फोटो सौजन्य - pinterest
आपण जेव्हाही Google Chrome ओपन करतो आपल्याला अनेक वेगवेगळ्या जाहीराती दिसू लागतात. जाहीरातींमुळे अनेकदा आपण हैराण होतो. आपण आपल्या अनेक कामांसाठी Google Chrome चा वापर करतो. सहसा एखादी वेबसाईट पाहण्यासाठी, किंवा एखादा URL सर्च करण्यासाठी Google Chrome चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पण आपण Google Chrome ओपन करताच त्यावर आपल्याला विविध प्रकारच्या जाहीराती दिसू लागतात. काहीवेळी अनेक जाहिरती फारचं विचित्र असतात, त्यामुळे आपला संपूर्ण मूड खराब होतो.
हेदेखील वाचा- आता Airtel युजर्स ना मिळणार सुपरफास्ट नेटवर्क! कंपनीने 5G सेवेत केला मोठा बदल
पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही Google Chrome च्या वेबसाईटवरील या जाहीराती बंद करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या Google Chrome मध्ये काही विशिष्ट सेटिंग करावी लागणार आहे. या सेटिंगमुळे तुम्हाला Google Chrome च्या वेबसाईटवरील जाहीरातींचा सामना करावा लागणार नाही. ज्यामुळे तुमची अनेक कामं सहज आणि लवकर होतील. Google Chrome च्या या सिकरेट फीचरमुळे तुमची वेबसाईटवरील जाहिरातींपासून सुटका होईल. रीडर मोड असं या फीचरच नाव आहे. तुम्हाला Google Chrome च्या सेटिंगमध्ये जाऊन रीडर मोड फीचर चालू करायचं आहे. ज्यामुळे तुम्हाला वेबसाईटवरील जाहीरातींपासून मुक्ती मिळले.
हेदेखील वाचा- अनेक नवीन फीचर्ससह ‘या’ दिवशी भारतात लाँच होणार आहे Google Pixel 9 सिरीज!
रीडर मोड फीचर कोणत्याही वेबसाइटला स्वच्छ आणि वाचण्यास सोप्या लेआउटमध्ये रूपांतरित करण्याचा पर्याय देतो. रीडर मोड फीचरमध्ये, त्रासदायक जाहिराती काढून टाकल्या जातात, जेणेकरून तुमचे लक्ष केवळ संबंधित वेबसाईटवर जाईल. रीडर मोडमध्ये, तुम्हाला इतर अनेक पर्याय देखील मिळतात, ज्यामुळे तुम्ही वेबसाईटवरील कंटेटवर लक्ष केंद्रित करू शकता. रीडर मोड निवडल्यानंतर, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर मजकूर दिसेल. यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार फॉन्टचा आकार बदलू शकता. याशिवाय थीम बदलण्याचा पर्यायही दिला आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही व्हॉइस नोटप्रमाणे स्क्रीनवर दाखवलेला मजकूर ऐकूही शकता.