कारसाठी चार्जिंग स्टेशन शोधताना Google Maps चं फीचर ठरेल फायदेशीर (फोटो सौजन्य- pinterest)
देशात Google Maps चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आपण एखाद्या अनोखळी ठिकाणी गेलो तर पहिलं Google Maps वर रस्ता शोधण्यास सुरुवात करतो. एखाद्या ठिकाणी कारने, बाईकने आणि चालत जाण्यासाठी किती वेळ लागणार आहे, याची माहिती आपल्याला Google Maps देतो. रात्रीचा रिक्षा किंवा टॅक्सीमधून प्रवास करताना देखील अनेकजण Google Maps वर रस्ता तपासतात. एकूणच काय Google Maps चे फायदे अनलिमिटेड आहेत. एखााद्या अनलिमिटेड मोबाईल रिचार्जप्रमाणे Google Maps देखील अनेक फायदे देतो.
हेदेखील वाचा- Google Gemini AI: ‘या’ युजर्सना Gmail वर मिळणार गुगलच्या Gemini AI ची मोफत सुविधा!
केवळ भारतातच नव्हे तर जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे नेव्हिगेशन ॲप म्हणजे Google Maps. लोकं कॅफे, रस्ते आणि इतर अनेक ठिकाणी जाण्यासाठी Google Maps वापरतात. दिवसेंदिवस Google Maps चे युजर्स मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वाढत्या युजर्सना चांगली सुविधा मिळावी यासाठी Google Maps देखील नवनवीन फीचर्स लाँच करत आहे. जेणेकरून युजर्सचा Google Maps वापरण्याचा अनुभव अधिक चांगला होईल. Google ने आपल्या Google Map मध्ये अनेक नवीन फीचर्स जोडली आहेत जी लोकांसाठी खूप उपयुक्त आहेत. Google Map च्या या फीचर्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या इलेट्रीक कारसाठी चार्जिंग स्टेशन किंवा पार्किंग देखील शोधू शकता. चला तर मग Google Map च्या या फीचर्सवर नजर टाकूया.
नुकतेच Google ने Google Maps मध्ये Glanceable Directions नावाचे नवीन फीचर जोडले आहे. हे एक अतिशय उपयुक्त फीचर मानलं जातं आहे. या फीचरच्या मदतीने, लोकं त्यांचे डिव्हाइस अनलॉक न करता डायरेक्शन पाहू शकतात. या फीचरच्या मदतीने तुम्ही स्टार्ट बटण दाबल्याशिवाय तुमच्या मार्गाचे संपूर्ण ओवरव्यू पाहू शकता. हे फीचर सुरू करण्यासाठी, Google Maps मधील नेव्हिगेशन सेटिंग्जवर जा आणि Glanceable Directions या पर्यायावर क्लिक करा.
हेदेखील वाचा- Google ची एक चूक युजर्सना पडली महागात; 1.5 करोड लोकांचे पासवर्ड धोक्यात
Google Maps च्या माध्यमातून कोणत्याही इमारतीच्या प्रवेशाची माहितीही लोकांना मिळू शकते. जेव्हा Google Maps युजर कोणत्याही इमारतीजवळ पोहोचतो तेव्हा या फीचरच्या मदतीने त्याला आपोआप इमारतीच्या प्रवेशद्वाराची माहिती मिळू लागते.
कार पार्किंग फीचरच्या मदतीने युजर्स कार पार्क केल्यानंतर त्याचे लोकेशन सेव्ह करू शकतात जेणेकरून भविष्यात ते लोकेशन सहज शोधू शकतील. कार पार्क केल्यानंतर Google Maps च्या स्क्रीनवर दिलेल्या निळ्या डॉटवर क्लिक करा. यानंतर तुम्ही लोकेशन सेव्ह करू शकता.
अलीकडेच Google Map ने एक नवीन फीचर लाँच केलं आहे, ज्यामध्ये लोक सहजपणे इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन शोधू शकतात. या फीचर अंतर्गत तुम्हाला तुमच्या वाहनाचा चार्जर प्रकार निवडावा लागेल. यानंतर माझ्या जवळील इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन शोधा, या ऑप्शनवर क्लिक करा. आता तुम्हाला तुमच्या जवळच्या ईव्ही चार्जिंग स्टेशनचे रिझल्ट मिळतील.