Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

APK Scams: बनावट ॲप्सपासून सुरक्षित रहा! योग्य मार्गदर्शन आवश्यक, काय आहे APK Files

भारतात सायबर फसवणूक वाढली आहे आणि याच्या अनेक तक्रारीही समोर येत आहेत. मात्र यामध्ये APK फाइल्सचा कसा उपयोग केला जातो याबाबत अधिक माहिती आपण घेऊया

  • By दिपाली नाफडे
Updated On: Mar 12, 2026 | 12:26 PM
APK Files म्हणजे काय (फोटो सौजन्य - iStock)

APK Files म्हणजे काय (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • एपीके फाइल्स काय आहेत 
  • एपीके स्कॅम्स कसे होतात 
  • या फसवणुकीपासून कसे लांब रहाल 
भारतात 2024 मध्ये सायबर फसवणुकीच्या सुमारे 36 लाख तक्रारी नोंदवण्यात आल्या असून अंदाजे ₹22,845 कोटींचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. सायबर सुरक्षेशी संबंधित नोंदविण्यात आलेल्या घटनांची संख्या 2022 मध्ये सुमारे 10.29 लाख होती, ती 2024 मध्ये दुप्पट म्हणजे सुमारे 22.68 लाख इतकी झाली आहे.* यावरून ही परिस्थिती ही चिंतेची बाब असून याकडे तातडीने लक्ष देणे व जागरुकता वाढविणे आवश्यक असल्याचे दिसून होते.

सध्याच्या काळात स्मार्टफोन वापरणाऱ्यांनी ज्या सर्वसाधारण फसवणुकींबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे त्यांपैकी एक म्हणजे APK स्कॅम्स. या प्रकारच्या फसवणुकीत सायबर गुन्हेगार बनावट ॲप्स आणि मालवेअर असलेल्या APK फाइल्सचा वापर करतात. APK (अँड्रॉइड पॅकेज फाइल) ही अशी फाइल असते जी तुम्हाला इंडस ॲपस्टोअर, गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअर यांसारख्या अधिकृत ॲप स्टोअर्सच्या बाहेरून ॲप्स इन्स्टॉल करण्याची परवानगी देते. काही वेळा योग्य कारणांसाठी अशा फाइल्सचा वापर केला जातो, परंतु या फाइल्समुळे अधिकृत ॲप स्टोअर्समध्ये ॲप्सवर लागू असलेल्या सुरक्षा तपासण्या टाळल्या जातात.

फसवणुकीचे बळी कसे ठरतात 

कोणालाही या प्रकारच्या फसवणुकीचे लक्ष्य केले जाऊ शकते. मात्र अनेक ॲप्स वापरणारे आणि वारंवार व्यवहार करणारे व्यावसायिक, अधिकृत वाटणाऱ्या कोणत्याही संदेशांवर सहज विश्वास ठेवणारे ज्येष्ठ किंवा कमी तांत्रिक माहिती असलेले युजर, तसेच स्रोत तपासून न पाहता ‘फ्री’ ॲप्स किंवा गेम अपग्रेड शोधणारे तरुण युजर हे या फसवणुकीचे सर्वाधिक बळी ठरतात.

या प्रकारच्या फसवणुकीची सुरुवात अनेकदा अगदी किरकोळ वाटणाऱ्या गोष्टीपासून होते : टेलिग्राम, फेसबुक किंवा व्हॉट्सॲपवरील एखादी लिंक, ट्रॅफिक चलान न भरल्याचा दावा करणारा SMS, किंवा OTT सबस्क्रिप्शनसारख्या प्रीमियम सेवेसाठी ‘फ्री अपग्रेड’ देण्याची ऑफर असलेला संदेश. अशा लिंकवर केलेल्या एका टॅपमुळे तुमच्या फोनचे नियंत्रण अनोळखी व्यक्तीकडे जाऊ शकते. टेक गोष्टींकडे लक्ष असणे गरजेचे आहे. 

‘पीएम नवीन योजना’च्या नावाखाली APK फाईल पाठवली अन् ती उघडताच आर्थिक लूट झाली

नक्की कशी होते फसवणूक 

भामट्यांकडून होणाऱ्या फसवणुकीचा क्रमा साधारणपणे ठराविक असतो : सर्वप्रथम ते बक्षीस, कर्ज किंवा दंड रद्द करण्याचे आमिष दाखवत SMS पाठवतात किंवा लिंक फॉरवर्ड करतात. ही लिंक अधिकृत ॲप स्टोअरवरून ॲप इन्स्टॉल करण्याऐवजी बनावट ॲपची थेट APK डाउनलोड करण्यासाठी नेते. त्यानंतर SMS, कॉन्टॅक्ट्स, ॲक्सेसेबिलिटी, नोटिफिकेशन्स इत्यादींसाठी अत्याधिक परवानग्या मागणारा प्रॉम्प्ट दिसतो. 

