आता गुगल मॅप सांगाणार कोणता फ्लायओव्हर घ्यायचा! या 8 शहरांसाठी आलं फीचर
Google Maps Flyover Alert Feature: गुगल मॅपचं सर्वाधिक वापरलं जाणारं फीचर म्हणजे फ्लायओव्हर अलर्ट. अनेक वेळा गुगल मॅपमुळे लोक चुकीचा उड्डाणपूल घेतात, त्यामुळे बराच वेळ आणि इंधन वाया जाते. कारण आत्तापर्यंत गुगल मॅप तुम्हाला स्पष्टपणे सांगत नाही की कोणता फ्लायओव्हर घ्यायचा आणि कोणता घ्यायचा नाही. या समस्येमुळे गुगल मॅप युजर्स प्रचंड हैराण होते. मात्र आता अखेर त्यांची ही समस्या दूर झाली आहे. कारण गुगल मॅपने फ्लायओव्हर अलर्ट फीचर लाँच केलं आहे. हे फीचर युजर्ससाठी प्रचंड फायदेशीर ठरत आहे.
हेदेखील वाचा- पार्किंग आणि कार चोरीचं टेन्शन मिटलं, गुगल मॅपचं हे फीचर करणार तुम्हाला मदत
गुगल मॅपचे नवीन फीचर भारतात रिलीज करण्यात आले आहे. चारचाकी वाहनांसाठी हे फीचर अतिशय उपयुक्त ठरत आहे. भारतात एकूण 6 नवीन फिचर्स रिलीझ करण्यात आले आहेत, ज्यामध्ये AI चा वापर करण्यात आला आहे. यामध्ये फ्लाय ओव्हर अलर्ट, ईव्ही चार्जिंग स्टेशनची माहिती, मेट्रोचे तिकीट, घटनेचा अहवाल अशा नावांचा समावेश आहे. कंपनीने सांगितले की, या फीचर्सच्या मदतीने यूजर्सना अधिक अचूक माहिती मिळेल. (फोटो सौजन्य – pinterest)
या नॅव्हिगेशन सिस्टीमचा फायदा अत्यंत हुशार ड्रायव्हर्सना होणार असल्याचे गुगलने म्हटले आहे. भारतात, गुगल मॅप अनेक चारचाकी वापरकर्त्यांना काही अरुंद रस्त्यांवर घेऊन जातात, जिथे गाड्या अनेकदा अडकतात, किंवा त्यांना उड्डाणपुलांबद्दल माहिती न मिळाल्यास, ते मार्गावरून हरवतात. याच सगळ्या समस्यांवर आता उपाय म्हणून कंपनीने फ्लायओव्हर अलर्ट फीचर लाँच केलं आहे. सध्या, हे फीचर 8 शहरांसाठी जारी करण्यात आले आहे. यामध्ये हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, इंदूर, भोपाळ आणि भुवनेश्वर इत्यादींचा समावेश आहे.
हेदेखील वाचा- गुगल मॅपचे फ्युएल इकॉनॉमी फीचर तुम्हाला ट्रीपचे पैसे वाचवण्यासाठी करेल मदत, आताच करा ही सेटिंग
भारतात कार चालवताना गुगल मॅपचा वापर करताना अनेकदा समस्या निर्माण होतात. कारण गुगल मॅप तुम्हाला स्पष्टपणे सांगत नाही की कोणता फ्लायओव्हर घ्यायचा आणि कोणता घ्यायचा नाही. त्यामुळे युजर्सना फ्लायओव्हरच्या वेळी अडचणीचा सामना करावा लागतो. अज्ञात मार्गांवर असताना, उड्डाणपुलावरून चढणे किंवा उतरणे याबद्दल माहिती उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत गुगल मॅपचे हे फ्लायओव्हर अलर्ट खूप उपयुक्त ठरू शकतात.
भारतात इलेक्ट्रिक वाहन उद्योग वेगाने वाढत आहे, आता बरेच लोक इलेक्ट्रिक कार आणि दुचाकी खरेदी करत आहेत. अशा परिस्थितीत, गुगल मॅपचे EV चार्जिंग स्टेशन वैशिष्ट्य वापरकर्त्यांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. हे फीचर सुरू केल्यानंतर, ईव्ही वापरकर्त्यांना त्यांच्या मार्गावर येणाऱ्या ईव्ही चार्जिंग स्टेशनची माहिती सहज मिळेल.
Google ने ONDC आणि Namma Yatri सोबत भागीदारी केली आहे. यामुळे भारतीय वापरकर्त्यांना मेट्रो तिकीट खरेदी करता येणार आहे. त्याची सुरुवात कोची आणि चेन्नईपासून होत आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स तिकिटे खरेदी करू शकतील आणि गुगल मॅपवरून पैसेही देऊ शकतील. यासाठी कोणत्याही रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही.