फोटो सौजन्य - google Pixel
तुम्ही सुध्दा Google Pixel 9 सिरीजची आतुरतेने वाट पाहात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. काही दिवसांपूर्वी Google Pixel 9 सिरीजबाबत कंपनीने घोषणा केली होती. मात्र कंपनीने या फोनच्या लॉचिंग तारखेबबात सांगितलं नव्हतं. मात्र आता कंपनीने Google Pixel 9 सिरीजची लाँचिंग तारीख जाहीर केली आहे. 14 ऑगस्ट रोजी Google Pixel 9 सिरीज लाँच केली जाणार आहे. या सिरीजमध्ये Google Pixel 9, Pixel 9 Pro आणि Pixel 9 Pro XL हे फोन असतील. तसेच Google Pixel 9 सिरीजमध्ये कंपनीचा फोल्डेबल फोन देखील लाँच केला जाण्याची शक्यता आहे.
हेदेखील वाचा- आता Airtel युजर्स ना मिळणार सुपरफास्ट नेटवर्क! कंपनीने 5G सेवेत केला मोठा बदल
Google Pixel 9 सिरीज अनेक नवीन फीचर्ससह लाँच केली जाणार आहे. Pixel 8 च्या तुलनेत Pixel 9 सिरीजमध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. या नवीन फीचर्समुळे युजर्सना एक चांगला अनुभव मिळणार आहे. Google Pixel 9 सिरीज 14 ऑगस्ट रोजी भारतात लाँच केली जाणार आहे. त्यामुळे काही दिवसांतच तुम्ही या सिरीजअंतर्गत लाँच केले जाणारे फोन खरेदी करू शकता. Google Pixel 9 सिरीजमध्ये कंपनीचा फोल्डेबल फोन देखील लाँच केला जाण्याची शक्यता आहे. चला तर मग Google Pixel 9 सिरीज अंतर्गत लाँच केल्या जाणाऱ्या फोनचे फीचर्स आणि किंमत पाहूया.
हेदेखील वाचा- Xiaomi चे ‘हे’ फोन End Of Life लिस्टमध्ये झाले सहभागी; तुमचा फोन तर नाही ना जाणून घ्या
Google Pixel 9 सिरीज अंतर्गत लाँच केल्या जाणाऱ्या सर्व फोनचे डिझाईन अतिशय भन्नाट आहे. या सर्व फोनला एक प्रिमियम लूक देण्यात आला आहे. ज्यामुळे युजर्सना फोनचा वापर करताना चांगला अनुभव मिळतो. यामध्ये 6.4 इंच OLED डिस्प्ले असू शकतो, ज्याचा रीफ्रेश रेट 120 Hz असेल. हा डिस्प्ले HDR10+ सपोर्टसह येणार आहे, जो व्हिडिओ पाहण्याचा आणि गेमिंगचा वेगळा अनुभव देईल. एकूणच Google Pixel 9 सिरीजमुळे ग्राहकांना उत्तम अनुभव मिळणार आहे.
Google Pixel 9 सिरीजमध्ये Google चा नवीन Tensor G4 प्रोसेसर पाहायला मिळणार आहे. जो Pixel 8 प्रोसेसरची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे. हा प्रोसेसर मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) टास्कमध्ये खूप वेगवान आहे. यासोबतच यात 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेजचा पर्याय असेल. यामध्ये तुम्ही एकाच वेळी अनेक कामे करू शकाल आणि स्टोरेजची कोणतीही अडचण येणार नाही.
Google Pixel 9 सिरीजमध्ये कॅमेरा अतिशय उच्च दर्जाचा असणार आहे. यात 50-MP चा प्रायमरी कॅमेरा, 12-MP चा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 48-MP चा टेलीफोटो लेन्स असेल. सेल्फीसाठी 12-MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, यामध्ये नाईट मोड, पोर्ट्रेट मोड आणि AI आधारित इमेज प्रोसेसिंग सारखे उत्कृष्ट फीचर्स देखील असतील.
Google Pixel 9 सिरीजमधील स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी असेल, जी दीर्घ बॅकअप देईल. यात फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील असेल, ज्यामुळे तुमचा फोन लवकर चार्ज होईल. कनेक्टिव्हिटीसाठी, यात 5G, Wi-Fi 6E आणि ब्लूटूथ 5.3 सारखे आधुनिक तंत्रज्ञान असेल.
Google Pixel 9 सिरीज सप्टेंबरपर्यंत अनेक देशांमध्ये उपलब्ध होईल. त्याची सुरुवातीची किंमतअंदाजे 51,500 रुपये असू शकते, ज्यामुळे तो एक परवडणारा प्रीमियम पर्याय बनतो. तुम्हीही नवीन स्मार्टफोन शोधत असाल, तर Google Pixel 9 सिरीज तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. Google Pixel 9 सिरीज स्मार्टफोन प्रेमींसाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे.