Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टेक्स्ट आणि फोटो वापरून क्रिएट करा अनोखा AI व्हिडीओ! Google देतोय Gemini Omni ची मोफत ॲक्सेस, वाचा संपूर्ण डिटेल्स

Google Gemini Omni: गूगलने जेमिनी ओम्नीच्या मोफत ॲक्सेसची मुदत आणखी काही दिवसांसाठी वाढवली आहे. त्यामुळे यूजर्सना सब्सक्रिप्शन न घेता AI व्हिडीओ तयार करण्याची संधी मिळणार आहे. हा व्हिडीओ तयार करण्यासाठी काही प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 08, 2026 | 09:14 AM
टेक्स्ट आणि फोटो वापरून क्रिएट करा अनोखा AI व्हिडीओ! Google देतोय Gemini Omni ची मोफत ॲक्सेस, वाचा संपूर्ण डिटेल्स

टेक्स्ट आणि फोटो वापरून क्रिएट करा अनोखा AI व्हिडीओ! Google देतोय Gemini Omni ची मोफत ॲक्सेस, वाचा संपूर्ण डिटेल्स

Follow Us
Follow Us:
  • जेमिनी ओम्नीमध्ये प्रत्येक यूजरला 10 मोफत व्हिडीओ तयार करण्याची संधी मिळणार आहे.
  • टेक्स्ट, फोटो आणि जुन्या व्हिडीओ क्लिप्सच्या मदतीने नवीन व्हिडीओ तयार करून त्यात एडिटिंग व रिमिक्सिंग करता येणार आहे.
  • भारतात जेमिनी ओम्नीचा मोफत ॲक्सेस 12 ऑगस्ट रोजी रात्री 12:30 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे.
Gemini Omni Free Access: टेक कंपनी गूगलने त्यांच्या जेमिनी ओम्नीच्या मोफत ॲक्सेसचा कालावधी आणखी काही काळासाठी वाढवला आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे यूजर्सना गूगल एआय सब्सक्रिप्शनचे पैसे खर्च केल्याशिवाय नवीन एआय व्हिडीओ टूल वापरण्याची संधी मिळणार आहे. कंपनी प्रत्येक यूजरला 10 मोफत व्हिडीओ क्रिएट करण्याची संधी देणार आहे.

नव्या Vivo स्मार्टफोनने वेधलं यूजर्सचं लक्ष, पावरफुल फीचर्सने आहे सुसज्ज; डिझाईन पाहताच तुम्हीही म्हणाल, वाह!!!

मोफत ॲक्सेसमुळे यूजर्सना जेमिनी ओम्नीचे ॲडव्हांस फीचर वापरण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये टेक्स्ट प्रॉम्प्ट्स, फोटो आणि जुन्या व्हिडीओ क्लिप्सपासून एक नवीन व्हिडीओ तयार केला जाऊ शकतो. क्रिएटिव्ह प्रोसेस आणखी चांगली व्हावी यासाठी हे प्लॅटफॉर्म फॉलो-अप सजेशन्सद्वारे चित्रपटांची एडिटिंग, रीमिक्सिंग आणि पॉलिशिंगची सुविधा देखील ऑफर करणार आहे.

सब्सक्रिप्शन खरेदी न करता मिळणार जेमिनी ओम्नीचा ॲक्सेस

गूगलने यापूर्वी घोषणा केली होती की, यूजर्सना 30 जूलैपर्यंत लिमिटेड-टाइम फ्री एक्सेस मिळणार आहे. यामुळे जेमिनी यूजर्स गूगल एआय सब्सक्रिप्शन खरेदी न करता देखील जेमिनी ओम्नीचा वापर करू शकतील. मात्र आता कंपनीने ही तारीख आणखी काही दिवसांसाठी पुढे ढकलली आहे. ज्यामुळे ज्या यूजर्सनी अद्याप मोफत सब्सक्रिप्शन क्लेम केले नाही किंवा व्हिडीओ क्रिएट करण्याचा अनुभव घेतला नाही, त्यांच्यासाठी आणखी एक संधी देण्यात आली आहे. या ऑफरमध्ये यूजर्सना 10 व्हिडीओ क्रिएट करण्याची संधी मिळणार आहे. ही लिमीट वाढवण्यात आली नाही.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

