Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smartphones Under 20K: Realme पासून Motorola पर्यंत! हे आहेत 20 हजारांच्या रेंजमध्ये उपलब्ध असणारे ढासू स्मार्टफोन्स

मेमरी चिप्सच्या वाढत्या किंमतीमुळे स्मार्टफोन महाग होत असले तरी बजेटमध्ये दमदार फीचर्स असलेले अनेक पर्याय अजूनही उपलब्ध आहेत. हे स्मार्टफोन तगडी बॅटरी, दमदार कॅमेरा आणि पावरफुल परफॉर्मन्स ऑफर करतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 28, 2026 | 08:05 PM
Smartphones Under 20K: Realme पासून Motorola पर्यंत! हे आहेत 20 हजारांच्या रेंजमध्ये उपलब्ध असणारे ढासू स्मार्टफोन्स

Smartphones Under 20K: Realme पासून Motorola पर्यंत! हे आहेत 20 हजारांच्या रेंजमध्ये उपलब्ध असणारे ढासू स्मार्टफोन्स

Follow Us
Close
Follow Us:
  • बजेटमध्ये घ्या दमदार स्मार्टफोन! कमी किमतीत मिळतायत तगडे फीचर्स
  • महागाईतही स्मार्टफोनचा धमाका! बजेटमध्ये उपलब्ध आहेत हे 5 जबरदस्त पर्याय
  • कमी बजेट, तगडे फीचर्स! हे स्मार्टफोन ठरतील तुमच्यासाठी बेस्ट
स्मार्टफोन बाजारात मेमरी चिप्सच्या किंमती वाढल्याने याचा परिणाम स्मार्टफोन्सच्या किंमतीवर देखील होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत आपल्यासाठी एखादा बजेट स्मार्टफोन शोधणं अतिशय कठिण काम आहे, पण अशक्य नाही. टेक कंपन्या आजही त्यांच्या ग्राहकांसाठी बजेट किंमतीत उपलब्ध असणारे स्मार्टफोन्स लाँच करत असतात. त्यामुळे तुमचे बजेट कमी असेल तरी देखील तुम्ही एक उत्तम स्मार्टफोन खरेदी करू शकता. ज्यामध्ये पावरफुल बॅटरी, तगडा प्रोसेसर आणि दमदार फीचर्स दिलेले असतील.

बजेट सेगमेंटमध्ये धमाका! तगड्या फीचर्ससह नव्या Redmi स्मार्टफोनची भारतात दमदार एंट्री; डिझाईनने वेधलं यूजर्सचं लक्ष

Motorola Edge 60 Fusion

ज्या यूजर्सना सर्व बाजूंनी परफेक्ट स्मार्टफोन पाहिजे असेल त्यांच्यासाठी Motorola Edge 60 Fusion एक चांगला पर्याय ठरणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच OLED डिस्प्लेसह 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 7400 प्रोसेसर दिला आहे, जो स्मूद परफॉर्मंस ऑफर करतो. कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेंसर OIS सह उपलब्ध आहे. ज्यामुळे चांगले फोटो आणि व्हिडीओ क्लिक केले जाऊ शकतात. यामध्ये 68W फास्ट चार्जिंगसह 5500mAh बॅटरी दिली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

POCO X7

ज्यांना व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि गेंमिंगसाठी स्मार्टफोन पाहिजे आहे, त्यांच्यासाठी POCO X7 बेस्ट पर्याय आहे. यामध्ये 1.5K OLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. या स्मार्टफोनमध्ये डाइमेंसिटी 7300 अल्ट्रा प्रोसेसर आणि 50MP कॅमेरा सेटअप दिला आहे. 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह या स्मार्टफोनमध्ये 5500mAh बॅटरी दिली आहे. या फीचर्समुळे हा स्मार्टफोन एक उत्तम बजेट पर्याय ठरतो.

Realme P4 5G

Realme P4 5G अशा यूजर्ससाठी परफेक्ट पर्याय आहे ज्यांना दिर्घकाळापर्यंत बॅटरी लाईफ पाहिजे आहे. या स्मार्टफोनमध्ये 7000mAh बॅटरी दिली आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या स्मार्टफोनमध्ये 6.77 इंच AMOLED डिस्प्ले, डाइमेंसिटी 7400 अल्ट्रा प्रोसेसर आणि 50MP कॅमेरा दिला आहे. हा फोन गेमिंगसाठी देखील एक चांगला पर्याय आहे.

Infinix NOTE Edge 5G

जे लोकं स्मार्टफोनच्या लूक आणि डिझाईनवर जास्त लक्ष देतात त्यांना Infinix NOTE Edge 5G नक्की आवडेल. या स्मार्टफोनमध्ये 3D कर्व्ड AMOLED डिस्प्ले आणि स्लिम डिझाईन दिली आहे. हा फोन 6500mAh बॅटरी आणि डाइमेंसिटी 7100 प्रोसेसरने सुसज्ज आहे. लो-लाइट फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनचा 50MP कॅमेरा चांगले रिझल्ट्स देतो.

भारतात सॅमसंगने मारली बाजी! टॅब्लेट विक्रीत Apple आणि Acer ला सोडले मागे, जाणून घ्या सविस्तर

Vivo T5x 5G

ज्यांना बॅटरी आणि परफॉर्मंस दोन्ही दमदार पाहिजे असेल त्यांच्यासाठी Vivo T5x 5G एक चांगला पर्याय ठरणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 7200mAh बॅटरी दिली आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये डाइमेंसिटी 7400 टुर्बो प्रोसेसर, 50MP कॅमेरा आणि 120Hz डिस्प्ले दिला आहे. हा फोन खास करून अशा यूजर्ससाठी आहे ज्यांना चार्जिंगशिवाय बराच वेळ फोन वापरायचा असतो.

Web Title: From realme to motorola these smartphones are available at 20 thousand range tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 08:05 PM

Topics:  

  • Infinix
  • motorola
  • smartphone charger

संबंधित बातम्या

Tech Tips: लॅपटॉप चार्जरने फोन चार्ज करणं किती सुरक्षित? काय सांगतात एक्स्पर्ट्स? जाणून घ्या
1

Tech Tips: लॅपटॉप चार्जरने फोन चार्ज करणं किती सुरक्षित? काय सांगतात एक्स्पर्ट्स? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.