
Google I/O 2026: आता AI एजेंट संभाळणार तुमचं डेली रूटीन? Google ने सादर नवं 'Gemini Spark'... कसं करणार काम? जाणून घ्या
मुलंही करू शकतील ऑनलाईन पेमेंट! Paytm घेऊन आलं भन्नाट फीचर, बँक अकाऊंटशिवाय होणार व्यवहार
एका ब्लॉग पोस्टमध्ये गूगलने सांगितलं आहे की, एआय एजेंट्स आणि कोलॅबोरेटिव टीमसाठी टास्क प्लॅनिंग आणि पुनरावृत्ती होणाऱ्या कार्यांचे नियोजन व स्ट्रक्चर करण्यासाठी Gemini Spark डिझाईन करण्यात आले आहे. पर्सनल AI एजेंट गूगल वर्कस्पेस अॅप्स जसे जिमेल, गुगल डॉक्स आणि गूगल स्लाईड्ससोबत इंटीग्रेटेड केले आहे. गूगलने स्पष्ट केलं आहे की, हे क्लाउड-बेस्ड AI एजेंट आहे, त्यामुळे लॅपटॉप बंद केल्यानंतर किंवा फोन लॉक केल्यानंतर देखील बॅकग्राऊंडमध्ये ते टास्क प्रोसेस करणं सुरु ठेवणार आहे. (फोटो सौजन्य – X)
हे AI एजेंट साधे सिंपल प्रॉम्प्ट्स किंवा ढोबळ उद्दिष्ट्यांना एका संरचित कार्य सारांश (स्ट्रक्चर्ड टास्क ब्रीफ) मध्ये बदलतो. ज्यामध्ये रोल्स, वर्कफ्लो, डिलिवरेबल्स, कंस्ट्रेंट्स, हँडऑफ नोट्स आणि वेरिफिकेशन चेकपॉइंट्स समाविष्ट असतात. गूगलचं असं म्हणणं आहे की, या आऊटपुट्सचा वापर नंतर वेगवेगळे AI रनटाइम्स, एजेंट सिस्टिम्स आणि एंटरप्राइज वर्कफ्लोमध्ये केला जाऊ शकतो.
Gemini Spark is your personal AI agent in the @GeminiApp that gets things done on your behalf, under your direction. It runs 24/7 (and yes – you can close your laptop). It’s powered by Gemini 3.5 and built on the Google Antigravity harness so it can complete long horizon tasks.… pic.twitter.com/UQGvfKKDbu — Sundar Pichai (@sundarpichai) May 19, 2026
टेक दिग्गज कंपनीने ईव्हेंटदरम्यान वर्कफ्लोची अनेक उदाहरणे देखील सादर केली. AI एजेंट नवीन सब्सक्रिप्शन फीची ओळख पटवण्यासाठी प्रत्येक महिन्याला क्रेडिट कार्ड स्टेटमेंट्स ऑटोमॅटिकली स्कॅन करू शकते. यूजर्स AI एजेंटला कस्टम रूटीन देखील शिकवू शकतात. ज्यामध्ये शाळेतील ईमेल्स मॉनिटरिंग करणं, महत्त्वाच्या डेडलाइन्सची नोंद करणं आणि एक कंबाइंड डेली समरी निर्माण करणं. तसेच AI एजेंट ईमेल्स आणि चॅट्सद्वारे मीटिंग नोट्स ऑटोमॅटिकली एनालाइज करू शकणार आहे. यामधून मिळालेल्या निकालांमधून एक स्ट्रक्चर्ड गूगल डॉक्स रिपोर्ट तयार करू शकतो आणि प्रोजेक्ट किकऑफसाठी फॉलो-अप ईमेल्स ड्राफ्ट देखील बनवू शकतो.
Airtel ची ‘प्रायोरिटी पोस्टपेड’ सेवा लाँच; 5G स्लायसिंगमुळे यूजर्सना मिळणार सुपरफास्ट नेटवर्क अनुभव
गूगलने या ईव्हेंटमध्ये जेमिनी स्पार्कमागील वर्कफ्लो प्रोसेस देखील समजावून सांगितली. यूजर्स या प्लॅटफॉर्मवर एक ब्रॉड ऑब्जेक्टिव किंवा प्रोजेक्ट रिक्वायरमेंट एंटर करून सुरुवात करू शकतात. यानंतर एजेंटिक AI प्लॅटफॉर्म इनपुट एनालाइज करतो आणि तुमचा प्रोजेक्ट छोटे टास्क्स, एक्सपेक्टेड आउटपुट्स, असाइन्ड रोल्स, वर्कफ्लो स्टेजेस आणि रिव्यू चेकपॉइंट्समध्ये ऑटोमॅटिकली स्ट्रक्चर करतो.
Ans: Gemini Spark हे Google चे नवीन AI एजेंट टूल आहे, जे यूजर्सची रोजची कामं ऑटोमॅटिकली मॅनेज करू शकते.
Ans: हे AI टूल Gmail, Google Docs, Google Slides आणि Google Workspace अॅप्ससोबत इंटीग्रेटेड आहे.
Ans: यूजर्सने दिलेल्या प्रॉम्प्ट्स किंवा टास्कनुसार हे AI एजेंट कामांचे नियोजन करून त्यांची अंमलबजावणी करते.