गुगल मॅपचे फ्युएल इकॉनॉमी फीचर तुम्हाला ट्रीपचे पैसे वाचवण्यासाठी करेल मदत, आताच करा ही सेटिंग
Google Map Fuel Economy Feature: भारतासह जगभरातील लोकांचं आवडतं नेव्हिगेशन प्लॅटफॉर्म असलेलं गुगल मॅप त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच नवनवीन फीचर्स लाँच करत असते. गुगल मॅपच्या या फीचर्सचा त्यांच्या युजर्सना फायदा होतो. असे अनेक फीचर्स गुगल मॅपने आतापर्यंत त्यांच्या युजर्ससाठी लाँच केले आहेत. अशाच एका फीचरबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे फीचर तुमच्यासाठी उपयुक्त तर आहेच. शिवाय गुगल मॅपच्या या फीचरच्या मदतीने तुमच्या ट्रीपचे पैसे देखील वाचणार आहेत.
हेदेखील वाचा- Google ने लाँच केलं नवीन टूल, आता AI जनरेट इमेज आणि डीपफेक ओळखणं होईल अधिक सोपं
गुगल मॅपने त्यांच्या युजर्ससाठी फ्युएल इकॉनॉमी फीचर लाँच केलं होतं. फार कमी लोकांना या फीचरबद्दल माहिती आहे. कोणत्याही नवीन किंवा दूरच्या ठिकाणी जाण्यासाठी आपण गुगल मॅप वापरतो. परंतु अनेक वेळा नकाशात लांबचा मार्ग दाखवला जातो. त्यामुळे आपल्याला संबंधित ठिकाणी पोहोचण्यापर्यंत अधिक वेळ लागतो. तसेच इंधन देखील जास्त वापरले जाते. मात्र, ही समस्या टाळण्यासाठी गुगल मॅपकडे उपाय आहे. ॲपवर एक सेटिंग आहे ज्याच्या मदतीने तुम्ही प्रवासादरम्यान इंधनाची बचत करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
गुगल मॅप फ्युएल इकॉनॉमी असं या फीचरचं नाव असून हे फीचर सर्व युजर्ससाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या लक्षात आले असेल की जेव्हा तुम्ही गुगल मॅपवर एखादा मार्ग फॉलो करता तेव्हा ॲपवर दाखवलेल्या अंतराशेजारी हिरव्या पानांसारखे चिन्ह दिसते. हे चिन्ह फ्युएल इकॉनॉमीसाठी देण्यात आलं आहे. याच्या मदतीने युजर्स अधिक फ्यूल एफिशिएंट रस्ता निवडू शकतात. हे वैशिष्ट्य सर्वात जलद मार्ग नसले तरीही कमी इंधन वापरणारे मार्ग सुचवते. त्याच्या मदतीने कार्बन उत्सर्जनही कमी होईल.
हेदेखील वाचा- आधार कार्डमध्ये कोणती माहिती किती वेळा अपडेट केली जाऊ शकते, काय सांगतात नियम? जाणून घ्या
जेव्हा तुम्ही मार्गासाठी नेव्हिगेशन सेट करता, तेव्हा गुगल मॅप तुम्हाला अनेक मार्ग दाखवेल. यापैकी, इंधन बचतीचा मार्ग “लीफ आयकॉन” (हिरव्या पानांनी) ओळखला जाऊ शकतो, जो सूचित करतो की हा मार्ग पर्यावरण आणि इंधन अर्थव्यवस्थेसाठी अधिक चांगला आहे.