतील.

Web Title: Flipkart diwali sale will start from 21st october you will get bumper discount on shopping

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2024 | 06:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.