
Google I/O 2026: AI दुनियेत Google ची मोठी झेप! Gemini Flash आणि Omni मॉडेल्स ठरणार गेमचेंजर
आयोजित करण्यात आलेल्या लाईव्ह ईव्हेंटदरम्यान कंपनीने Gemini 3.5 सीरीज सादर करत यूजर्सना एक मोठं सरप्राईज दिले. जेमिनी 3.5 सिरीजचा सक्सेसर असलेले हे नवीनतम मॉडेल्स, एजेंटिक क्षमता आणि कोडिंग कार्यक्षमतेमध्ये मोठे अपग्रेड्स घेऊन आले आहेत. सध्या, गूगल जेमिनी अॅप आणि सर्चमधील ‘एआय मोड’द्वारे जेमिनी 3.5 फ्लॅश मॉडेल्स प्रत्येक यूजरसाठी रोलआऊट करत आहे. (फोटो सौजन्य – X)
गूगलने Gemini 3.5 सीरीजचे पहिले मॉडेल Gemini 3.5 Flash लाँच केले आहे. कंपनीने दावा केला आहे की, हे मॉडेल कोडिंग, मोठे टास्क आणि रियल-वर्ल्ड वर्कफ्लो पूर्वीपेक्षा अधिक चांगला परफॉर्मंस देणार आहे. सुंदर पिचाई यांनी सांगितल्यानुसार, Gemini 3.5 Flash अनेक बेंचमार्क्समध्ये Gemini 3.1 Pro पुढे आहे. विशेष म्हणजे, याचा वेग दुसऱ्या एआय कंपन्यांच्या मॉडेल्सच्या तुलनेत सुमारे 4 पट जास्त आहे. गूगलने असं देखील सांगितलं आहे की, या मॉडेलचा वापर कंपनी त्यांच्या नवीन एजंट-फर्स्ट डेवलपमेंट प्लॅटफॉर्म अँटिग्रॅविटीमध्ये आधीपासूनच करत आहे, ज्यामुळे सॉफ्टवेयर डेव्हलपमेंटचा वेग वाढला आहे.
The rumors are true… Today, we’re introducing the Gemini 3.5 model series.#GoogleIO pic.twitter.com/pmkc0ivP3I — Google (@Google) May 19, 2026
ईव्हेंटमध्ये डीपमाइंडचे सिईओ डेमिस हसाबिस यांनी जेमिनी ओम्नी मॉडेल सादर केले आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, हे मॉडेल जेमिनीचे वर्ल्ड नॉलेज आणि रीजनिंग क्षमता पूर्वीपेक्षा अधिक मजबूत करणार आहे. गूगलने दिलेल्या माहितीनुसार, नवीन मॉडेलमुळे गतिज ऊर्जा आणि गुरुत्वाकर्षण सारख्या जटिल वैज्ञानिक संकल्पना समजण्यातही लक्षणीय सुधारणा होते.
मुलंही करू शकतील ऑनलाईन पेमेंट! Paytm घेऊन आलं भन्नाट फीचर, बँक अकाऊंटशिवाय होणार व्यवहार
हसाबिस यांनी सांगितलं आहे की, जेमिनी ओम्नी फ्लॅश आता अनेक गुगल प्रोडक्ट्समध्ये जोडला जाणार आहे आणि या वर्षाच्या अखेपर्यंत जेमिनी ओम्नीसंबंधित आणखी मोठे अपडेट्स समोर आले आहे. जेमिनी ओम्नी हे गूगलचे पहिले व्हिडीओ जनरेशन मॉडेल आहे ,जे एक सिंगल प्रॉम्प्टमध्ये मल्टीमॉडल इनपुट एकत्र करू शकते. याचा अर्थ असा आहे की, एका सिंगल प्रॉम्प्टमध्ये व्हिडीओ, ऑडियो, टेक्स्ट आणि इमेजेस समाविष्ट असू शकतात. जेमिनी ओम्नी फ्लॅश सध्या जेमिनी अॅप आणि गूगल फ्लो द्वारे जागतिक स्थरावर गूगल एआय प्लस, प्रो आणि अल्ट्रा सब्सक्राइबर्ससाठी रोल आऊट केलं जात आहे.