नव्या Vivo स्मार्टफोनने वेधलं यूजर्सचं लक्ष, पावरफुल फीचर्सने आहे सुसज्ज; डिझाईन पाहताच तुम्हीही म्हणाल, वाह!!!
कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन 8GB + 128GB आणि 8GB + 256GB या व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 39,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 45,999 रुपये आहे. विवो स्मार्टफोन सॅफायर ब्लू, रीगल ब्रॉन्झ आणि सिल्क व्हाईट या रंगाच्या पर्यायांत लाँच करण्यात आला आहे. तुम्ही ते विवो इंडिया ई-स्टोअर, Flipkart आणि देशभरातील निवडक ऑफलाइन रिटेल स्टोअर्समधून खरेदी करू शकाल. (फोटो सौजन्य: Vivo)
विवो स्मार्टफोनमध्ये 6.83-इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्क्रीनमध्ये 3,000 निट्सपर्यंत लोकल पीक ब्राइटनेस आणि P3 वाइड कलर गॅमेट मिळणार आहे. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट स्कॅनर मिळणार आहे. डिव्हाईस अँड्रॉईड 16 वर आधारित ओरिजीनओएस 6 ने सुसज्ज आहे.
डिव्हाईसला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7360-टर्बो चिपसेट मिळणार आहे. तसेच कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये 8GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB पर्यंत यूएफएस 3.1 स्टोरेज मिळणार आहे. हे डिव्हाइस 8 जीबीपर्यंतच्या ‘एक्सटेंडेड रॅम’ला देखील सपोर्ट करते. याचा अर्थ असा की, तुम्हाला या डिव्हाइसवर 16 जीबीपर्यंत रॅम मिळते.
फोटोग्राफीसाठी या नव्या स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. फोनमध्ये f/1.8 अपर्चरवाला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरवाला 2-मेगापिक्सेलचा सेकेंडरी कॅमेरा मिळणार आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी f/2.0 अपर्चरवाला 32-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. या डिव्हाईसचे पुढील आणि मागील दोन्ही कॅमेरे 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात.
फोनमध्ये 44W फ्लॅशचार्ज सपोर्टसह 7,050mAh बॅटरी मिळणार आहे.






