Google Map Update: फोनमध्ये गुगल मॅपचा वापर करण्यात अडचणी येतात? अशा प्रकारे सोडवा तुमची समस्या
आपण सर्वचजण गुगल मॅपचा वापर करतो. आपल्याला कुठे फिरायला जायचं असेल किंवा कॅब बुक करायची, गुगल मॅप आपल्याला प्रत्येक वेळी मदत करतो. गुगल मॅपच्या मदतीने आपण जगातील कोणतंही ठिकाणं एक्सप्लोअर करू शकतो. गुगल मॅप आपल्याला आपल्या जवळची हॉस्पिटल्स, हॉटेल्स आणि पेट्रोल पंप शोधण्यासाठी देखील मदत करते. पण अनेकदा असं होतं की आपल्या स्मार्टफोनमध्ये गुगल मॅप योग्य प्रकारे काम करत नाही. अशावेळी तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुमची समस्या अगदी चुटकीसरशी सोडवू शकता.
गुगल मॅपसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
जर तुमच्या फोनमध्ये गुगल मॅप काम करत नसेल, तर सर्वात मोठी समस्या इंटरनेट असू शकतं. स्लो किंवा अनस्टेबल इंटरनेट कनेक्शनमुळे तुम्हाला गुगल मॅपचा वापर करण्यात अडचणी येऊ शकतात. इंटरनेटचा स्पीड कमी असेल तर मॅप लोड होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये गुगल मॅपचा वापर करण्यात अडचणी येत असतील तर सर्वात आधी तुमच्या फोनचा इंटरनेट स्पीड तपासा. तुम्ही वाय-फाय वापरत असाल तर ते बंद करा आणि मोबाइल डेटावर स्विच करा. (फोटो सौजन्य – pinterest)
तुमच्या गुगल अकाऊंटमध्ये समस्या असल्यास, गुगल मॅप तुमच्या ब्राउझरमध्ये काम करणे थांबवू शकते. अशावेळी तुम्ही गुगल अकाऊंटमधून साइन आउट करून पुन्हा साइन इन करू शकता. यामुळे तुमच्या समस्येचं निराकरण होण्यासाठी मदत होऊ शकते.
गुगल मॅपसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
तुम्ही एका प्राइवेट विंडोमध्ये गुगल मॅप लोड करू शकता. यामुळे कोणत्याही एक्सटेंशन, ब्राउझर कॅशे किंवा कुकीजमुळे समस्या उद्भवली आहे का हे वेरिफाई करण्यात आपल्याला मदत होईल. तुम्ही तुमच्या ब्राउझरमध्ये Control + Shift + N (Windows वर) किंवा Command + Shift + N (Mac वर) दाबून प्राइवेट विंडो उघडू शकता. तुम्ही इथे गुगल मॅप वापरून पाहू शकता.
तुम्ही वेब सर्फ करत असताना, तुमचा ब्राउझर तुमचा अनुभव सुधारण्यासाठी कॅशे आणि कुकीज स्टोर करतो. हा डेटा ब्राउझर परफॉर्मंस सुधारत असला तरी, तो जुना झाल्यास समस्या निर्माण करू शकतो. Chrome किंवा Edge मधील ब्राउझर कॅशे साफ करण्यासाठी, ‘क्लीअर ब्राउझिंग डेटा’ पॅनेल ओपन करा. यासाठी तुमच्या कीबोर्डवरील Ctrl + Shift + Delete की दाबा. ‘कुकीज आणि इतर साइट डेटा’ आणि ‘कॅशेड इमेज आणि फाइल्स’ च्या पुढील चेकबॉक्सेसवर टिक करा. त्यानंतर, आता क्लिअर बटण दाबा.
कधीकधी सर्वात सोपा उपाय सर्वात कठिण समस्या दूर करू शकतात. स्मार्टफोनमध्ये गुगल मॅप योग्य प्रकारे काम करत नसेल तर तुम्ही गुगल मॅप ॲप अपडेट करा. काही वेळा ॲप अपडेट नसल्यामुळे योग्य प्रकारे काम करत नाहीत. जर तुम्ही अँड्रॉइड युजर असाल तर तुम्ही Play Store ला वरून तुमचं गुगल मॅप अपडेट तपासू शकता. तुम्ही आयफोन वापरत असाल तर तुम्ही तुमच्या ॲप स्टोअरवर जाऊन नवीनतम अपडेट तपासू शकता.