असा क्रिएट करू शकता नवीन व्हिडीओ

जेमिनी ओम्नी केवळ नॉर्मल टेक्स्ट प्रॉम्प्ट्सपर्यंत मर्यादित नाही. तर यूजर्स याच्या मदतीने टेक्स्ट, इमेज किंवा जुन्या व्हिडीओ क्लिप्सच्या मदतीने देखील नवीन व्हिडीओ क्रिएट करू शकणार आहेत. तसेच हे एआय टूल प्रत्येकवेळी नव्याने सुरुवात करण्याऐवजी जुना कंटेट एडीट, रिमिक्स किंवा बदलण्याचा पर्याय ऑफर करते. गूगलने हे एआय टूल चॅटप्रमाणे अगदी सोपे बनवले आहे. याचा अर्थ असा आहे की, प्रत्येकवेळी व्हिडीओ क्रिएट केल्यानंतर नवीन प्रोजेक्ट सुरु करण्याऐवजी तुम्ही एआयला आदेश देऊन व्हिडीओमध्ये काही बदल करू शकता. यामुळे जोपर्यंत तुम्हाला पाहिजे तसा व्हिडीओ क्रिएट केला जात नाही, तोपर्यंत तुम्ही सीन, स्टाईल आणि आयडिया सेट करू शकता.

भारतात कधीपर्यंत सुरु असणार जेमिनी ओम्नी ऑफर

गूगल अधिकृतपणे सांगितलं आहे की, मोफत जेमिनी ओम्नी ऑफर 12 ऑगस्ट रोजी रात्री 12:30 AM IST पर्यंत मर्यादित असणार आहे. या ऑफरदरम्यान यूजर्सना 10 मोफत व्हिडीओ क्रिएट करण्याचा पर्याय मिळणार आहे. यामुळे यूजर्सना गूगल एआयचा सब्सक्रिप्शन प्लॅन खरेदी करण्याची गरज भासणार नाही.

Amazon Great Freedom Sale: आकर्षक ऑफर्ससह ॲमेझॉन सेल सुरु! बजेटमध्ये प्रीमियम खरेदीची संधी, लेटेस्ट डील्स पाहिल्यात का?

असा मिळवा जेमिनी ओम्नीचा मोफत ॲक्सेस

जेमिनी ओम्नीचा मोफत ॲक्सेस मिळवणं अतिशय सोपं आहे. तुम्हाला केवळ जेमिनी ॲप ओपन करावा लागणार आहे. आता तुमच्या गूगल अकाऊंटने साईन ईन करा. यानंतर टूल्स सेक्शनमध्ये जाऊन सुरुवात करण्यासाठी क्रिएट व्हिडीओ पर्याय निवडा. आता तुम्ही टेक्स्ट टाईप करू शकता, फोटो अपलोड करू शकता किंवा जुने व्हिडीओ वापरू शकता. आता तुम्ही दिलेल्या सूचनेनुसार जेमिनी ओम्नी व्हिडीओ क्रिएट करणार आहे. जर तुम्हाला पहिल्यांदा क्रिएट केलेला व्हिडीओ आवडला नाही तर तुम्ही पुन्हा काही बदल करून व्हिडीओ एडीट करू शकता.

Web Title: Google gemini omni free access extended create 10 ai videos without subscription until august 12

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 09:14 AM

Topics:  

  • AI technology
  • Gemini
  • google

संबंधित बातम्या

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड
1

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड

AI Photos: AI करून घेताय फोटो वेळीच व्हा सावध! चेहरा आणि व्यक्तिगत माहिती होईल चोरी
2

AI Photos: AI करून घेताय फोटो वेळीच व्हा सावध! चेहरा आणि व्यक्तिगत माहिती होईल चोरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.