Amazon Great Freedom Sale: आकर्षक ऑफर्ससह ॲमेझॉन सेल सुरु! बजेटमध्ये प्रीमियम खरेदीची संधी, लेटेस्ट डील्स पाहिल्यात का?
सॅमसंगने अलीकडेच त्यांचा हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन 1,99,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत भारतात लाँच केला होता. मात्र आता सेलमध्ये ग्राहकांना हा स्मार्टफोन केवळ 1,90,999 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये 8.0-इंच प्रायमरी डिस्प्ले आणि 6.5-इंच आउटर डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 चिपने सुसज्ज आहे. या डिव्हाईसमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची ड्युअल बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी या डिव्हाईसच्या रियर पॅनलमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा दिला आहे, ज्यासोबत 50MP चा अल्ट्रावाइड लेंस आणि 10MP चा टेलीफोटो लेंस देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेऱ्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 10MP चा टेलीफोटो लेंस दिले आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
सेलमध्ये या सॅमसंग स्मार्टफोनची किंमत 89,999 रुपये झाली आहे. या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 6.9-इंच अमोलेड डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटने सुसज्ज आहे. कंपनीच्या या डिव्हाईसमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा, 50MP चा अल्ट्रावाइड लेंस आणि 50MP चा पेरिस्कोप लेंस आणि 3 एक्स झूम सपोर्टसह 10MP टेलीफोटो लेंस दिली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या डिव्हाईसमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
ॲमेझॉन ग्रेट फ्रीडम सेलमध्ये आयक्यू 15 ची किंमत 68,999 रुपये झाली आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.85-इंच एलटीपीओ ओएलईडी डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आणि पीक ब्राइटनेस 2600 निट्ससह डॉल्बी व्हिजन सर्टिफिकेशनला सपोर्ट करतो. कंपनीचा हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 प्रोसेसरने सुसज्ज आहे. कंपनीच्या या डिव्हाईसमध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे, यासोबत 3x पेरिस्कोप टेलीफोटो लेंस दिले आहे, जे लॉसलेस झूम ऑफर करते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
शाओमीचा हा स्मार्टफोन ग्राहकांना सेलमध्ये केवळ 59,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या फ्लॅगशिप डिव्हाईसमध्ये 6.59-इंच अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि पीक ब्राइटनेस 3,500 निट्सची आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8500 अल्ट्रा प्रोसेसर आणि 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी देण्यात आली आहे. या शाओमी स्मार्टफोनमध्ये Leica-ब्रँड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 50MP चा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा दिला आहे, जो 5x ऑप्टिकल झूम आणि 12 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड लेंससह येतो. या स्मार्टफोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.