बनावट ॲप वरकरणी काहीही काम करत नाही किंवा लगेच क्रॅश होते, पण त्यामागे मालवेअर सूप्तपणे कार्यरत राहते. OTP अडवणे, स्क्रीन ओव्हरले हल्ले करणे, बँकिंग ॲक्सेस मिळवणे आणि सूचना हटवणे यांसारख्या गोष्टी पार्श्वभूमीवर घडत असतात. अनधिकृत व्यवहार दिसू लागल्यानंतर किंवा खात्यातील रक्कम कमी झाल्यानंतरच वापरकर्त्यांना फसवणूक झाल्याची जाणीव होते. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी फोनपेच्या सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

खालील संकेतांकडे विशेष लक्ष द्या :

  • इंडस ॲपस्टोअरसारख्या अधिकृत ॲप स्टोअरऐवजी SMS, व्हॉट्सॲप किंवा इतर थर्ड पार्टी ॲप्सद्वारे पाठवलेली डाउनलोड लिंक
  • ॲपच्या उद्देशाशी सुसंगत नसलेल्या परवानग्या मागितल्या जाणे (उदा., टॉर्च ॲपकडून SMS ॲपचा ॲक्सेस मागणे)
  • चुकीची स्पेलिंग असलेली, नवीन किंवा संशयास्पद वाटणारी डेव्हलपरची नावे
  • खूपच आकर्षक वाटणाऱ्या ऑफर्स किंवा संदेश (“फ्री प्रीमियम”, “इन्स्टंट लो अप्रूव्हल”)
  • ॲपचे डाउनलोड्स अत्यल्प असणे, ब्रँडिंग सर्वसाधारण दिसणे किंवा युजरचे नकारात्मक अभिप्राय असणे
तज्ज्ञ काय सांगतात 

तज्ज्ञांनी आवाहन केले आहे की ॲप्स नेहमी अधिकृत स्टोअर्समधूनच (इंडस ॲपस्टोअर / गुगल प्ले / ॲपल ॲप स्टोअर) इन्स्टॉल करावी आणि नेमके काय डाउनलोड केले जात आहे याची खात्री नसल्यास “इन्स्टॉल अननोन ॲप्स” हा पर्याय बंद ठेवावा. तसेच अचानक पाठवलेले चलान, रिफंड, रिवॉर्ड्स किंवा कर्जाशी संबंधित लिंक किंवा फाइल्सवर टॅप करणे टाळावे. कोणत्याही ॲपला परवानग्या देण्यापूर्वी त्या नेमक्या कशासाठी मागितल्या जात आहेत हे काळजीपूर्वक तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संशयास्पद किंवा मालवेअरशी संबंधित वर्तन ओळखण्यासाठी विश्वासार्ह मोबाइल सुरक्षा साधनाचा वापर करणेही आवश्यक आहे.

तुम्ही चुकून बनावट ॲप डाउनलोड झाले असल्यास ते त्वरित अनइन्स्टॉल करावे, मोबाइल डेटा आणि वाय-फाय तात्पुरते बंद करावे, बँकिंग, ईमेल आणि पेमेंट ॲप्सचे पासवर्ड बदलावे; तसेच व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा खाते सुरक्षित करण्यासाठी आपल्या बँकेशी किंवा पेमेंट सेवा प्रदात्याशी संपर्क साधावा.

फसवणूक होत असल्यास काय करावे 

फोनपेवर फसवणुकीचे होत असल्याचे लक्षात आल्यास अशी घटना त्वरित फोनपे ॲपमध्ये नोंदवता येते किंवा 080–68727374 / 022–68727374 या ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल करून कळवता येते. तसेच फोनपेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवरूनही तक्रार नोंदवता येते. या शिवाय जवळच्या सायबर क्राइम सेलमध्ये तक्रार दाखल करता येते किंवा https://www.cybercrime.gov.in/ या वेबसाइटवर ऑनलाइन तक्रार नोंदवता येते. 

सायबर क्राइम सेलच्या 1930 या हेल्पलाइन क्रमांकावरही संपर्क साधता येतो. तसेच दूरसंचार विभागाकडे (DOT) संशयास्पद संदेश, कॉल किंवा व्हॉट्सॲपवरून होणाऱ्या फसवणुकीबाबत संचार साथी पोर्टलवरील चक्षू सुविधेद्वारे तक्रार नोंदवता येते. फोनपे ग्रिव्हिअन्स पोर्टलवरही तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

सायबर चोरट्यांनी आता लढवली ‘ही’ नवी शक्कल; APK फाईल पाठवतात अन् एक क्लिक करताच…

Web Title: How to be safe from apk scams what is apk files tech news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 12:26 PM

Topics:  

  • Tech News
  • technology news

संबंधित बातम्या

भारतात लवकरच लाँच होणार Realme चा स्वस्त 5G Variant, डिझाईन आणि स्पेसिफिकेशन वाचून व्हाल चकीत
1

भारतात लवकरच लाँच होणार Realme चा स्वस्त 5G Variant, डिझाईन आणि स्पेसिफिकेशन वाचून व्हाल चकीत

ॲपलचा बजेट-फ्रेंडली लॅपटॉप लाँच! MacBook Neo मध्ये 13-इंच डिस्प्ले, AI परफॉर्मन्सचा दावा
2

ॲपलचा बजेट-फ्रेंडली लॅपटॉप लाँच! MacBook Neo मध्ये 13-इंच डिस्प्ले, AI परफॉर्मन्सचा दावा

Tech Tips: मोबाईल यूजर्स सावधान! तुम्हीही स्मार्टफोनचे Bluetooth सतत ऑन ठेवता? हॅक होऊ शकते तुमचे डिव्हाईस…
3

Tech Tips: मोबाईल यूजर्स सावधान! तुम्हीही स्मार्टफोनचे Bluetooth सतत ऑन ठेवता? हॅक होऊ शकते तुमचे डिव्हाईस…

Tech Tips: फक्त फोन चार्ज करण्यासाठी नाही! 90 टक्के यूजर्सना माहिती नाहीत Power Bank चे हे फायदे, वाचून तुम्हीही थक्क व्हाल
4

Tech Tips: फक्त फोन चार्ज करण्यासाठी नाही! 90 टक्के यूजर्सना माहिती नाहीत Power Bank चे हे फायदे, वाचून तुम्हीही थक्क व्हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.