Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google I/O 2025: वारंवार ऑफर चेक करण्याची गरज नाही, किंमत कमी होताच येणार Alert! ग्राहकांच्या बचतीसाठी Google घेऊन येतोय नवीन फीचर

Google Upcoming Feature: गुगल लवकरच एक नवीन फीचर घेऊन येणार आहे. हे फीचर युजर्सना शॉपिंगवेळी पैशांची बचत करण्यासाठी मदत करणार आहे. हे फीचर कसं काम करणार, याबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 23, 2025 | 12:13 PM
Google I/O 2025: वारंवार ऑफर चेक करण्याची गरज नाही, किंमत कमी होताच येणार Alert! ग्राहकांच्या बचतीसाठी Google घेऊन येतोय नवीन फीचर

Google I/O 2025: वारंवार ऑफर चेक करण्याची गरज नाही, किंमत कमी होताच येणार Alert! ग्राहकांच्या बचतीसाठी Google घेऊन येतोय नवीन फीचर

Follow Us
Follow Us:

Google I/O 2025 या दोन दिवसीय ईव्हेंटमध्ये कंपनीने अनेक नवीन फीचर्स आणि अपडेट सादर केले आहेत. या ईव्हेंटमध्ये Gemini मॉडेलमध्ये नेटिव्ह ऑडियो आउटपुट फीचर, डेव्हलपर्ससाठी नवीन टूल्स, Deep Think, ऑल न्यू Deep Think अ‍ॅडवांस रीजनिंग मोड, 3D व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, अ‍ॅडव्हान्स AI इमेज आणि व्हिडिओ जनरेशन टूल्स, असे अनेक नवीन अपडेट सादर करण्यात आले आहेत. याशिवाय आता कंपनीने आणखी एक नवीन फीचर युजर्ससाठी सुरु केलं आहे. खरं तर ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या युजर्ससाठी हे फीचर अत्यंत फायद्याचं ठरणार आहे.

Infinix च्या नव्या 5G स्मार्टफोनची बाजारात एंट्री, गेमर्ससाठी ठरणार वरदान! किंमत तुमच्या बजेटमध्ये

गूगलने Google I/O 2025 ईव्हेंटमध्ये ऑनलाइन शॉपिंगसाठी अनेक नवीन AI (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) फीचर्स सादर केले आहेत. या फीचर्समुळे ऑनलाईन शॉपिंग अधिक मजेदार होणार आहे. शिवाय ग्राहकांची बचत देखील होणार आहे. हे फीचर कसं काम करणार आणि याच्या मदतीने युजर्स कशा प्रकारे बचत करू शकतात याबद्दल आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

आता Google Search मध्ये नवीन AI मोड दिला जाणार आहे, जिथे तुम्ही कोणत्याही प्रोडक्टचा फोटो अपलोड करू शकता आणि त्याबाबत AI कडून माहिती मिळवू शकता. तुम्हाला हे प्रोडक्ट खरेदी करायचं असेल पण त्याची किंमत जास्त असेल तर चिंता करण्याची गरज नाही. हे नवीन फीचर तुम्हाला त्या प्रोडक्टची किंमत कमी झाल्यावर अलर्ट पाठवणार आहे आणि यासाठी तुम्हाला सतत प्रोडक्टवरील ऑफर्स आणि डिस्काऊंट तपासण्याची देखील गरज नाही. मात्र यासाठी तुम्हाला काही सेटिंग करावी लागणार आहे.

एखाद्या प्रोडक्टची किंमत जास्त असेल तर युजर्स त्या प्रोडक्टची खरेदी करण्यासाठी किंमत कमी होण्याची वाट बघतात. यासाठी प्रोडक्टवरील ऑफर्स वारंवार चेक केल्या जातात. पण आता तुम्हाला या त्रासातून सुटका मिळणार आहे. कारण आता किंमत कमी होताच गुगल स्वतः वापरकर्त्यांना माहिती देईल.

प्राइस ट्रॅकिंग फीचर

ऑनलाईन शॉपिंग अधिक सोपी व्हावी यासाठी हे नवीन फीचर सुरु केलं जाणार आहे. येत्या काही महिन्यात हे फीचर युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. आता तुम्ही कोणत्याही प्रोडक्ट लिस्टिंगवर किंमत ट्रॅक करा वर टॅप करू शकाल. तुम्ही एखादे प्रोडक्ट निवडू शकता, ते रंग आणि आकारानुसार फिल्टर करू शकता आणि त्या वस्तूवर तुम्हाला किती खर्च करायचा आहे ते ठरवू शकता. जेव्हा तुम्ही ठरवलेली किंमत त्या वस्तूवर उपलब्ध असेल तेव्हा तुम्हाला गूगलकडून नोटिफिकेशन पाठवलं जाणार आहे.

13 वर्षांपूर्वी अपलोड केला पहिला YouTube Video! 14 वर्षांत उभं केलं1 बिलियन डॉलरचं विश्व, अशी आहे Mr Beast च्या यशाची कहाणी

किंमत कमी होताच येणार नोटिफिकेशन

तुम्ही निवडलेल्या वस्तूच्या किंमतीवर गूगल नजर ठेवणार आहे. जेव्हा संबंधित प्रोडक्टची किंमत तुम्ही ठरवलेल्या किंमतीशी जुळते तेव्हा कंपनी तुम्हाला एक नोटिफिकेशन पाठवेल. यानंतर तुम्ही बाय फॉर मी पर्यायावर टॅप करून वस्तू खरेदी करू शकता. तुम्ही बाय फॉर मी बटणावर क्लिक केल्यानंतर, Google व्यापाऱ्याच्या वेबसाइटवरील शॉपिंग कार्टमध्ये आयटम जोडेल आणि खरेदी सुरक्षित करण्यासाठी तुमचे Google Pay तपशील वापरेल.

Web Title: Google is planning to launch new feature which help users to save money know how tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 12:13 PM

Topics:  

  • google
  • tech event
  • Tech News

संबंधित बातम्या

फोल्डेबल फोन पाहिजे, पण बजेट कमी? 3 लाखांच्या iPhone Duo पेक्षा हे आहेत स्वस्त पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या फीचर्स
1

फोल्डेबल फोन पाहिजे, पण बजेट कमी? 3 लाखांच्या iPhone Duo पेक्षा हे आहेत स्वस्त पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या फीचर्स

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
2

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
3

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
4

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.