Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Map Update: गुगल मॅप्समध्ये होतोय मोठा बदल, आत्ताच हे काम करा नाहीतर लोकेशन हिस्ट्री होईल डिलीट

गुगल मॅप्सच्या मदतीने, बरेच लोक दररोज त्यांच्या योग्य लोकेशनवर पोहोचतात. रस्ता माहीत नसताना गुगल मॅपचा उपयोग होतो. जरी गुगल मॅप बहुतांशी योग्य माहिती देत ​​असला तरी काही वेळा त्यावर विश्वास ठेवणे धोक्याचे ठरते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 30, 2024 | 01:30 PM
Google Map Update: गुगल मॅप्समध्ये होतोय मोठा बदल, आत्ताच हे काम करा नाहीतर लोकेशन हिस्ट्री होईल डिलीट

Google Map Update: गुगल मॅप्समध्ये होतोय मोठा बदल, आत्ताच हे काम करा नाहीतर लोकेशन हिस्ट्री होईल डिलीट

Follow Us
Close
Follow Us:

गुगल मॅप युजर्ससाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. गुगल मॅप्सने त्यांच्या लोकेशन हिस्ट्रीच्या नियमांत बदल केला आहे. यासंदर्भात कंपनी प्रत्येक गुगल मॅप युजरला मेल करत आहे आणि गुगल मॅप सेटिंग अपडेट करण्यासाठी सांगत आहे. वास्तविक, कंपनी लोकेशन हिस्ट्री सेव्ह करण्याच्या पद्धतीत बदल करणार आहे.

गुगल मॅपसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

गुगल मॅपने गेल्या वर्षी घोषणा केली होती की युजर्स एकतर त्यांचा टाइमलाइन डेटा डिव्हाइसवर सेव्ह करू शकतात किंवा क्लाउडवर एन्क्रिप्टेड स्वरूपात त्याचा बॅकअप घेऊ शकतात. आता लवकरच हा नियम लागू केला जाणार आहे. युजर्सनी त्यांच्या डिव्हाईसवर ही सेटिंग अपडेट केली नाही, तर त्यांची लोकेशन हिस्ट्री डीलीट होणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

ईमेलद्वारे केल जातय अपडेट

गुगल आता ईमेलद्वारे युजर्सना या नियमासंदर्भात माहिती देत ​​आहे. गुगलने मेलमध्ये म्हटलं आहे की, युजर्सना जर त्यांची लोकेशन हिस्ट्री सेव्ह करायची असेल तर त्वरीत सेटिंग अपडेट करावी लागणार आहे. अन्यथा त्यांचा डेटा डिलीट केला जाईल. तथापि, प्रत्येक युजरसाठी डेटा डिलीट करण्याची अंतिम मुदत वेगळी असू शकते.

हिस्ट्री लोकली सेव्ह केली जाणार

गुगल आता प्रत्येक डिव्हाइससाठी लोकेशन डेटा स्वतंत्रपणे सेव्ह करेल. याचा अर्थ तुमची टाइमलाइन यापुढे वेबशी इंटीग्रेट केली जाणार नाही. तुम्ही याबाबत अ‍ॅपमध्ये अपडेट न केल्यास गुगल प्रथम मागील 3 महिन्यांचा डेटा डिलीट करेल. यानंतर नवीन लोकेशन हिस्ट्री फक्त डिव्हाइसवर लोकली सेव्ह होईल.

तुमचा डेटा कसा सेव्ह करायचा?

  • Google Takeout वापरा आणि takeout.google.com वर जा.
  • फक्त “लोकेशन हिस्ट्री (टाइमलाइन)” पर्यायावर टिक करा.
  • “नेक्स्ट स्टेप” वर क्लिक करा आणि “क्रिएट एक्सपोर्ट” निवडा.

फोन सेटिंग्जमधून निर्यात करा

  • तुमच्या फोनवर, सेटिंग्ज > Location > Location Services > टाइमलाइन वर जा.
  • येथून डिव्हाइस-स्पेसिफिक डेटाचा बॅकअप घ्या.
  • पण एकदा बदल लागू झाल्यानंतर, तुम्ही वेबवरील टाइमलाइनमध्ये प्रवेश करू शकणार नाही.
  • प्रत्येक डिवाइसचा लोकेशन डेटा भिन्न असेल.

गुगल मॅपसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

गुगल मॅपची सर्वत्र चर्चा

गुगल मॅप सध्या खूप चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या एका अपघातामुळे सर्वत्र गुगल मॅप्सची चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी चुकीच्या मार्गाने तीन मित्रांची कार एका पुलावरून पडली होती. त्यामुळे तिन्ही मित्रांना जीव गमवावा लागला. या घटनेनंतर गुगल मॅप चांगलाच चर्चेत आला. आपल्या प्रवासासाठी गुगल मॅप किती योग्य आहे, याबाबत आता चर्चा सुरु आहे. गुगल मॅप तुमच्या अनेक क्रियाकलापांवर लक्ष ठेवतो. तुम्ही कोणत्या वेळी कुठे गेला होता हे गुगलला माहीत आहे. तुमचे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी गुगल जीपीएसची मदत घेते.

Web Title: Google map update google map change their rule about locations history know un details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2024 | 01:30 PM

Topics:  

  • google map new feature

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.