
Free Fire Max: हे आहेत बॅटलरॉयल गेमचे टॉप 4 बेस्ट ईव्हेंट, स्वस्तात मिळणार FWS Will Of Fire आणि Evo Skins! जाणून घ्या
फ्री फायर मॅक्स हा एक जबरदस्त बॅटल रॉयल गेम आहे. या गेममध्ये जिंकण्यासाठी प्लेअर्सना त्यांच्या शत्रूंना नॉक आउट करावे लागतं आणि जास्तीत जास्त काळ गेममध्ये टिकून राहावं लागतं. यासाठी प्लेअर्स पेट, कॅरेक्टर आणि वेपन स्किनसरख्या आयटम्सचा वापर करतात. पण हे खास गेमिंग आयटम्स अनलॉक करण्यासाठी प्लेअर्सना जास्तीत जास्त डायमंडची गरज असते. डायमंड मिळवण्यासाठी प्लेअर्सना त्यांचे पैसे खर्च करावे लागतात. पण प्लेअर्स पैसे खर्च न करता देखील डायमंड मिळवू शकतात. यासाठी ईव्हेंटमध्ये सहभागी होऊन काही टास्क पूर्ण करावे लागतात.
फ्री फायर मॅक्समध्ये अनेक गेमिंग ईव्हेंट आहे. या गेममध्ये सहभागी झाल्यानंतर प्लेअर्सना डायमंड जिंकण्याची संधी मिळते. याशिवाय ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड्स म्हणून प्लेअर्सना वेपन स्किन्स जिंकण्याची संधी देखील मिळते. गेममधील अशाच काही ईव्हेंटबाबत आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना डायमंडसोबतच इतर अनेक रिवॉर्ड्स जिंकण्याची देखील संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
FWS Ring हा फ्री फायर मॅक्समधील एक लक रॉयल इवेंट आहे. या जबरदस्त गेमिंग ईव्हेंटमध्ये FWS Will Of Fire वेपन स्किन मिळवण्याची संधी मिळणार आहे. हि स्कीन प्लेअर्स स्पिन करून अनलॉक करू शकतात. यामध्ये एकदा स्पिन करण्यासाठी 20 डायमंड खर्च करावे लागतात. तर पाचवेळा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 90 डायमंड खर्च करावे लागतात.
Free Fire Max मध्ये एक्टिव Bring The Noise एक फेडेड व्हील ईव्हेंट आहे. हा ईव्हेंट प्लेअर्ससाठी 10 ते 12 दिवसांसाठी सुरु राणार आहे. या ईव्हेंटमध्ये सहभागी झाल्यानंतर प्लेअर्सना Cataclysm स्किन जिंकण्याची संधी मिळणार आहे. या स्किनचा वापर करून AN94 गनचे डॅमेज रेट आणि एक्यूरेसी वाढवली जाऊ शकते. याशिवाय प्लेअर्सना त्यांच्या शत्रूंना मारण्यात यश मिळेल.
या गेमिंग ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना Immortal Ignition वेपन स्किन जिंकण्याची संधी मिळणार आहे, ज्याचा वापर AC80 गनसाठी केला जाऊ शकतो. या स्किनच्या मदतीने गनला एक युनिक मिळणार आहे. याव्यतिरिक्त, गनचा डॅमेज रेट वाढेल आणि आर्मर प्रवेश वाढेल, ज्यामुळे गेममध्ये अधिक शत्रू किल केले जाऊ शकतील.
गरेना फ्री फायर मॅक्समधील Evo Vault एक जबरदस्त ईव्हेंट आहे. यामध्ये Bang! Popblaster, Predatory Cobra, Majestic Prowler आणि Booyah Day 2021 इवो गन स्किन मिळणार आहे. ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी स्पिन करावं लागणार आहे. ईव्हेंटमध्ये एकदा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 20 डायमंड आणि पाचवेळा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 90 डायमंड खर्च करावे लागणार आहेत.