Google Map Update: रनिंग डान्स करून गुगल मॅप्सवर तयार केलं अनोखं आर्ट, व्हिडीओ व्हायराल
Dancing Stick Man Art: गुगल मॅप तुम्हाला रस्ता दाखवतो, मार्ग सांगतो. गुगल मॅप प्रवासावेळी तुमची प्रचंड मदत करतो. तुम्ही आतापर्यंत गुगल मॅपवर अनेक रस्ते आणि मार्ग पाहिले असतील. पण कधी गुगल मॅपवर डान्स पाहिला आहे का? कॅनडाच्या टोरंटो शहरातील एका व्यक्तिने गुगल मॅपवर त्याचा रनिंग रुट एका अनोख्या पद्धतीने सादर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याची ही अनोखी आर्ट पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
गुगल मॅपसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
डंकन मॅककेब हा व्यवसायाने अकाउंटंट आहे. त्याने अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर त्याच्या रनिंग रुटचे क्लिप ॲनिमेशनमध्ये रुपांतरित केलं आणि डान्सिंग स्टिक मॅनचा व्हिडिओ तयार केला.’स्ट्रावा’ या रूट-ट्रॅकिंग ॲपचा वापर करून त्याने हा व्हिडिओ तयार केला आहे. धावण्याची आवड आणि एडिटिंगची सांगड घालून डंकन मॅककेबने एक अनोखा व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओला आतापर्यंत X वर 25 दशलक्षाहून अधिक व्ह्युज आणि टिकटॉकवर 9 दशलक्षाहून अधिक हिट्स मिळाले आहेत. त्याचा हा व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडत आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “टोरंटोच्या रस्त्यावर स्ट्रावा आर्ट ॲनिमेशन! हा व्हिडिओ जानेवारी ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत 121 रनमध्ये तयार करण्यात आला आहे.” मॅककेबने सांगितले की, सॅन फ्रान्सिस्कोच्या लेनी माघन आणि टोरंटोच्या माईक स्कॉट या स्ट्रावा कलाकारांच्या कल्पनेने त्याला हा व्हिडीओ तयार करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे, ज्यांनी 2022 मध्ये त्यांच्या बाईकचा GPS मार्ग वापरून शहरात एक विशाल बीव्हर पेंट केला होता. मॅककेबने सांगितलं की, “सहा महिन्यांपासून, डांसिंग स्टिक मॅनच्या डोक्यावर एक रेषा होती, जी ॲनिमेशनसाठी वापरली जात होती. हॅट-टिप ही देखील एक क्रिएटिव कल्पना होती आणि ती गाण्यासाठी एक संकेत होती.”
I’ve seen a lot of the Toronto running community, but this guy wins. pic.twitter.com/il9LBXyiSD
— Ben Steiner (@BenSteiner00) November 21, 2024
मॅककेबने सांगितलं की, माझी स्टिक मॅन फ्रेम्समध्ये समान आकाराची असावी, यासाठी मी 10 महिने प्रयत्न केले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याला रनिंग कम्युनिटी आणि सोशल मीडिया यूजर्सकडून खूप प्रशंसा मिळाली. एका वापरकर्त्याने म्हटले, “मी पाहिलेल्या सर्वात प्रभावी गोष्टींपैकी ही एक आहे.” तर दुसरा म्हणाला, “यासाठी किती मेहनत आणि नियोजन केले जाते ते अविश्वसनीय आहे.”
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
तिसऱ्याने लिहिले की, “मी आतापर्यंत पाहिलेली ही सर्वोत्तम रनिंग-रिलेटेड पोस्ट आहे. आणि मला असे वाटत नाही की ते हरवता येईल.” डंकन मॅककेबने आपल्या धावण्याच्या माध्यमातून अशी कला निर्माण करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी, त्याने टोरंटोच्या रस्त्यावर 700 किलोमीटर धावणाऱ्या विविध प्राण्यांचे ॲनिमेशन पोस्ट केले होते. या स्टिक फिगर्समध्ये डायनासोर, जिराफ, व्हेल आणि शार्क यांचा समावेश होता.