पार्किंग आणि कार चोरीचं टेन्शन मिटलं, गुगल मॅपचं हे फीचर करणार तुम्हाला मदत
लोकप्रिय नेव्हिगेशन प्लॅटफॉर्म गुगल मॅपने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच केलं आहे. हे फीचर सर्व गुगल मॅप युजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे. गुगल मॅपच्या या नवीन फीचरमुळे ड्रायव्हर्सना पार्किंगची जागा शोधण्यसाठी मदत होणार आहे. हे फीचर सध्या उत्तर अमेरिकेतील युजर्ससाठी लाँच करण्यात आलं आहे. गुगलने SpotHero नावाच्या कंपनीसोबत भागीदारी करत आपल्या युजर्ससाठी नवीन फीचर सुरु केलं आहे. SpotHero पार्किंगची जागा बुक करण्यासाठी मदत करते. आता तुम्ही SpotHero ची वैशिष्ट्ये फक्त गुगल मॅप आणि गुगल सर्चमध्ये वापरू शकता.
हेदेखील वाचा- गुगल मॅपचे फ्युएल इकॉनॉमी फीचर तुम्हाला ट्रीपचे पैसे वाचवण्यासाठी करेल मदत, आताच करा ही सेटिंग
या नवीन फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या जवळील किंवा तुम्हाला ज्या ठिकाणाला भेट द्यायची आहे त्या ठिकाणी असलेली पार्किंगची जागा शोधू शकता. तसेच या जागेसाठी अॅडव्हान्स बुकिंग देखील केले जाऊ शकते. जेव्हा तुम्ही गुगल मॅप आणि गुगल सर्चमध्ये एखादे ठिकाण शोधता तेव्हा तुम्हाला पार्किंग पर्यायांसह “ऑनलाइन बुक करा” बटण दिसेल. या बटणावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर SpotHero वेबसाईट ओपन होईल. जिथे तुम्ही तुमच्या गाडीसाठी अॅडव्हान्स बुकिंग करू शकता. इथे तुम्ही तारीख, वेळ आणि इलेक्ट्रिक कार चार्जिंग, व्हीलचेअर सुविधा आणि वॉलेट सेवा यासारख्या इतर सुविधांवर आधारित पार्किंगची जागा निवडू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
गुगल मॅपने SpotHero सोबत एप्रिल 2024 मध्ये भागिदारी केली. त्यानंतर गुगल मॅपने यूएस आणि कॅनडातील अनेक शहरांमध्ये पार्किंग फीचर सुरु केलं. या नवीन फीचरमुळे युजर्सची पार्किंगच्या त्रासातून सुटका होईल. लोकांना सहज आणि कमी खर्चात पार्किंगची जागा शोधण्यात मदत होईल. तसेच पार्किंगचा ताण कमी होईल. या नवीन फीचरमुळे पार्किंग आणि कार चोरीच्या तणावातून मुक्त होऊ शकते. कारण पार्किंगअभावी कार चोरीच्या अनेक घटना घडताना दिसतात.
हेदेखील वाचा- Google Map: तुमच्या प्रत्येक प्रवासात फायदेशीर ठरतील गुगल मॅपचे ‘हे’ खास फीचर्स
गुगल मॅप कार पार्किंग फीचर भारतात कधी सुरू होणार आहे, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र, भारतात कार पार्किंगची समस्या वाढत आहे. अशा परिस्थितीत हे फीचर भारतात लवकरच सादर केले जाऊ शकते. अमेरिकेबरोबरच कॅनडामध्येही हे नवीन फीचर लाँच करण्यात आलं आहे. गुगल मॅपच्या नवीन कार पार्किंग फीचरमुळे ट्रॅफिकच्या समस्यांपासून सुटका मिळू शकते. तसेच वेळ आणि इंधनाची बचत होण्यासाठी मदत होणार आहे. या नवीन फीचरच्या मदतीने युजर्स कोणत्याही ठिकाणी जाण्यापूर्वीच पार्किंगच्या पर्यायांची माहिती घेऊ शकतील. तसेच कार पार्किंगची ऑनलाइन बुकिंग देखील करू शकतील.
SpotHero चे मालक मार्क लॉरेन्स यांनी सांगितले की, गुगल मॅपसह एकत्र काम करणे खूप फायदेशीर ठरेल. गुगल मॅपचा वापर दररोज लाखो लोक करतात आणि आम्ही या लोकांना सहज आणि कमी खर्चात पार्किंगची जागा शोधण्यात मदत करू शकतो. या नवीन वैशिष्ट्यामुळे पार्किंगचा ताण कमी होईल. तुम्ही पार्किंगची जागा आधीच बुक करू शकता आणि शेवटच्या क्षणी जागा शोधण्याची चिंता करावी लागणार नाही.