भारतात सॅमसंगने मारली बाजी! टॅब्लेट विक्रीत Apple आणि Acer ला सोडले मागे, जाणून घ्या सविस्तर
Free Fire Max: गेममध्ये आले धमाकेदार ईव्हेंट्स… प्रीमियम बंडलसह प्लेअर्सना मिळणार जबरदस्त वेपन स्किन
काउंटरपॉइंटच्या मुख्य विश्लेषक अंशिका जैन म्हणाल्या, आघाडीच्या ब्रैड्या धोरणात्मक उत्पादन नवकल्पनांमुळे प्रीमियम सेगमेंटकडे स्पष्ट कल दिसून येत आहे. अहवालानुसार, सॅमसंगच्या विक्रीत वार्षिक १५ टक्के वाढ झाली, त्यामुळे २०२४ मधील २७ टक्क्यांवरून २०२५, मध्ये त्याचा बाजारहिस्सा ३१ टक्क्यांवर पोहोचला. सॅमसंगने गॅलेक्सी टॅब ए९ सिरीज आणि चौथ्या तिमाहीत ए११ सिरीजच्या जोरावर पहिल्या तीन तिमाहीत आपले मजबूत स्थान कायम राखले. तसेच गॅलेक्सी टॅब एस पोर्टफोलिओद्वारे प्रीमियम सेगमेंटमध्येही आपले अस्तित्व टिकवून ठेवले. (फोटो सौजन्य – Pinterest)
अहवालानुसार, २०२५ मध्ये २० टक्के बाजारहिस्शासह अॅपल दुसऱ्या क्रमांकावर होते. तथापि, त्याच्या विक्रीत वार्षिक दोन टक्क्यांनी घट झाली. आयपॅड (२०२५) च्या १२८ जीबी वाय-फाय आवृत्तीने ३० हजार ४० हजार किंमत विभागात महत्त्वाची भूमिका बजावली. आयपॅड प्रो सिरीजने ओएलईडी तंत्रज्ञानाच्या प्रसाराला चालना दिली आणि उच्च कार्यक्षमता असलेल्या टॅब्लेट सेगमेंटमध्ये अॅपलचे स्थान अधिक मजबूत केले. लेनोवोने १५ टक्के बाजारहिस्सा नोंदविला, ज्यात विक्रीत २४ टक्क्यांनी वाढ झाली.
शाओमीचा ११ टक्के हिस्सा होता, ज्यात विक्रीत ७४ टक्क्यांनी वाढ झाली. एसरच्या विक्रीत ५० टक्क्यांनी घट झाली, परिणामी २०२४ मधील २१ टक्क्यांवरून २०२५ मध्ये त्याचा बाजारहिस्सा १० टक्क्यांवर आला. अहवालात असेही म्हटले की, २०२५ हे वर्ष भारतातील टॅब्लेट उत्पादन क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण होते. सॅमसंग आणि लेनोवोच्या नेतृत्वाखाली, प्रामुख्याने अमेरिका आणि युरोपीय बाजारपेठांमध्ये निर्यातीने १० लाख युनिट्सचा टप्पा ओलांडला. वार्षिक विक्रीमध्ये देशांतर्गत उत्पादनाचा वाटा ५० टक्के होता, त्यामुळे स्थानिकीकरणात मोठी वाढ झाली. थोडक्यात सांगायचे झाले तर सॅमसंग, शाओमी आणि लेनोवोच्या विक्रीत वाढ झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. तर एसर आणि अॅपलच्या विक्रीत घट नोंदवण्यात आली आहे.






